औरंगाबाद निवडणूक 2019 निकाल : दानवेंचे जावई हर्षवर्धन जाधव यांचा कन्नड मतदारसंघातून पराभव

By ऑनलाइन लोकमत | Published: October 24, 2019 04:36 PM2019-10-24T16:36:27+5:302019-10-24T16:41:02+5:30

Maharashtra Election 2019 Result : अंतिम फेरीनंतर जाधव यांचा १८ हजार ६९० मतांनी पराभव झाला आहे

Maharashtra Election 2019: harshavardhan jadhav lost from aurangabad kannada Constituency | औरंगाबाद निवडणूक 2019 निकाल : दानवेंचे जावई हर्षवर्धन जाधव यांचा कन्नड मतदारसंघातून पराभव

औरंगाबाद निवडणूक 2019 निकाल : दानवेंचे जावई हर्षवर्धन जाधव यांचा कन्नड मतदारसंघातून पराभव

googlenewsNext

मुंबई : विधानसभा निवडणुकीच्या निकालाचे चित्र जवळपास आता स्पष्ट होताना दिसत असून काही मतदारसंघातील निकाल हाती आले आहेत. कन्नड विधानसभा मतदारसंघातून सलग दोन वेळा विजय मिळवणारे आणि केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांचे जावई हर्षवर्धन जाधव यांचा पराभव झाला असून, शिवसेनेचे उमेदवार उदयसिंग राजपूत विजयी झाली आहेत. राजपूत यांना ७९ हजार २२५ मते मिळाली आहे.

लोकसभा निवडणुकीत शिवसेनेचे माजी खासदार चंद्रकांत खैरे यांच्या पराभवाचे कारण ठरल्याने हर्षवर्धन जाधव मोठ्याप्रमाणावर चर्चेत आले होते. तर दानवे यांचे जावई असल्याने त्यांच्या निकालाकडे सर्वांचे लक्ष लागले होते. कन्नड विधानसभा मतदारसंघातील अंतिम फेरीनंतर जाधव यांचा १८ हजार ६९० मतांनी पराभव झाला आहे.

शिवसेनेचे उमेदवार राजपूत यांच्या गळ्यात विजयाची माळ पडली आहे. त्यामुळे जाधव यांना मोठा धक्का बसला असून दोन वेळा विधानसभेत पाठवणाऱ्या कन्नडच्या जनतेनी त्यांना यावेळी नाकारले असल्याचे दिसून आले. तर याच मतदारसंघातून रिंगणात असलेले पाणीपुरवठा मंत्री यांचे जावई किशोर पवार यांचा सुद्धा पराभव झाला आहे.

मिळालेली मते

उदयसिंग राजपूत ( शिवसेना) ७९ हजार २२५,

हर्षवर्धन जाधव ( अपक्ष ) ६० हजार ५३५

संतोष कोल्हे ( रॉ. का.) ४३ हजार ६२५

जाधवांना 'ते' वक्तव्य पडले महागात

विधानसभा निवडणुकीच्या शेवटच्या टप्यात हर्षवर्धन जाधव यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याबद्दल वादग्रस्त विधान केले होते. त्यांनतर महाराष्ट्रभरातून त्यांच्यावर शिवसेनकडून टीका होताना पाहायला मिळाली होती. तर कन्नड तालुक्यात सुद्धा शिवसेनेची मोठी ताकद आहे. तर जाधव यांच्या त्या विधानानंतर शिवसेनच्या नेत्यांनी जाधव यांना पाडण्यासाठी सर्व ताकद पणाला लावली होती. त्यामुळे जाधव यांची अडचण वाढणार असल्याचे बोलले जात होते. तर जाधव यांचा पराभव झाल्याने, उद्धव ठाकरे यांच्याबद्दल कलेले वक्तव्य त्यांना महाग पडल्याचे बोलले जात आहे.

 

Web Title: Maharashtra Election 2019: harshavardhan jadhav lost from aurangabad kannada Constituency

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.