शहरं
Join us  
Trending Stories
1
अभिनेता श्रेयस तळपदेवर गुन्हा दाखल; उत्तराखंडमधील घोटाळा प्रकरण, आलोक नाथ यांचेही नाव...
2
राहुल गांधी निराश, त्यांच्या नेतृत्वात काँग्रेसने ९० निवडणुका हरल्या; अनुराग ठाकूरांचा हल्लाबोल
3
"राहुल गांधींचे सर्व आरोप खोटे आणि निराधार" निवडणूक आयोगाचे प्रत्युत्तर!
4
पत्रकाराचा फोन, बूथ मंत्र अन् ८० टक्के टार्गेट...; निवडणुकीसाठी अमित शाहांनी आखला 'प्लॅन'
5
पुढचे २४ तास फ्रान्स सगळंच बंद! रस्त्यांवर उतरणार तब्बल ८ लाख लोक; काय आहे कारण?
6
पंतप्रधान मोदी आणि नेपाळच्या हंगामी PM सुशीला कार्की यांचा फोनवरून संवाद, काय झाली चर्चा?
7
१० रुपयांची बाटली... तीन भावांनी मिळून केली कमाल, आता त्यांच्या प्रोडक्टची गल्ली-गल्लीत आहे चर्चा
8
संरक्षण करारानुसार पाकिस्तानला युद्धात साथ देण्याचा शब्द देणाऱ्या सौदी अरेबियाची ताकद किती?
9
डोनाल्ड ट्रम्प पिच्छा सोडेना! आता भारताला टाकले ड्रग्ज उत्पादक, पुरवठा करणाऱ्या देशांच्या यादीत 
10
‘राहुल गांधींचा ‘वोटचोरी’बाबतचा कांगावा म्हणजे…’, ते पत्र दाखवत भाजपाचा पलटवार 
11
सोन्यातील तेजी शेअर बाजारासाठी धोक्याची घंटा? काय आहे 'निक्सन शॉक' घटना? ब्रोकरेज फर्मने सांगितलं सत्य
12
निवडणूक आयोगाने 'आधारहीन' म्हणत राहुल गांधींचे आरोप फेटाळले, 'त्या' मतदारसंघात काय घडलं होतं तेही सांगितले
13
५० लाखांचा फ्लॅट घ्यायचा की गावी त्याच पैशांची जमीन? सोशल मीडियावर वाद सुरु झाला...
14
VIRAL : एकमेकांना पाडलं, केस धरून हाणलं; भर बाजारात नवरा-बायकोमध्ये जुंपली!
15
मी रमी खेळत होतो कशावरून? मंत्री माणिकराव कोकाटेंनी रोहित पवारांना कोर्टात खेचलं, अब्रुनुकसानीचा दावा दाखल
16
भलामोठा डिस्प्ले, उत्कृष्ट कॅमेरा, दमदार बॅटरी; 'हे' ६ फोन ६००० पेक्षा कमी किंमतीत उपलब्ध
17
दीपिका पादुकोणची 'कल्की 2898 एडी' सिनेमातून एक्झिट, कारण आलं समोर
18
राहुल गांधींना निवडणूक आयोगातून कोण मदत करतेय? दाव्याने खळबळ
19
Shukra Pradosh 2025: पती-पत्नीचे बिघडलेले नातेही सुधारेल; शुक्र प्रदोषावर करा 'हे' उपाय!
20
प्रसिद्ध अभिनेत्रीचा मुलगा; ३६ व्या वर्षीही बॉलिवूडमध्ये करतोय संघर्ष; आता मिळाली मोठी संधी

Maharashtra Election 2019 : शरद पवारांची मानसिकता ढासळल्याने ते हातवारे करताहेत, मुख्यमंत्र्यांची टीका

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 13, 2019 13:02 IST

विधानसभा निवडणुकीच्या प्रचारामध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडवणवीस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यात सध्या जोरदार वाकयुद्ध रंगले आहे.

जळगाव - विधानसभा निवडणुकीच्या प्रचारामध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडवणवीस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यात सध्या जोरदार वाकयुद्ध रंगले आहे. दरम्यान, लढाई पैलवानांमध्ये होते, इतरांमध्ये नाही, अशा शब्दात हातवारे करून टीका करणाऱ्या शरद पवार यांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जळगावमधील सभेतून जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. 'आम्ही नटरंग नाही, त्यामुळे तसे हातवारे करीत नाही. ते आम्हाला शोभत नाही. पवारांची मानसिकता ढासळली असल्याने असे हातवारे करीत आहेत,'असा टोला देवेंद्र फडणवीस यांनी लगावला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची विधानसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी पहिली सभा आज जळगावात झाली. त्यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदींसोबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, पालकमंत्री गिरीश महाजन, राज्यमंत्री गुलाबराव पाटील व्यासपीठावर उपस्थित होते.सभेदरम्यान मतदारांना संबोधित करताना मुख्यमंत्र्यांनी शरद पवार यांनी केलेल्या टीकेचा खरपूस समाचार घेतला. ''खरा पैलवान कोण? हे जनता 24 ऑक्टोबरला दाखवून देईल. तसेच आम्ही काही नटरंग नाही. त्यामुळे आम्ही हातवारे करत नाही. तसेच ते आम्हाला शोभतही नाही. सध्याच्या परिस्थितीमुळे शरद पवार यांची मानसिकता ढासळी आहे. त्यामुळे ते हातवारे करत आहेत, अशी टीका मुख्यमंत्र्यांनी केली. दरम्यान, निवडणुकीमध्ये बंडखोरांकडे लक्ष देऊ नका, त्यांना कुणाचाही आशीर्वाद लाभलेला नाही. त्यामुळे पक्षचिन्ह असलेले उमेदवार निवडून द्या, असे आवाहनही त्यांनी केले. 

आमचे पैलवान तेल लावून तयार आहेत. मात्र समोर कोणीच विरोधक नाही, या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या विधानाला राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले होते. लढाई पैलवानांमध्ये होते, इतरांमध्ये नाही, अशा शब्दांमध्ये पवारांनी फडणवीसांवर प्रतिहल्ला चढवला. सोलापूरमधील बार्शीत पवारांनी  शनिवारी प्रचारसभा घेतली. त्यावेळी त्यांनी भाजपा सरकारवर तोफ डागली. शरद पवारांचे निकटवर्तीय समजल्या जाणाऱ्या दिलीप सोपल यांनी काही दिवसांपूर्वीच शिवसेनेत प्रवेश केला. त्यामुळे बार्शीत राष्ट्रवादीकडून निरंजन भूमकर निवडणुकीच्या रिंगणात आहेत. त्यांच्यासाठी घेतलेल्या प्रचारसभेत बोलताना पवार यांनी मुख्यमंत्र्यांना लक्ष्य केलं. 'मुख्यमंत्री म्हणतात, इथे लढाईच नाही. कुस्तीसाठी कोणी समोर नाही. पण कुस्ती पैलवानांची होते. अशांची (हातवारे करून) होत नाही,' अशी टीका पवारांनी केली. पवारांनी केलेल्या हातवाऱ्यांवर भाजपा नेत्यांनी आक्षेप घेतला होता. 

 

टॅग्स :Maharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019Devendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसBJPभाजपाSharad Pawarशरद पवारNCPराष्ट्रवादी काँग्रेसjalgaon-city-acजळगाव शहरjalgaon-rural-acजळगाव ग्रामीण