शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘हे’ तंत्र वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
3
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
4
खळबळजनक! डोसा खाल्ल्याने २ मुलींचा मृत्यू; आई-वडिलांची प्रकृती गंभीर, नेमकं काय घडलं?
5
सापाची कात, पक्ष्यांचे अवशेष अन् अश्लील व्हिडिओ; एरंडेच्या ऑफिसमध्ये सापडलं भोंदूगिरीचे साहित्य
6
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
7
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
8
लग्नानंतर ४ महिन्यांतच सूरज चव्हाण होणार बाबा? पत्नी संजनाचे बेबी शॉवरचे फोटो व्हायरल
9
व्हायरल 'IIT बाबा'ने गुपचूप लग्न उरकलं अन् फ्यूचर प्लॅनिंगही सांगितलं! आता त्याची पत्नी म्हणते.. 
10
रेल्वे रुळावर गॅस सिलेंडर ठेवून प्रवाशांचा काळ बनणार होते 'ते' दहशतवादी; एटीएसचा मोठा खुलासा!
11
केंद्र सरकारचा मोठा निर्णय! ५ किलो सिलेंडरसंदर्भात सर्व राज्य सरकारांना पत्र; दिले महत्वाचे आदेश
12
मोजतबा खामेनेई कोमात, ना युद्धाची माहिती, ना..., अमेरिका-इस्राइलला ठावठिकाणाही कळला?
13
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
14
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
15
Ghatkopar Crime: घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
16
Baramati bypoll Election: बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
17
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
18
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
19
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
20
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
Daily Top 2Weekly Top 5

महाराष्ट्र निवडणूक 2019: काँग्रेस, राष्ट्रवादीकडून शिवसेनेचा 'गेम'?; आता मातोश्रीवर येणार पाठिंबा देण्याची वेळ?

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 11, 2019 20:38 IST

शिवसेनेला मुदत वाढवून देण्यास राज्यपालांचा नकार

मुंबई : भाजपाने सत्तास्थापनेस नकार दिल्यानंतर राज्यपालांनी शिवसेनेला 24 तासांची मुदत दिली होती. ही मुदत अपुरी असल्याने शिवसेनेने वेळ वाढवून देण्याची मागणी केली होती. मात्र, राज्यपाल भगतसिंह कोश्यारींनी त्यांची मागणी फेटाळून लावली. शिवसेनेला पाठिंबा देण्याबद्दलचा निर्णय घेण्यासाठी काँग्रेस, राष्ट्रवादीनं दिवसभर मॅरेथॉन बैठकी घेतल्या. मात्र शिवसेनेला पाठिंबा देण्याबद्दलचं कोणतंही पत्र दोन्ही पक्षांकडून देण्यात आलं नाही. त्यामुळे शिवसेनेला मोठा धक्का बसल्याचं मानलं जात आहे. आज संध्याकाळी शिवसेनेच्या नेत्यांनी राज्यपालांची भेट घेतली. यामध्ये युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरेंचादेखील समावेश होता. आम्हाला राज्यपालांनी केवळ २४ तासांची वेळ दिली होती. त्यात आम्हाला दोन पक्षांची चर्चा करायची होती, असं आदित्य यांनी राज्यपालांच्या भेटीनंतर पत्रकारांशी संवाद साधताना म्हटलं. आम्हाला 7.30 वाजेपर्यंतची मुदत देण्यात आली होती. ती वेळ वाढवून देण्याची मागणी आम्ही केली. मात्र राज्यपालांनी वेळ नाकारली आहे. वेळ नाकारली तरीही दावा नाकारलेला नसल्याचं आदित्य ठाकरे यांनी सांगितलं. काँग्रेस राष्ट्रवादीनं शिवसेनेकडे पाठिंब्याचं पत्र दिल्याचं वृत्त असताना शिवसेनेला मोठा धक्का बसला आहे. सोनिया गांधी यांनी शिवसेनेला वेळ वाढवून देण्याची मागणी करण्याचा सल्ला दिला होता. याबाबतचा संदेश त्यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्याकडे दिला होता. त्याप्रमाणे शिवसेनेनं राज्यपालांकडे मुदतवाढ देण्याची मागणी केली होती. मात्र, राज्यपालांनी ही मागणी फेटाळली आहे. राज्यपालांनी वेळ वाढवून देण्यास नकार दिल्यानं शिवसेनेच्या सत्ता स्थापनेच्या स्वप्नाला मोठा हादरा बसला आहे. भाजपानं बहुमत सिद्ध करावं. अन्यथा आमच्याकडे १७० आमदारांचा पाठिंबा असल्याचा दावा शिवसेना खासदार संजय राऊत यांनी अनेकदा केला होता. मात्र हा दावा पोकळ असल्याचं आज पाहायला मिळालं. याशिवाय शिवसेनेचे खासदार अरविंद सावंत यांनी आज केंद्रीय मंत्रिमंडळातून अवजड उद्योग मंत्रिपदाचादेखील राजीनामा दिला. 

टॅग्स :Maharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019Uddhav Thackerayउद्धव ठाकरेShiv SenaशिवसेनाNCPराष्ट्रवादी काँग्रेसcongressकाँग्रेस