सर्वोच्च न्यायालयाच्या आजच्या निर्णयामुळे एका ऐतिहासिक पर्वाचा प्रारंभ; CM शिंदेंची प्रतिक्रिया

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 11, 2023 14:10 IST2023-12-11T14:08:56+5:302023-12-11T14:10:31+5:30

पाकव्याप्त काश्मीरमध्ये निवडणूक घेण्याचे सुतोवाच केंद्राने केले आहेच. तो प्रदेश भारतात सामील करुन घेण्याच्या दृष्टीनेही आता प्रयत्न होतील हे नक्की, असं एकनाथ शिंदे म्हणाले. 

Maharashtra CM Eknath Shinde has reacted to the Supreme Court's decision regarding Article 370 | सर्वोच्च न्यायालयाच्या आजच्या निर्णयामुळे एका ऐतिहासिक पर्वाचा प्रारंभ; CM शिंदेंची प्रतिक्रिया

सर्वोच्च न्यायालयाच्या आजच्या निर्णयामुळे एका ऐतिहासिक पर्वाचा प्रारंभ; CM शिंदेंची प्रतिक्रिया

जम्मू काश्मीरला विशेष राज्याचा दर्जा देणारे कलम ३७०(Jammu-Kashmir Article 370) हटवण्याचा केंद्र सरकारचा निर्णय कायदेशीरदृष्ट्या योग्य होता, असा ऐतिहासिक निकाल आज सर्वोच्च न्यायालयाने सुनावला आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या या निर्णयानंतर देशभरातून विविध प्रतिक्रिया येत आहे. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यावर प्रतिक्रिया दिली आहे.

सर्वोच्च न्यायालयाच्या आजच्या निर्णयामुळे एका ऐतिहासिक पर्वाचा प्रारंभ होत आहे. देशाची राजकीय एकात्मता राखणारे पाऊल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उचलले होते, ते कोर्टाने आज वैध ठरवले त्याबद्दल मी नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शाह यांचे अभिनंदन करतो, असं एकनाथ शिंदे म्हणाले. जम्मू काश्मीर मधील दहशतवाद संपून ते देशाच्या मुख्य प्रवाहात सामील होण्याचा मार्ग आता मोकळा झाला आहे. तिथे आता मुक्त वातावरणात निवडणूक होईल, असंही एकनाथ शिंदेंनी सांगितले.

मला एक दिवस पंतप्रधान करा, मी काश्मीरवर लादलेले कलम ३७० रद्द करतो, असे हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे म्हणत. नरेंद्र मोदी हिंमतीने तो निर्णय घेऊन बाळासाहेबांची इच्छा पूर्ण केली. काही विघ्नसंतोषी मंडळी काश्मीरला पुन्हा वेगळे पाडू इच्छितात. मात्र त्यांचे हे प्रयत्न सर्वोच्च न्यायालयाने हाणून पाडले आहेत. पाकव्याप्त काश्मीरमध्ये निवडणूक घेण्याचे सुतोवाच केंद्राने केले आहेच. तो प्रदेश भारतात सामील करुन घेण्याच्या दृष्टीनेही आता प्रयत्न होतील हे नक्की, असं एकनाथ शिंदे म्हणाले. 

दरम्यान, सर्वोच्च न्यायालयाच्या या निर्णयाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही स्वागत केले. PM मोदींनी आज #NayaJammuKashmir हॅशटॅगसह ट्विट केले की, 'कलम ३७० रद्द करण्याबाबतचा सर्वोच्च न्यायालयाचा आजचा निर्णय ऐतिहासिक असून, या निर्णयामुळे संसदेने ५ ऑगस्ट २०१९ रोजी घेतलेला निर्णय घटनात्मकदृष्ट्या कायम राहील, असं नरेंद्र मोदी म्हणाले. 'आजचा निर्णय म्हणजे, जम्मू-काश्मीर आणि लडाखमधील आपल्या लोकांसाठी नवी आशा, प्रगती आणि एकतेची घोषणा आहे. न्यायालयाने आपल्या प्रगल्भ ज्ञानाने एकतेचे मूलतत्त्व बळकट केले, जे एक भारतीय म्हणून आपण सर्वांपेक्षा प्रिय आणि मोठे आहे. मी जम्मू, काश्मीर आणि लडाखच्या लोकांना खात्री देऊ इच्छितो की, तुमची स्वप्ने पूर्ण करण्यासाठी आम्ही वचनबद्ध आहोत, असं नरेंद्र मोदींनी सांगितले. 

Web Title: Maharashtra CM Eknath Shinde has reacted to the Supreme Court's decision regarding Article 370

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.