शहरं
Join us  
Trending Stories
1
रिझर्व्ह बँकेचा 100, 200 रुपयांच्या नोटांबद्दल महत्त्वाचा निर्णय, सर्वसामान्यांना मिळणार दिलासा
2
परप्रांतीय प्रियकराच्या मदतीनं पतीचा काढला काटा; हत्येनंतर अपघाताचा रचला बनाव, पण...
3
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
4
रिस्क घेतली अन् दीड कोटीची सॅलरी सोडून 'तो' भारतात आला; १२ जणांच्या साथीनं उभारला उद्योग
5
आजचे राशीभविष्य, २९ एप्रिल २०२५: सार्वजनिक क्षेत्रात मानहानी होण्याची शक्यता
6
तीन देशांत एकाच वेळी वीज गायब; सर्व काही थांबले; देशभरातील वाहतूक सिग्नलवर परिणाम
7
१६ पाकिस्तानी यूट्युब चॅनेलवर सरकारची बंदी; केंद्रीय गृहमंत्रालयाच्या शिफारशींनुसार बंदी
8
त्यांची जबाबदारी माझ्यावर होती, मी माफी कशी मागू, शब्द नाहीत; मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी दिली कबुली
9
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
10
गूढ कायम.. खरं, खोट्याचा होईना उलगडा; डॉ. वळसंगकरांच्या आत्महत्येला दहा दिवस ओलांडले
11
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
12
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
13
‘लिव्ह इन’, उत्तराखंड आणि समान नागरी संहिता
14
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
15
मुलांचा ताबा देताना धर्म विचारात घेतला जाऊ शकत नाही : हायकोर्ट
16
कान टोचले, बरे झाले ! केंद्राने विशेष पत्रक काढून माध्यमांना काही मार्गदर्शक सूचना दिल्या
17
पाण्यासाठी भारत-पाक युद्ध पेटण्याची वेळ येऊन ठेपली ?
18
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!

Devendra Fadnavis: तुमच्या घरगड्यांना त्रास होतोय, म्हणून तुम्ही ED ला घरगडी म्हणता का? -  देवेंद्र फडणवीस

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 25, 2022 19:27 IST

तुम्ही म्हणजे महाराष्ट्र नाही, तुम्ही म्हणजे मराठी नाही आणि तुम्ही म्हणजे मुंबई नाही. हा संभ्रम मनातून काढून टाका असा टोला फडणवीसांनी उद्धव ठाकरेंना लगावला.

मुंबई - आम्ही पारदर्शी कारभार केला म्हणून आरशासमोर उभं राहू. तुमच्या घरगडींना ईडी बोलावतेय म्हणून ईडीला घरगडी म्हणता का? पोलिसांकडून आमच्या नेत्यांवर गुन्हे दाखल करतायेत. मग आम्ही पोलिसांना घरगडी म्हणायचं का? हे कुणीच घोषित करू नये उद्या कोण आणि परवा कोण? मग ही अक्कल संजय राऊतांनाही देणार का? अशी टीका विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर केली आहे.

देवेंद्र फडणवीस(Devendra Fadnavis) म्हणाले की, तुम्ही म्हणता आमच्यावर टीका करा, महाराष्ट्रावर नाही. महाराष्ट्रावर टीका कोण करतंय? तुम्ही म्हणजे महाराष्ट्र नाही, तुम्ही म्हणजे मराठी नाही आणि तुम्ही म्हणजे मुंबई नाही. हा सभ्रम मनातून काढून टाका. जे मुद्दे आम्ही मांडले त्याला एकही उत्तर दिले नाही. आम्ही जे आरोप मांडले ते पुराव्यासकट मांडले आहेत. त्यावर उत्तर नसल्याने असं भाषण दिले. तुमचा त्रास आमच्या लक्षात येतोय. कुठल्याही प्रश्नाचं उत्तर मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी(CM Uddhav Thackeray) दिले नाही. हे भाषण विधानसभेतलं होतं. पण शिवाजी पार्कचं भाषण झालं. त्यामुळे आम्ही या सरकारचा निषेध म्हणून सभात्याग करतो असं त्यांनी सांगत अजितदादा ७२ तास तुम्ही आमच्यासोबत होता. मुख्यमंत्री बसल्याबरोबरच तुम्ही उपयोग काय झाला असं विधान केले म्हणजे मुख्यमंत्र्यांच्या भाषणावर दादा तुम्हीच उत्तर दिलं असा टोला लगावला.  

तसेच  मेहबुबा मुफ्तीसोबत गेल्याचं उद्धव ठाकरे म्हणतात. अफजल गुरूला फाशी देऊ नका असं पत्र देणारे आज तुमच्यासोबत बसलेत. मेहबुबा मुफ्तीसंदर्भात बोलताना फडणवीस म्हणाले, आयएसएने सांगितले होते काश्मीरात निवडणुका होऊ देणार नाही. तेव्हा ६० टक्के मतदानासह निवडणुका घेऊन दाखवल्या. ज्यावेळेस फुटिरतावाद्यांनी निवडणुका झाल्या तरी सरकार बनू देणार नाही असं आव्हान दिले. तेव्हा देशाची आवश्यकता होती म्हणून भाजपा मेहबुबा मुफ्तीसोबत सरकारमध्ये गेली. परंतु आम्ही जेव्हा निवडणुका होऊ शकतात हे दाखवून दिले तेव्हा दुसऱ्या क्षणाला सत्तेला लाथ मारली असं देवेंद्र फडणवीसांनी म्हटलं.

नवाब मलिकांचं समर्थन करताय त्याचे दु:

मराठी शाळा बंद झाल्या त्याबद्दल बोलले नाही. कोविड काळात सर्वात जास्त रुग्ण आणि मृत्यू झाले त्यावर काही बोलले नाहीत. बाकी जाऊ द्या. नवाब मलिकांचे समर्थन उद्धव ठाकरे करतायेत त्याचे मनातून दु:खं आहे. नवाब मलिक यांनी बॉम्बस्फोटातील आरोपींकडून जमीन खरेदी केली. जो आरोपी आजही जेलमध्ये आहे. खोट्या कागदपत्राच्या आधारे दहशतवाद्याशी व्यवहार करतायेत. ते पैसे हसीना पारकरला चाललेत. या गोष्टींचे समर्थन ते करतात. त्याचे अतिशय दु:ख आहे असा चिमटा देवेंद्र फडणवीसांनी काढला.

टॅग्स :Uddhav Thackerayउद्धव ठाकरेDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसBudget Sessionअर्थसंकल्पीय अधिवेशनEnforcement Directorateअंमलबजावणी संचालनालय