शहरं
Join us  
Trending Stories
1
नरहरी झिरवाळ यांच्या 'त्या' फोटोमागचं सत्य भलेतच; खुद्द झिरवाळांनी केला खुलासा
2
Rahul Gandhi : "काँग्रेसनेही चुका केल्या, येत्या काळात राजकारणात..."; राहुल गांधींचं मोठं विधान
3
शिवाजी पार्कचे बुकिंग केले मनसेने, सभा मात्र मोदींची होणार, १७ मे रोजी महायुतीची रॅली
4
२८,२०० मोबाईल हँडसेट ब्लॉक करण्याचे आदेश, २० लाख नंबर्सचं पुन्हा होणार व्हेरिफिकेशन; कारण काय?
5
'सरफरोश'ची २५ वर्ष! आमिर खान- सुकन्या मोनेंची भेट.. म्हणाल्या, 'त्याचं मराठी बोलणं अन्...'
6
धक्कादायक! आई, पत्नीची केली हत्या, तीन मुलांना छतावरून फेकून केलं ठार, अखेरीस स्वत:ही संपवलं जीवन
7
"आम्ही बांगड्या घालून बसलो नाही"; गुन्हा दाखल होताच नवनीत राणांचा ओवीसींना इशारा
8
'फक्त तीन टक्के राजकारणी...'; ईडी कारवायांवरुन मोदींचे महत्त्वाचे विधान
9
आयर्लंडचा पाकिस्तानवर सनसनाटी विजय, टी-२० वर्ल्डकपआधी नोंदवला धक्कादायक निकाल
10
पोलीस बाजूला ठेवून जनतेत येऊन दाखवा; उद्धव ठाकरेंचं नरेंद्र मोदींना चॅलेंज
11
"मोदींना दिल्लीत पाठवायचं ठरवलंय अन्.."; मुरलीधर मोहोळ यांच्या प्रचारसभेत प्रवीण तरडेंचं भाषण गाजलं
12
चांगल्या पगाराची नोकरी सोडली, नारळाचं कवच हाती घेतलं अन् मुंबईची पोरगी कोट्यधीश बनली
13
Mutual Fund मध्ये गुंतवणूक करणाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी; KYC स्टेटस त्वरित चेक करा 
14
IIT मधून शिक्षण, ओबामांच्याही टीमचा होते भाग; गुरुराज देशपांडेंनी ₹२०८ कोटींचं केलं दान; सुधा मूर्तींशी आहे कनेक्शन
15
Vinayak Chaturthi 2024: संकटमुक्तीसाठी हनुमान चालीसा म्हणता, तशी विनायकीनिमित्त गणेश चालीसा म्हणा!
16
भेंडवळच्या प्रसिद्ध घटमांडणीचा अंदाज जाहीर, पाऊस, पिकांबाबत केलं असं भाकित 
17
होणाऱ्या बायकोचा चेहरा लपवला, 'छोटा भाईजान' अब्दूने अखेर साखरपुडा केला
18
आजचे राशीभविष्य - ११ मे २०२४; कोणत्याही अवैध कामापासून दूर राहा, नाहीतर...
19
डॉक्टर पत्नीला २ प्रियकरांसोबत हॉटेलमध्ये आक्षेपार्ह अवस्थेत पकडलं; पतीनं बेदम मारलं
20
Tarot Card: आगामी काळात यशप्राप्तीचे संकेत; पण अर्ध्या हळकुंडाने पिवळे होऊ नका; वाचा साप्ताहिक भविष्य!

Maharashtra CM: दोन काँग्रेसचे, दोन राष्ट्रवादीचे... उद्धव ठाकरेंसोबत 'हे' चार नेते घेणार मंत्रिपदाची शपथ!

By ऑनलाइन लोकमत | Published: November 28, 2019 1:07 PM

गेल्या अनेक दिवसांपासून चर्चेत असलेलं महाराष्ट्र विकास आघाडीचं सरकार अखेर सत्तेत येणार आहे.

मुंबई- गेल्या अनेक दिवसांपासून चर्चेत असलेलं महाराष्ट्र विकास आघाडीचं सरकार अखेर सत्तेत येणार आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आज मुख्यमंत्रिपदाची शपथ घेणार असून, त्यांच्यासोबत काँग्रेस-राष्ट्रवादीचे चार मंत्री शपथ घेणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसकडून छगन भुजबळ आणि जयंत पाटील यांना मंत्रिपद मिळणार असून, काँग्रेसकडून बाळासाहेब थोरात आणि अशोक चव्हाण यांची मंत्रिपदी वर्णी लागू शकते, अशी जोरदार चर्चा आहे. तीन तारखेनंतर मंत्रिमंडळाचा विस्तार होणार असून, अजित पवार उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेतील, अशी माहितीसुद्धा खात्रीलायक सूत्रांकडून आता मिळाली आहे.  या किमान समान कार्यक्रमांतर्गत काँग्रेसला 13 मंत्रिपद मिळणार असल्याची माहिती मिळाली आहे. यात 9 कॅबिनेट आणि 4 राज्यमंत्रिपदांचा समावेश आहे. तर शिवसेनेच्या वाट्याला 11 कॅबिनेट आणि 4 राज्यमंत्रिपद येऊ शकतात. तसेच काँग्रेस आणि राष्ट्रवादीमध्ये गृह आणि महसूल विभागासंदर्भात चर्चा सुरू आहे. शिवसेनेला मुख्यमंत्रिपद दिल्यामुळे राष्ट्रवादीला गृह मंत्रालय मिळणार असल्याची चर्चा आहे. तर काँग्रेसला महसूल खातं देण्यासंदर्भात ठरल्याचंही सांगितलं जात आहे. राष्ट्रवादीला उपमुख्यमंत्रिपद मिळणार आहे. राष्ट्रवादीकडून जयंत पाटलांना उपमुख्यमंत्रिपद मिळण्याची शक्यता वर्तवण्यात येत असून, काँग्रेसनं उपमुख्यमंत्रिपद घेण्यास नकार दिला आहे. शिवसेनेचे 8 आणि काँग्रेस-राष्ट्रवादीच्या 9-9 नेत्यांना मंत्रिपद मिळणार आहे. शिवसेनेकडून मंत्रिपदासाठी एकनाथ शिंदे, दिवाकर रावते, सुभाष देसाई, अब्दुल सत्तार, रामदास कदम, तानाजी सावंत, दीपक केसरकर, गुलाबराव पाटील चर्चेत आहेत. तर काँग्रेसकडून अशोक चव्हाण, पृथ्वीराज चव्हाण, बाळासाहेब थोरात, विजय वडेट्टीवार, के. सी. पाडवी, विश्वजीत कदम, यशोमती ठाकूर, सतेज बंटी पाटील, सुनील केदार यांनी मंत्रिपद मिळण्याची शक्यता आहे. राष्ट्रवादीकडून धनंजय मुंडे, जितेंद्र आव्हाड, जयंत पाटील, छगन भुजबळ, हसन मुश्रीफ, अनिल देशमुख, दिलीप पाटील, मकरंद पाटील आणि राजेश टोपे यांना मंत्री बनवलं जाऊ शकतं.   

टॅग्स :Uddhav Thackerayउद्धव ठाकरेMaharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019NCPराष्ट्रवादी काँग्रेसcongressकाँग्रेस