नाना पटोलेंचा अक्षय-अमिताभ यांच्यावर पुन्हा निशाणा, आता म्हणाले - "ते खरे हिरो नाहीत, असते तर..."

By श्रीकृष्ण अंकुश | Published: February 20, 2021 07:52 PM2021-02-20T19:52:18+5:302021-02-20T19:52:57+5:30

अभिनेता अक्षय कुमार आणि अमिताभ बच्चन यांच्यावरील भाष्यासंदर्भात बोलताना पटोले म्हणाले, "मी अक्षय कुमार आणि अमिताभ बच्चन यांच्या विरोधात नाही, तर त्यांच्या कामाच्या विरोधात बोललो आहे." (Nana Patole)

Maharashtra congress leader Nana Patole commented on Akshay Kumar and Amitabh Bachchan. | नाना पटोलेंचा अक्षय-अमिताभ यांच्यावर पुन्हा निशाणा, आता म्हणाले - "ते खरे हिरो नाहीत, असते तर..."

नाना पटोलेंचा अक्षय-अमिताभ यांच्यावर पुन्हा निशाणा, आता म्हणाले - "ते खरे हिरो नाहीत, असते तर..."

googlenewsNext

मुंबई - अभिनेता अक्षय कुमार आणि अमिताभ बच्चन यांचे चित्रपट महाराष्ट्रात पदर्शित होऊ दाणार नाही, तसेच त्यांच्या चित्रपटांचे शूटिंगही बंद पाडू, असा इशारा देणारे महाराष्ट्र काँग्रेसचे अध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांनी आता सफाई दिली आहे. ते म्हणाले, आपण अक्षय कुमार आणि अमिताभ बच्चन यांच्या विरोधात नाही. तर त्यांच्या कामाच्या विरोधात आहोत. मात्र, सफाई देतानाच पटोले यांनी या दोन्ही अभिनेत्यांवर पुन्हा एकदा निशाणा साधला आहे. "अक्षय कुमार आणि अमिताभ बच्चन हे खरे हिरो नाहीत. असते तर ते संकटाच्या काळात सामान्य जनतेसोभत उभे राहिले असते, असे नाना पटोले यांनी म्हटले आहे." (Maharashtra congress leader Nana Patole commented on Akshay Kumar and Amitabh Bachchan.)

पटोले म्हणाले, "मी अक्षय कुमार आणि अमिताभ बच्चन यांच्या विरोधात नाही, तर त्यांच्या कामाच्या विरोधात बोललो आहे. ते खरे हिरो नाहीत. जर ते खरे हिरो असते, तर ते संकटाच्या काळात सामान्य लोकांसोबत उभे राहिले असते. जर त्यांना कागदी वाघ बनूनच राहायचे असेल तर आम्हाला काहीही अडचण नाही."

नाना पटोले यांच्या पाठीशी संपूर्ण काँग्रेस, अभिनेत्यांबद्दलच्या वक्तव्यावरून वाद

"आम्ही मागे हटलेलो नाही. जेव्हा त्यांचे चित्रपट प्रदर्शित होतील अथवा ते दिसतील, तेव्हा आम्ही त्यांना काळे झेंडे दाखवू. आम्ही लोकशाही मार्गावर चालू. आम्ही 'गोडसे वाले' नाही तर 'गांधी वाले' आहोत," असेही पटोले म्हणाले.

काय म्हणाले होते नाना पटोले? -
अभिनेते अमिताभ बच्चन आणि अक्षय कुमार यांनी पेट्रोल आणि डिझेलच्या दरवाढीबाबत केलेल्या जुन्या ट्विट्सचा संदर्भ देत नाना पटोले म्हणाले होते, "काँग्रेस सरकारच्या काळात पेट्रोल-डिझेल दरवाढीवरून सारखी टिवटिव करणाऱ्या अमिताभ बच्चन आणि अक्षय कुमार यांना आता पेट्रोलची दरवाढ दिसत नाही का? त्यावेळी ६० रुपये पेट्रोलची किंमत असताना हे सेलिब्रिटी शंख करत होते. मग आता पेट्रोलच्या दरानं शंभरी गाठलेली असताना सर्वसामान्य जनतेची पिळवणूक होत आहे. अशावेळी हे सेलिब्रिटी शांत का? केंद्रात मोदींचं सरकार आहे म्हणून हे चिडीचूप झालेत का?" अशा प्रश्नांची सरबत्ती करत नाना पटोले यांनी अमिताभ आणि अक्षय यांच्यावर टीका केली होती. 

अमिताभ बच्चन व अक्षय कुमार यांना रिपाइं देणार सुरक्षा; नाना पटोलेंना रामदास आठवलेंचा इशारा

यासोबतच महाराष्ट्राच्या सर्वसामान्य जनतेची आज पेट्रोल-डिझेलच्या दरवाढीमुळे परवड होत असताना अमिताभ व अक्षय यांची चुप्पी योग्य नाही. त्यांना महाराष्ट्रात शूटिंग करण्याचा अधिकार नाही. राज्यात त्यांचे जिथे शूटिंग सुरू असेल तेथे ते बंद पाडण्याची व्यवस्था आम्ही करू. तसेच त्यांचे चित्रपटही प्रदर्शित होऊ देणार नाही, असा थेट इशारादेखील नाना पटोले यांनी दिला होता.

 

Web Title: Maharashtra congress leader Nana Patole commented on Akshay Kumar and Amitabh Bachchan.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.