शहरं
Join us  
Trending Stories
1
तुटलेल्या विद्युत वाहिनीच्या स्पर्शाने दोन शेतकऱ्यांचा मृत्यू; महावितरण विरोधात चिकलठाण्यात रास्ता रोको
2
इस्रायलकडून इराणी टीव्ही स्टुडिओवर क्षेपणास्त्र हल्ला, लाईव्ह बुलेटीन सोडून अँकरने काढला पळ!
3
खुल्लम खुल्ला रोमान्स पडला महागात! बाईकच्या टाकीवर गर्लफ्रेंडला बसवणाऱ्या तरुणाला 'इतका' दंड
4
रांचीला जाणारे एअर इंडियाचे विमान टेक ऑफनंतर दिल्लीला परतले! नेमके झाले तरी काय?
5
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
6
सोनमच्याही एक पाऊल पुढे निघाली गुलफाशा; प्रियकरासोबत मिळून लग्नाच्या एक दिवस आधीच पतीला संपवलं!
7
आर्थिक मदतीशिवाय हल्ला होऊ शकत नाही; पहलगाम हल्ल्यावरुन FATF ने पाकिस्तानला फटकारले
8
सायप्रसच्या महिला खासदाराने PM मोदींचे चरणस्पर्श केले, पंतप्रधानांनी डोक्यावर हात ठेवत दिला आशीर्वाद
9
दहा कोटी वृक्ष लावगडीचे उद्दिष्ट; वन विभाग ‘साइट ट्रॅक’वर, रेशीमला झुकते माप
10
आता पाकिस्तान अणुबॉम्बची धमकी देण्यापूर्वी शंभर वेळा विचार करेल...! SIPRI च्या अहवालात भारताच्या अण्वस्त्रांसंदर्भात मोठा दावा
11
Viral Video : रीलसाठी जीवाशी खेळ; धबधब्यावर उभी राहिली तरुणी, पुढे जे झालं ते बघून चुकेल काळजाचा ठोका
12
"माझाही राजा रघुवंशी झाला असता"; गोव्याला जाताना पत्नीसमोर मारहाण, पतीने सांगितली आपबिती
13
बाप म्हणाला चिंता आहे, मुलगी म्हणाली मी आहे! ३ एकरांत सोयाबीन लावून मुलीची बापाला साथ
14
वृद्ध व्यक्तीला डिजिटल अरेस्ट करून नकली कोर्टात हजर केलं; घातला 'इतक्या' कोटींचा गंडा!
15
इराणचा अमेरिकेच्या दुतावासावर हल्ला अन् अमेरिकेची २८ टँकर विमाने एकाचवेळी झेपावली...
16
NPT मधून बाहेर पडण्याच्या तयारीत इराण, इस्रायलसोबत सुरू असलेल्या युद्धादरम्यान खामेनेई यांचं मोठं प्लॅनिंग?
17
कच्चे तेल ३०० डॉलरवर जाण्याची शक्यता; इराकच्या मंत्र्यांनी जर्मनीच्या कानावर घातला मोठा धोका...
18
"...तर पाकिस्तानकडे युद्धाशिवाय दुसरा पर्याय उरणार नाही!"; पाणी बंद झाल्याने बिलावल बिथरले, दिली अशी धमकी
19
माजी आमदार बच्चू कडू यांना मोठा राजकीय धक्का; जिल्हा बँकेचे अध्यक्ष म्हणून अपात्र
20
प्रेमानेच केला घात! राजावर पाठीमागून केला वार, हत्येसाठी वापरलेला चाकू पोलिसांना सापडला...

महाराष्ट्र विधानसभा 2019: राऊतांच्या प्रत्येक प्रश्नाला उत्तर देण्याची गरज नाही- मुनगंटीवार

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 7, 2019 13:20 IST

राज्यात महायुतीचं सरकार येईल; मुनगंटीवारांना विश्वास

मुंबई: शिवसेना, भाजपामध्ये सत्तापदांच्या वाटपाचा प्रश्न सुटत नसल्यानं सरकार स्थापनेचा तिढा कायम आहे. त्यातच शिवसेना खासदार संजय राऊत दररोज भाजपावर टीकेचे बाण सोडत असल्यानं महायुतीतल्या दोन मोठ्या पक्षांमधील दरी वाढली आहे. अर्थमंत्री आणि भाजपा नेते सुधीर मुनगंटीवार यांच्या पत्रकार परिषदेत याचा प्रत्यय आला. राऊत यांनी केलेल्या काही आरोपांना मुनगंटीवार यांनी उत्तरं दिली. मात्र एका क्षणी राऊत यांच्या प्रत्येक प्रश्नाला उत्तर देण्याची गरज मला वाटत नाही, असं मुनगंटीवार म्हणाले. इतर पक्षांचे आमदार फोडण्याचा प्रयत्न सर्वाधिक जागा जिंकणाऱ्या पक्षाकडून केला जात असल्याचा आरोप संजय राऊत यांनी केला होता. त्यावर भाष्य करताना कुणीही अशा पद्धतीनं आमदारांचा अवमान करू नये असं मुनगंटीवार म्हणाले. लाखो मतदारांच्या आशीर्वादानं जो निवडून येतो, त्याच्याबद्दल अशा पद्धतीनं अपशब्द काढणं योग्य नाही, असं मुनगंटीवारांनी म्हटलं. शिवसेनेचे आमदार कधीही फुटणार नाहीत. कारण त्यांची पक्षावर निष्ठा आहे, असंदेखील त्यांनी सांगितलं.राऊत यांनी सकाळी पत्रकार परिषद घेत नेहमीप्रमाणे भाजपावर तोफ डागली. राज्यात राष्ट्रपती राजवट लागू झाल्यास त्यासाठी शिवसेना कारणीभूत नसेल. कारण सर्वात मोठा पक्ष असल्यानं सत्ता स्थापनेची जबाबदारी भाजपाची आहे. राज्यात निर्माण झालेल्या तिढ्याला आम्ही जबाबदार नाही, असं राऊत म्हणाले. त्याबद्दल मुनगंटीवारांना विचारलं असता, राऊतांच्या प्रत्येक प्रश्नाला उत्तर देण्याची गरज वाटत नाही. त्यांनी प्रश्नपत्रिका काढायची आणि आम्ही उत्तरं लिहित बसायची, असं होणार नाही, असं मुनगंटीवार म्हणाले. मुख्यमंत्रिपदावर ठाम असलेल्या शिवसेनेनं त्यांचाच मुख्यमंत्री होणार असल्याचं समजावं, असं म्हणत मुनगंटीवार यांनी मित्रपक्षाची समजूत काढण्याचादेखील प्रयत्न केला. उद्धव ठाकरे देवेंद्रजींना शिवसैनिकच समजतात. देवेंद्रजी शिवसैनिक आहेत, हे उद्धव ठाकरेच म्हणालेत. त्यामुळे देवेंद्रजींच्या रूपानं शिवसैनिकच मुख्यमंत्री होईल, हेच आम्ही सांगतोय. मग अडचण कुठे आहे?, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. 

टॅग्स :Maharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019Sudhir Mungantiwarसुधीर मुनगंटीवारSanjay Rautसंजय राऊतDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसUddhav Thackerayउद्धव ठाकरेShiv SenaशिवसेनाBJPभाजपा