शहरं
Join us  
Trending Stories
1
मीनाताई ठाकरेंच्या पुतळ्यावर लाल रंग टाकणारा अटकेत; कृत्याची कबुली, केले धक्कादायक खुलासे
2
Asia Cup 2025 : पाकनं UAE संघाला केलं 'आउट'! Super 4 मध्ये पुन्हा सेट झाली IND vs PAK मॅच
3
ज्येष्ठ इतिहास संशोधक गजानन भास्कर मेहेंदळे यांचे निधन; ७८ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
4
“त्रिभाषा धोरण निश्चित करण्यासाठी जनमताचा कानोसा घेणार, ५ डिसेंबरला...”: डॉ.नरेंद्र जाधव
5
आता डोनाल्ड ट्रम्प यांचं नवं नाटक...! भारताला, अफगाणिस्तान-पाकिस्तानसारख्या देशांशी जोडलं, चीनचंही नाव घेतलं!
6
IND W vs AUS W 2nd ODI : स्मृतीच्या शतकी खेळीनंतर 'क्रांती'चा भेदक मारा! टीम इंडियाचा ऑस्ट्रेलियासमोर विक्रमी विजय
7
Asia Cup 2025 : दुबईत 'सिंग इज किंग' शो! PAK विरुद्ध UAE च्या ताफ्यातून सिमरनजीतचा भांगडा
8
"वेळ येणार, नद्या आणि धरणांसह संपूर्ण काश्मीर...", पहलगाम हल्ल्याचा मास्टरमाइंड सैफुल्लाह कसूरीची भारताला धमकी!
9
दिशा पाटनीच्या घरावर गोळीबार करणाऱ्या आरोपींचं एन्काउंटर, गाजियाबादमध्ये दोन्ही शूटर ठार; अशी पटवली ओळख
10
मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्याची विटंबना; CM देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
11
Asia Cup 2025 : आधी टीम इंडियानं हँडशेक न केल्याची बोंब! आता UAE विरुद्धच्या मॅचआधी PAK चं नवं सोंग!
12
कुणबी प्रमाणपत्र कसे काढले जाते? १, २ नाही, १२ ते १६ कागदपत्रे आवश्यक; पाहा, पूर्ण प्रक्रिया
13
पंतप्रधान नरेंद्र मोदींना वाढदिवशी राहुल गांधींने पाठवले 'विशेष' पत्र; केली एक खास मागणी
14
"ह्या... हू... काय तुम्ही? कधी रे सुधारणार...? परत मी बोललो की...!" अजित दादांनी 'त्यांना' झाप-झाप झापलं
15
चलो दिल्ली! मनोज जरांगेंनी केली मोठी घोषणा; मराठा समाजाचे अधिवेशन घेणार, महत्त्वाचे कारण समोर
16
ह्युंदाईच्या या SUV ची किंमत ₹6 लाखही नव्हती, नव्या GST नंतर ₹86156 नं स्वस्त झाली; वरून ₹50000 चा डिस्काउंटही!
17
"क्लेमोर, वायर, पावडर... सगळं तयार होतं !" गुप्त माहितीने गडचिरोली पोलिसांनी रोखला भीषण कट
18
पाक आशिया कप स्पर्धेतून Out? सामान बसमध्ये अन् पाक खेळाडू हॉटेलमध्ये! नेमकं काय घडलं?
19
वाघाला घोरताना कधी पाहिलंय? VIDEO पाहून नेटकरी म्हणतायत, "हे तर आमच्या बाबांसारखेच..."

Maharashtra CM: उद्धव ठाकरे सरकारने केलं बहुमत सिद्ध; भाजपाने केला सभात्याग

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 30, 2019 15:38 IST

महाविकासआघाडीची बहुमत चाचणी पार पडली मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी विश्वासदर्शक ठराव 169 मतांनी जिंकला आहे.

ठळक मुद्देमहाविकासआघाडीची बहुमत चाचणी पार पडली. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी विश्वासदर्शक ठराव 169 मतांनी जिंकला आहे. महाविकासआघाडी सरकारचं बहुमत सिद्ध झालं आहे. मनसे, एमआयएम आणि सीपीआयएम यांचे एकूण चार आमदार तटस्थ राहीले आहेत.

मुंबई - महाविकासआघाडीची बहुमत चाचणी पार पडली असून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी विश्वासदर्शक ठराव 169 मतांनी जिंकला आहे. महाविकासआघाडी सरकारचं बहुमत सिद्ध झालं आहे. बहुमत चाचणीच्या वेळी मनसे, एमआयएम आणि सीपीआयएम यांचे एकूण चार आमदार तटस्थ राहीले आहेत. तर भाजपाने सभात्याग केला आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वातील शिवसेना-राष्ट्रवादी-काँग्रेस महाविकास आघाडीच्या सरकारची शनिवारी (30 नोव्हेंबर) शक्तिपरीक्षा होती. या बहुमत चाचणीत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे पास झाले आहेत.

