शहरं
Join us  
Trending Stories
1
ईडीचे कार्यालय असलेल्या कैसर-ए-हिंद इमारतीला भीषण आग; पहाटे २.३० वाजल्यापासून अद्याप धुमसतेय...
2
पहिलाच प्रकार! बँक अकाऊंट सांभाळता सांभाळता डीमॅट अकाऊंट खाली झाले; रातोरात ५ लाखांचे शेअर वळते केले
3
पाकची कोंडी करण्यासाठी हालचाली; अमेरिकेसह विविध देशांचा पाठिंबा मिळविण्यासाठी संपर्क साधणे सुरू
4
पाकिस्तानी दहशतवाद्यांना आता धास्ती 'अननोन गनमॅन'ची; दोन वर्षांत २० ते २५ अतिरेक्यांचा केला खात्मा
5
आजचे राशीभविष्य, २७ एप्रिल २०२५: नव्या कार्याचा आरंभ न करणे हितावह राहील
6
बिलावल बरळले; पाणी रोखले तर भारतीयांच्या रक्ताचे पाट वाहतील
7
काश्मीरमध्ये मोठे कोंबिंग ऑपरेशन, दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या ४४६ पेक्षा जास्त लोकांना घेतले ताब्यात
8
दहशतीच्या भयाण रात्री खुर्शीदभाईंनी आम्हा पाच कुटुंबांना दिला घरात आश्रय; आमच्यासाठी धावून आलेले देवदूतच
9
बेकायदा पार्किंगबाबत जनजागृती करा; उच्च न्यायालयाची ज्येष्ठ नागरिकांना सूचना
10
पर्यटकांना होऊ शकतो घाबरण्याचा आजार; मानसिक आरोग्यावर घातक परिणाम होऊ शकतात
11
पाकचे तीन तुकडे होणे गरजेचे, तर युद्ध क्षमता कमी होईल..!
12
पाकिस्तानला पाण्यासाठी भीक मागायला लावायची असेल तर...
13
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
14
'झेलम'ला अचाकच पूर आला, पाकिस्तानात एकच गोंधळ उडाला; पाक मीडियानं भारतावर मोठा आरोप केला! नेमकं काय घडलं?
15
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
16
चोपड्यात थरार...! प्रेमविवाह केलेल्या मुलीला बापानेच गोळी झाडून संपवलं, जावई जखमी  
17
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
18
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
19
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
20
पहलगाम ईफेक्ट : सूक्ष्म नजर ठेवा, सतर्क रहा; भारतीय रेल्वेला अलर्ट!

उद्धव ठाकरे शपथविधीः महाराष्ट्रात 'उद्धवपर्वा'चा उदय; बाळासाहेबांचं स्वप्न साकार, शिवसेनेच्या नेतृत्वात सरकार!

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 28, 2019 18:45 IST

Uddhav Thackeray's Oath Ceremony: 'मी उद्धव बाळासाहेब ठाकरे ईश्वरसाक्ष शपथ घेतो की...' राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी उद्धव ठाकरे यांना पद आणि गोपनीयतेची शपथ दिली.

ठळक मुद्देबाळासाहेब ठाकरे यांचं स्वप्न आज त्यांचे चिरंजीव उद्धव ठाकरे यांनी पूर्ण करून दाखवलं.शिवाजी पार्क मैदानावर उद्धव ठाकरे यांनी महाराष्ट्र राज्याचे २९ वे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली.  

महाराष्ट्राच्या विधानसभेवर भगवा फडकवण्याचं शिवसेनाप्रमुख दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांचं स्वप्न आज त्यांचे चिरंजीव उद्धव ठाकरे यांनी पूर्ण करून दाखवलंच; पण राज्याच्या मुख्यमंत्रिपदाची धुराही स्वतःच्या खांद्यावर घेत त्यांनी शिवसेनेच्या सोनेरी इतिहासात नवा अध्याय रचला आहे. ज्या शिवाजी पार्क मैदानात बाळासाहेबांनी शिवसेनेचं रोप रुजवलं आणि वाढवलं, त्याच शिवाजी पार्क मैदानावर उद्धव ठाकरे यांनी महाराष्ट्र राज्याचे २९ वे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली.  

