शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
4
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
5
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
6
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
7
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
8
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
9
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
10
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
11
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
12
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
13
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
14
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
15
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
16
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
17
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
18
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
19
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

महाराष्ट्र निवडणूक 2019: सत्तास्थापनेची संधी काँग्रेसने दवडू नये - हुसेन दलवाई

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 20, 2019 01:40 IST

शिवसेना-भाजपसारखी धर्मांध नसल्याची मांडली भूमिका

- टेकचंद सोनवणे नवी दिल्ली : शिवसेना धर्मनिरपेक्ष नाही; परंतु पक्षप्रमुख उद्धव ठाकरे सौजन्यशील नेते आहेत. त्यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेत झालेले बदल पाहावयास हवेत. आरएसएस-भाजपची भूमिका शिवसनेने कधीही स्वीकारलेली नाही, अशा शब्दांत खासदार हुसैन दलवाईयांनी शिवसेना- काँग्रेस- राष्ट्रवादी काँग्रेसच्या संभाव्य आघाडीचे समर्थन केले.शिवसेनेचे साबीर शेख कामगारमंत्री होते, हाही इतिहास आहे. अब्दुल सत्तार शिवसेनेकडून आमदार झाले. भाजपने किती मुस्लिमांना उमेदवारी दिली? शिवसेना धर्मनिरपेक्ष नाही; पण भाजपसारखी धर्मांधही नाही. त्यामुळे भाजपविरोधात प्रादेशिक पक्षांना बळ द्यायचे असेल, तर काँग्रेसने शिवसेनेसोबत महाराष्ट्रात सत्तास्थापन करावी, असा आग्रह दलवाई यांनी स्वपक्षाच्या नेत्यांकडे धरला आहे.दलवाई म्हणाले, मी व माझ्या कुटुंबियांनी मुंबई दंगलीची झळ अनुभवली आहे. तेव्हाही शिवसेनेशी संघर्ष केला. १९८५ साली विधानसभा निवडणुकीत मला शिवसेना समर्थकांनी मारहाण केली. असे असले तरी भाजपला सत्तेपासून दूर ठेवणे हाच शिवसेना- काँग्रेस- राष्ट्रवादीचा धर्म असावा, असे मला वाटते. काँग्रेसचा सत्तास्थापनेसाठी वेळकाढूपणा सुरू असल्याचा आरोप चुकीचा आहे. अनेक मुद्यांवर चर्चा होत असल्याने सावधानता बाळगणे आवश्यक आहे. उद्या रामविलास पासवान, रामदास आठवले व नितीशकुमारांसारखे नेते ‘संपुआ’मध्ये येणार असतील, तर दीर्घ चर्चेची गरज भासणार नाही; पण शिवसेना वेगळ्या विचारांची आहे. त्यामुळे आमचे नेतृत्व अत्यंत सावधपणे यासंदर्भात चर्चा करीत आहे, त्याचेही समर्थन दलवाई यांनी केले.असा असावा समान कार्यक्रमशालेय शिक्षणात सुधारणा, सत्तास्थापनेनंतर आठ दिवसांत शेतकऱ्यांना कर्जमाफी, सच्चर समितीच्या अहवालाची अंमलबजावणी. मुस्लिम आरक्षण, कंत्राटी कामगारांना संरक्षण, नव्या उद्योगांना चालना, असे मुद्दे दलवाई यांनी किमान समान कार्यक्रमासाठी सुचविले.

टॅग्स :Maharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019congressकाँग्रेसShiv SenaशिवसेनाBJPभाजपा