अधिवेशनासाठी हंगामी अध्यक्ष म्हणून माजी विधानसभा अध्यक्ष दिलीप वळसे-पाटील यांची नियुक्ती राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी केली आहे. शनिवारी दुपारी 2 वाजता विधानसभेचे विशेष अधिवेशन सुरू झाले. या अधिवेशनात आधी मुख्यमंत्री व मंत्रिमंडळातील सदस्य यांचा परिचय झाला. भाजपा आमदारांकडून सभागृहात गदारोळ झाला.  आमदारांकडून घोषणाबाजी करण्यात आली. तसेच भाजपाने सभात्याग करत विश्वासदर्शक ठरावावर बहिष्कार टाकला. 

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या सरकारवरील विश्वासदर्शक ठराव आज विधानसभेत मांडण्यात आला. विधानसभेचे विशेष अधिवेशन यासाठी बोलविण्यात आलं होतं. मात्र संविधानाची पायमल्ली करुन सभागृहाचं कामकाज सुरू आहे. विधानसभा अधिवेशन नियमाला धरुन बोलाविले नाही, राज्यपालांनी कोणतंही समन्स काढलं नाही, त्यामुळे हे अधिवेशन असैविधानिक आहे असा आरोप माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला. 

यावेळी बोलताना देवेंद्र फडणवीस म्हणाले की, मंत्र्यांनी घेतलेली शपथ अवैध आहे. शपथ घेताना एक मसूदा असतो. राज्यपालांनी मी म्हटल्यानंतर मंत्र्यांनी अनेक नेत्यांची नावे घेतली. पहिल्यांदाच हंगामी अध्यक्ष बदलण्याचा नियमबाह्य काम केले. महाराष्ट्राच्या विधानसभेच्या इतिहासात आजपर्यंत विधानसभा अध्यक्षाची निवड होत नाही तोपर्यंत विश्वासदर्शक ठराव मांडता येत नाही असं त्यांनी सांगितले. 

तसेच गुप्त मतदानपद्धतीने निवडणूक झाली असती तर यांचा पराभव झाला असता म्हणून  विधानसभा अध्यक्षाची निवडणूक घेणं टाळलं. सुप्रीम कोर्टाचा निर्णय त्याच दिवसापुरता मर्यादित होता. सुप्रीम कोर्टाचे आदेश, नियमांची पायमल्ली होत असलेल्या सभागृहात आम्ही बसणार नाही असा निर्णय आम्ही घेत सभात्याग केला आहे. सभागृहात झालेले कामकाज नियमबाह्य असल्याने या कामकाजाला मान्यता देऊ नये असं राज्यपालांना पत्र देणार आहे अशी माहिती माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली.

सभागृहाची कामकाज सुरु झाल्यानंतर पहिल्यांदा देवेंद्र फडणवीस यांनी पॉईंट ऑफ ऑर्डर देऊन  सगळे नियम, कामकाज धाब्यावर बसवून सभागृहाचं कामकाज सुरु आहे, नियमबाह्य पद्धतीने हे सभागृह सुरु आहे. देशाच्या इतिहासात कधीही हंगामी अध्यक्ष अधिवेशन सुरु असताना बदलला नाही, विधानसभा अध्यक्षपदाची निवडणूक झाल्याशिवाय आजतागायत विश्वासदर्शक ठराव मांडला गेला नाही अशी विधानसभेची प्रथा-परंपरा आहे, बहुमत असताना का निवडणूक घेतली नाही? असा सवाल सभागृहात उपस्थित केला. तसेच रात्री उशिरा आम्हाला कळविले जाते अधिवेशन आहे, बहुमत आहे तर अधिवेशन इतक्या उशिरा बोलविण्याची गरज का पडली? आमचे आमदार उपस्थित राहू नये म्हणून हे केलं का? असा टोलाही सरकारला लगावला.  

त्यावर मंत्रिपदाची शपथ ही सभागृहातील घटना नाही, याचा अधिकार राज्यपालांना, मंत्रिमंडळाला हंगामी अध्यक्ष बदलण्याचा पूर्ण अधिकार असतो. राज्यपालांनी केलेली निवड यामुळे सभागृह चालविण्याचा अधिकार मला प्राप्त झाला आहे, आजचं अधिवेशन पूर्णपणे कायदेशीर आहे, 7 दिवसांत अधिवेशन पुन्हा घेता येतं. हंगामी विधानसभा अध्यक्ष दिलीप वळसे पाटील देवेंद्र फडणवीस यांचा दावा फेटाळला. 

टॅग्स :Maharashtra Governmentमहाराष्ट्र सरकारShiv SenaशिवसेनाNCPराष्ट्रवादी काँग्रेसcongressकाँग्रेसUddhav Thackerayउद्धव ठाकरे