'छत्रपती शिवाजी महाराजांना वंदन करून आणि माझ्या आई-वडिलांचे स्मरण करून मी उद्धव बाळासाहेब ठाकरे ईश्वरसाक्ष शपथ घेतो की, कायद्याद्वारे स्थापित झाले आहे अशा भारतीय संविधानाबद्दल मी खरी श्रद्धा व निष्ठा बाळगेन. मी भारताची सार्वभौमता व एकात्मता उन्नत राखेन. मी महाराष्ट्र राज्याचा मुख्यमंत्री म्हणून माझी कामे निष्ठापूर्वक व शुद्ध बुद्धीने पार पाडेन...' असे उद्गार संध्याकाळी ६.४०च्या मुहूर्तावर शिवाजी पार्कवरच्या भव्यदिव्य रंगमंचावरून घुमले आणि तमाम शिवसैनिक शहारले, थरारले. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी उद्धव ठाकरे यांना पद आणि गोपनीयतेची शपथ दिली. त्याआधी त्यांनी शिवाजी पार्कातीलच बाळासाहेबांच्या स्मृतिस्थळावर जाऊन आपल्या वडिलांना वंदन केलं. 

महाराष्ट्राच्या समाजकारणावर आणि राजकारणावर अमीट छाप उमटवणाऱ्या, राज्याचा 'रिमोट कंट्रोल' मानल्या जाणाऱ्या, मात्र सत्तेच्या खुर्चीपासून दूर राहिलेल्या बाळासाहेब ठाकरे यांच्या घराण्यातील व्यक्ती थेट राज्याच्या मुख्यमंत्रिपदी विराजमान होत असल्यानं आजचा शपथविधी हा शिवसेनेसाठी अनुपम्य सोहळाच ठरला. या सोहळ्याचे साक्षीदार होण्यासाठी शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादीचे राष्ट्रीय स्तरावरचे आणि राज्यातील प्रमुख नेते, त्यांच्या मित्रपक्षांचे प्रमुख, मनसेचे अध्यक्ष आणि उद्धव ठाकरे यांचे चुलतभाऊ राज ठाकरे यांच्यासह हजारो शिवसैनिक उपस्थित होते. याआधी २४ वर्षांपूर्वी शिवसेना नेते मनोहर जोशी यांनी याच शिवाजी पार्क मैदानात मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली होती.

महाराष्ट्र विधानसभेची निवडणूक भाजपा आणि शिवसेना या जुन्या मित्रांनी, भावांनी एकत्र लढवली होती. २०१४ ते २०१९ या पाच वर्षांत ही युती केंद्रात आणि राज्यात सत्तेतही होती. मात्र, मुख्यमंत्रिपदावरून त्यांच्यात खटका उडाला आणि हा वाद तुटेपर्यंत ताणला गेला. त्यानंतर, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस या भिन्न विचारधारेच्या पक्षांना सोबत घेऊन 'महाराष्ट्र विकास आघाडी'च्या झेंड्याखाली उद्धव ठाकरे यांनी सत्तास्थापनेचं समीकरण जुळवलं आणि आज शिवसेनेच्या नेतृत्वाखाली राज्यात नवं सरकार स्थापन झालं.

महाराष्ट्र विकास आघाडीचा सत्तावाटपाचा फॉर्म्युला जवळपास निश्चित झाला आहे. शिवसेनेला मुख्यमंत्रिपदासाठी ११ कॅबिनेट आणि ५ राज्यमंत्री, राष्ट्रवादीला ११ कॅबिनेट आणि ४ राज्यमंत्री, काँग्रेसला ९ कॅबिनेट आणि ३ राज्यमंत्री, तर मित्रपक्षांना एक कॅबिनेट आणि १ राज्यमंत्रिपद दिलं जाणार आहे.

टॅग्स :Maharashtra Governmentमहाराष्ट्र सरकारUddhav Thackerayउद्धव ठाकरेSharad Pawarशरद पवारShiv SenaशिवसेनाMaharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019Chief Ministerमुख्यमंत्री