राज्यातील ८६ लाख शेतकऱ्यांना दिवाळीपूर्वी 'बोनस' मिळणार; नमो शेतकरी महासन्मानचा पहिला हप्ता खात्यात येणार
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 10, 2023 15:44 IST2023-10-10T15:44:14+5:302023-10-10T15:44:54+5:30
Maharashtra Cabinate Meeting: केंद्र सरकार गेली काही वर्षे शेतकऱ्यांना तीन टप्प्यांत सहा हजार रुपये देत आहे. त्याच धर्तीवर राज्य सरकार देखील शेतकऱ्यांच्या खात्यात दरवर्षाला सहा हजार रुपये टाकणार आहे.

राज्यातील ८६ लाख शेतकऱ्यांना दिवाळीपूर्वी 'बोनस' मिळणार; नमो शेतकरी महासन्मानचा पहिला हप्ता खात्यात येणार
केंद्र सरकारच्या धर्तीवर राज्या सरकारनेही शेतकऱ्यांच्या खात्यात शेतकरी सन्मान निधी देण्याची घोषणा केली होती. याला आज मंजुरी देण्यात आली. पात्र शेतकऱ्यांच्या खात्यात लवकरच २००० रुपये जमा केले जाणार आहेत.
राज्य सरकारने नमो शेतकरी महासन्मान निधी योजना आणली होती. परंतू, शेतकऱ्यांना पैसे काही दिले नव्हते. आज पहिल्या हप्त्याचे दोन हजार रुपये जमा करण्यासाठी १७२० कोटी रुपयांच्या निधीस मान्यता देण्यात आली आहे.
केंद्र सरकार गेली काही वर्षे शेतकऱ्यांना तीन टप्प्यांत सहा हजार रुपये देत आहे. त्याच धर्तीवर राज्य सरकार देखील शेतकऱ्यांच्या खात्यात दरवर्षाला सहा हजार रुपये टाकणार आहे. देवेंद्र फडणवीस यांनी अर्थ संकल्प मांडताना याची घोषणा केली होती. अशा प्रकारे केंद्र आणि राज्य सरकारचे असे मिळून १२ हजार रुपये महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार आहे.
योजनेच्या कार्यान्वनासाठी महाआयटीने सॉफ्टवेअर तयार केलेले आहे. राज्यातील ८६ लाख ६० हजार शेतकऱ्यांना याचा लाभ मिळणार आहे. 'पीएम-किसान'चे निकष आणि संगणकीय माहिती 'नमो किसान'साठी वापरा, अशा सूचना राज्य शासनाने दिल्या होत्या.