शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
4
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
5
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
6
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
7
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
8
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
9
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
10
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
11
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
12
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
13
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
14
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
15
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
16
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
17
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
18
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
19
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
20
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

Maharashtra CM : हजेरीसाठी घेतलेल्या सह्यांच्या पत्राचा गैरवापर; राष्ट्रवादीचा अजित पवारांवर गंभीर आरोप

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 23, 2019 11:18 IST

अजित पवार यांना बहुमतासाठी 39 आमदार लागणार आहेत. भाजपाकडे काही अपक्ष आहेत. हा आकडा 36 वर येऊ शकतो. यामुळे राष्ट्रवादीचे किती आमदार अजितदादांसोबत जातात याकडे लक्ष लागले आहे.

मुंबई : महाराष्ट्राच्या राजकारणात आज सकाळीच आलेल्या भूकंपामुळे मोठे हादरे बसले आहेत. राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी आज उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी आपला हात नसल्याचे स्पष्ट केले आहे. यातच राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक यांनी अजित पवारांवर गंभीर आरोप केला आहे. 

अजित पवार यांच्यासोबत शपथविधीला गेलेले राष्ट्रवादीचे आमदार पुन्हा शरद पवार यांना भेटण्यासाठी आलेले आहेत. त्यांना फसवून तिथे नेण्यात आल्याचे त्यांनी पवारांना सांगितले. अजित पवार यांनी कालच्या बैठकीच्या हजेरीच्या सह्यांचे पत्र नेले. त्याचा गैरवापर केला आणि शपथ घेतल्याचा आरोप नवाब मलिक यांनी केला. तसेच राष्ट्रवादीचे सर्व आमदार शरद पवारांच्या पाठीशी असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच मुख्यमंत्री शिवसेनेचाच होणार असल्याचे त्यांनी सांगितले. 

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि शरद पवार आज दुपारी 12.30 वाजता संयुक्त पत्रकारपरिषद घेणार आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे. अजित पवार यांचा हा वैयक्तिक निर्णय आहे. याला पक्षाचा पाठिंबा नसल्याचं पवारांनी म्हटलं आहे. तसेच राष्ट्रवादीच्या आमदारांना सायंकाळी 4.30 वाजता बैठकीसाठी बोलावण्यात आले आहे.

अजित पवार यांना बहुमतासाठी 39 आमदार लागणार आहेत. भाजपाकडे काही अपक्ष आहेत. हा आकडा 36 वर येऊ शकतो. यामुळे राष्ट्रवादीचे किती आमदार अजितदादांसोबत जातात याकडे लक्ष लागून राहिलेले असताना राष्ट्रवादीचे कळवा मुंब्र्यातील नेते आणि आमदार जितेंद्र आव्हाड यांनी ते कोणासोबत आहेत हे ट्विट करून स्पष्ट केले आहे. भाजपाच्या या धक्कादायक पावलामुळे शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी सतर्क झाले असून सर्वांनी मोठी खबरदारी घेण्यास सुरूवात केली आहे. शिवसेनेने त्यांच्या नेत्यांना आमदार असलेल्या हॉटेलमध्ये पाठविले आहे. तर काँग्रेसही आमदारांचा कानोसा घेतला आहे. 

मी मरेपर्य़ंत शरद पवार साहेबांसोबत  असल्याचे स्पष्ट करताना त्यांनी मी शिव फुले शाहू आंबेडकरी विचारांचा असल्याचे आव्हाड यांनी म्हटले आहे.

टॅग्स :Ajit Pawarअजित पवारNCPराष्ट्रवादी काँग्रेसDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसnawab malikनवाब मलिकBJPभाजपाMaharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019