शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
3
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
4
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
5
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
6
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
7
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
8
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
9
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
10
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
11
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
12
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
13
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
14
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
15
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
16
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
17
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
18
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
19
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
20
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
Daily Top 2Weekly Top 5

हम सब एक है! शपथविधी सोहळ्यात दिसली NDA ची 'पॉवर'; PM मोदींच्या कृतीने जिंकलं मन

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 5, 2024 19:31 IST

Maharashtra CM Swearing Ceremony : या शपथविधीसाठी NDA तील सर्व घटकपक्षाचे प्रमुख उपस्थित होते. यावेळी PM मोदींनी सर्व नेत्यांची भेट घेतली.

Maharashtra CM Swearing Ceremony : महाराष्ट्राच्या राजकारणासाठी आज मोठा दिवस आहे. विधानसभा निवडणुकीत ऐतिहासिक विजयानंतर आज(दि.5) अखेर महायुती सरकारचा शपथविधी सोहळा पार पडला. देवेंद्र फडणवीसांनी महाराष्ट्रचे नवे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली आहे. तर, शिवसेना(शिंदे गट) प्रमुख एकनाथ शिंदे यांनी आणि राष्ट्रवादी काँग्रेस(अप) प्रमुख अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. 

'मी पुन्हा येईन' ही घोषणा रोज व्हायला हवी, कारण...; अमृता फडणवीसांची शपथविधीनंतर प्रतिक्रिया

मुंबईतील आझाद मैदानावर पार पडलेल्या या भव्य-दिव्य शपथविधी सोहळ्यात देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शाहांसह अनेक केंद्रीय मंत्री आणि 22 राज्यांचे मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्री मंचावर उपस्थित होते. या कार्यक्रमाला NDA तील प्रमुख घटकपक्ष असलेल्या JDU चे प्रमख नितीश कुमार, TDP प्रमुख चंद्राबाबू नायडू, LJP प्रमुख चिराग पासवान, जनसेनेचे पवन कल्याण अन् कुमारस्वामींसह अनेकांनी या सोहळ्याला हजेरी लावली होती. 

मंचावर दिसील NDA ची पॉवरयावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी मंचावर येताच या सर्व नेत्यांची भेट घेतली. यामध्ये प्रामुख्याने चंद्राबाबू नायडू आणि नितीश कुमारांवर सर्वांच्या नजरा होत्या. पीएम मोदींनी या दोघांची भेट घेत काही सेकंदाचा संवादही साधला. लोकसभा निवडणुकीपासून पीएम मोदी कुठल्याही सार्वजनिक कार्यक्रमांमध्ये या दोन्ही नेत्यांना जास्त महत्व आणि मान देताना दिसतात. याचे कारण म्हणजे, लोकसभा निवडणुकीत भाजपला स्वबळावर सत्ता स्थापन करता आलेली नाही. या दोन्ही पक्षांच्या मदतीनेच केंद्रात नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधान झाले आहेत.

शपथेआधी एकनाथ शिंदेंनी दोन गुरूंना केलं वंदन; मोदी-शाहांसह १३ कोटी जनतेचे मानले आभार

लोकसभा निवडणुकीनंतर विरोधकांकडून सातत्याने सरकार पडणार, नितीश कुमार आणि चंद्राबाबू पाठिंबा काढून घेणार, अशी टीका केली जाते. पण, आजच्या कार्यक्रमात या सर्वांनी एकत्र येत 'हम सब एक है', असे दाखवून दिले आहे. फक्त हाच कार्यक्रम नाही, तर चंद्राबाबू नायडूंच्या शपथविधी सोहळ्यातही पीएम मोदींनी हजेरी लावली होती. तिथेही NDA तील सर्व प्रमुख पक्षांचे नेते उपस्थित होते. यावरुनच NDA मजबूत असल्याचे भाजपकडून सातत्याने सांगितले जात आहे. 

महाराष्ट्राचा महायुतीचा ऐतिहासिक विजयमहाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी २० नोव्हेंबर रोजी मतदान झाले होते, तर 23 नोव्हेंबरला निकाल लागलाहोता. महायुतीने २८८ पैकी २३०+ जागा जिंकून ऐतिहासिक विजय मिळवला आहे. यामध्ये भाजप १३२+, शिवसेना शिंदेगट 58 आणि राष्ट्रवादी अजित पवार गाटाला ४१ जागा मिळाल्या. तर, महाविकास आघाडीला ५० चा आकडाही पार करता आला नाही. या निकालानंतर मुख्यमंत्री कोणा होणार, हा सर्वात मोठा प्रश्न राज्यापुढे होता. पण, आज अखेर महाराष्ट्राला नवा मुख्यमंत्री मिळला आहे. 

'देवेंद्र 3.0' ची सुरुवात! देवेंद्र फडणवीसांनी घेतली मुख्यमंत्रिपदाची शपथ; शिंदे-अजितदादा उपमुख्यमंत्री

टॅग्स :maharashtra assembly election 2024महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४MahayutiमहायुतीDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसAjit Pawarअजित पवारEknath Shindeएकनाथ शिंदेNarendra Modiनरेंद्र मोदी