मुख्यमंत्री निघाले दावोसला! राज्यात परकीय गुंतवणुकीवर देवेंद्र फडणवीस देणार भर

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 17, 2025 16:30 IST2025-01-17T16:29:49+5:302025-01-17T16:30:41+5:30

या दौर्‍यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे भरगच्च कार्यक्रम दावोस दौर्‍यात राहणार आहेत. अनेक जागतिक नेत्यांच्याही ते भेटी घेणार आहेत.

Maharashtra CM Devendra Fadnavis will participate in the World Economic Forum in Davos from January 20 to 24 | मुख्यमंत्री निघाले दावोसला! राज्यात परकीय गुंतवणुकीवर देवेंद्र फडणवीस देणार भर

मुख्यमंत्री निघाले दावोसला! राज्यात परकीय गुंतवणुकीवर देवेंद्र फडणवीस देणार भर

मुंबई - राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे येत्या २० ते २४ जानेवारी या काळात दावोसमध्ये वर्ल्ड इनॉकॉनिक फोरममध्ये सहभागी होणार आहेत. यासाठी १९ तारखेला पहाटे ते मुंबईतून रवाना होणार आहेत. महाराष्ट्रात परकीय गुंतवणूक आणण्याच्या दृष्टीने मुख्यमंत्र्यांचा हा दौरा अत्यंत महत्त्वपूर्ण असणार आहे.

यापूर्वी देवेंद्र फडणवीस हे त्यांच्या पहिल्या कार्यकाळात ३ वेळा दावोसमध्ये वर्ल्ड इनॉकॉनिक फोरममध्ये सहभागी झाले होते. त्यावेळी औद्योगिक विकासात महाराष्ट्र पाचव्या क्रमांकावरुन पहिल्या क्रमांकावर आला होता. राज्यात २०१४-१९ काळात मॅग्नेटिक महाराष्ट्राचे दोन वेळा आयोजन झाले. आताही या दौर्‍यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे भरगच्च कार्यक्रम दावोस दौर्‍यात राहणार आहेत. अनेक जागतिक नेत्यांच्याही ते भेटी घेणार आहेत. या दौर्‍यात उद्योगमंत्री उदय सामंत तसेच एमआयडीसी, एमएमआरडीए, सिडको अधिकार्‍यांचे शिष्टमंडळ त्यांच्यासोबत असेल.

डेटा सेंटर्स, ऑटोमोबाईल्स, सेमिकंडक्टर, ईव्ही, इलेक्ट्रॉनिक्स, स्टील, अन्नप्रक्रिया, वस्त्रोद्योग, औषधी आणि पायाभूत सुविधा इत्यादी क्षेत्रात मोठ्या संख्येने सामंजस्य करार या दौर्‍यात होणार आहेत. महाराष्ट्राची १ ट्रिलियन डॉलर अर्थव्यवस्था करण्यासाठी मोठ्या प्रमाणात गुंतवणूक राज्यात आणण्याचा प्रयत्न या दौर्‍यातून साध्य करण्याचा प्रयत्न होईल आणि यातून रोजगारनिर्मितीचेही उद्दिष्ट साध्य केले जाणार आहे. महाराष्ट्राने विविध प्रकारची धोरणे अलिकडेच जाहीर केली आहेत, त्याबाबत सुद्धा ते विविध व्यावसायिक बैठकांमध्ये अवगत करतील. महाराष्ट्राच्या सर्वांगिण विकासाला चालना देण्याचा मुख्यमंत्री फडणवीस दावोस दौऱ्यातून प्रयत्न करणार आहेत. 

समतोल विकासावर भर

दरम्यान, राज्यात गुंतवणूक आणताना किंवा पायाभूत सुविधांचा विकास करताना आम्ही सातत्याने चौफेर विकास कसा होईल आणि प्रादेशिक समतोल कसा राखला जाईल, यावर भर दिला. या दावोस दौर्‍यात सुद्धा महाराष्ट्राच्या सर्व क्षेत्रात आणि सर्व विभागात गुंतवणूक कशी येईल, यादृष्टीने आमचे प्रयत्न असतील अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. 

Web Title: Maharashtra CM Devendra Fadnavis will participate in the World Economic Forum in Davos from January 20 to 24

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.