शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

मराठवाड्यातील 6 आमदारांच्या गळ्यात मंत्रिपदाची माळ, 3 नवीन चेहऱ्यांना संधी...

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 15, 2024 19:05 IST

Maharashtra Cabinet Expansion : आज नागपूरमध्ये हिवाळी अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला फडणवीस सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार पार पडला.

Maharashtra Cabinet Oath Taking Ceremony : राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मंत्रिमंडळाचा पहिला विस्तार आज(दि.15) नागपूरात पार पडला. हिवाळी अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला महायुतीच्या 39 मंत्र्यांनी शपथ घेतली. राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन यांनी नवीन मंत्र्यांना पद व गोपनीयतेची शपथ दिली. या मंत्रिमंडळ विस्तारात सर्व समाजाला प्रतिनिधित्व मिळण्यासाठी जातीय समतोल साधला गेला आहे. तसेच, सर्व विभागातील आमदारांनाही संधी मिळाली आहे. यात मराठवाड्यातील 6 आमदारांचा समावेश आहे.

महायुतीच्या मंत्रिमंडळ विस्तारात मराठवाड्याच्या वाट्याला 6 मंत्रीपदे आली आहेत. यात तीन जुने चेहरे आहेत, तर तीन नवीन चेहऱ्यांचा समावेश आहे. जुन्या चेहऱ्यांमध्ये बीड जिल्ह्यातील मुंडे भाऊ-बहीण, म्हणजेच पंकजा मुंडे आणि धनंजय मुंडे यांचा समावेश आहे. पंकजा मुंडे दुसऱ्यांदा, तर धनंजय मुंडे तिसऱ्यांदा कॅबिनेट मंत्री बनले आहेत. याशिवाय, औरंगाबाद(छत्रपती संभाजीनगर) पूर्वमधून हॅट्रिक करणारे भाजप नेते अतुल सावे हेदेखील सलग तिसऱ्यांदा मंत्री झाले आहेत. 

नवीन चेहऱ्यांमध्ये शिवसेना आमदार संजय शिरसाट, भाजप आमदार मेघना बोर्डीकर आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या बाबासाहेब पाटील यांचा समावेश आहे. संजय शिरसाट औरंगाबाद(छत्रपती संभाजीनगर) पश्चिममधून सलग चौथ्यांदा निवडून आले आहेत. तर, भाजप नेत्या मेघना बोर्डीकर सलग दुसऱ्यांदा परभणी जिल्ह्यातील जिंतूर मतदारसंघातून निवडून आल्या आहेत. याशिवाय, राष्ट्रवादी काँग्रेसचे बाबासाहेब पाटीलदेखील सलग दुसऱ्यांदा लातूर जिल्ह्यातील अहमदपूरमधून निवडून आले आहेत. अशारितीने मराठवाड्यातील सहा नेत्यांच्या गळ्यात मंत्रिपदाची माळ पडली आहे.

पाहा फडणवीस सरकारमधील ३९ मंत्र्यांची यादी

 

टॅग्स :maharashtra assembly election 2024महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४MarathwadaमराठवाडाBJPभाजपाNCPराष्ट्रवादी काँग्रेसShiv Senaशिवसेना