महाराष्ट्राची तहान भागणार; जलयुक्त शिवार ते नदीजोड प्रकल्प...अजित पवारांच्या मोठी घोषणा

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 10, 2025 16:08 IST2025-03-10T16:07:35+5:302025-03-10T16:08:05+5:30

राज्यातील जलसिंचनाबाबत अजित पवारांनी अनेक मोठ्या घोषणा केल्या आहेत.

Maharashtra Budget 2025 : Jalyukt Shivar to Nadijod project Ajit Pawar's big announcement | महाराष्ट्राची तहान भागणार; जलयुक्त शिवार ते नदीजोड प्रकल्प...अजित पवारांच्या मोठी घोषणा

महाराष्ट्राची तहान भागणार; जलयुक्त शिवार ते नदीजोड प्रकल्प...अजित पवारांच्या मोठी घोषणा

Maharashtra Budget 2025 : महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री तथा वित्त व नियोजनमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी आज विधानसभेत वर्ष 2025-26 चा अर्थसंकल्प सादर केला. यात त्यांनी शेतकऱ्यांसाठी अनेक मोठ्या घोषणा केल्या आहेत. याशिवाय, राज्यातील जलसिंचन आणि नदीजोड प्रकल्पाबाबतही अजित पवारांनी अनेक घोषणा केल्या आहेत. यामुळे राज्यातील दुष्काळग्रस्त भागातील पाण्याचा प्रश्न मिटणार आहे.

महाराष्ट्र सिंचन सुधारणा कार्यक्रम
राज्यातील अपू्र्ण सिंचन प्रकल्पांची कामे पूर्ण करणे आणि महाराष्ट्र सिंचन सुधारणा कार्यक्रमाअंतर्गत कालवे वितरण प्राणातीलील सुधारेणेची सुमारे 5 हजार कोटी रुपये किमतिची कामे नाबार्ड अर्थसहाय्याच्या पहिल्या टप्प्यात मंजूर करण्यात आली आहेत.

जलयुक्त शिवार अभियान 2.0
जलयुक्त शिवार अभियान 2.0 अंतर्गत 5 हजार 818 गावांमध्ये 4 हजार 227 कोटी रुपये किमतींची 1 लाख 48 हजार 888 कामे हाती घेण्यात आली आहेत. अभियानातील सर्व कामे 2026 पर्यंत पूर्ण करण्यात येणार आहेत.

गाळमुक्त धरण, गाळमुक्त शिवार
ही योजना राज्यात कायमस्वरुपी राबवण्यात येणार आहे. 2025-26 मध्ये 6.45 कोटी घनमीटर गाळ काढण्याचे उद्दीष्ट निश्चित करण्यात आले असून, त्यासाठी 382 कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे.

नदीजोड प्रकल्प
वैनगंगा-नळगंगा नदीजोड प्रकल्पास तत्वतः मान्यता देण्यात आली आहे. या प्रकल्पाची अंदाजित किंमत 88 हजार 574 कोटी रुपये असून, प्रकल्पाचे लाभक्षेत्र 3 लाख 71 हजार 277 हेक्टर आहे. या प्रकल्पाचा लाभ नागपूर, वर्धा, अमरावती, यवतमाळ, अलोका व बुलाढाणा या सहा जिल्ह्यांना होणार आहे. प्रकल्पाच्या सर्वेक्षणाची कामे सुरू आहेत.

नार-पार-गिरणा नदीजोड
या प्रकल्पाद्वारे नाशिक व जळगाव जिल्ह्यातील 49 हजार 516 हेक्टर क्षेत्राला सिंचनाचा लाभ होणार आहे. या प्रकल्पाची अंदाजित किंमत 7 हजार 500 कोटी रुपये आहे.

दमणगंगा-एकदरे-गोदावरी नदीजोड
या नदीजोड प्रकल्पामुळे 3.55 टीएमसी पाणी उपलब्ध होणार असून, त्यामुळे जायकवाडी धरणाच्या लाभक्षेत्रातील 9 हजार 766 हेक्टर क्षेत्र पुनर्स्थापित होईल. नाशिक जिल्ह्यातील 2 हजार 978 हेक्टर क्षेत्रालाही यामुळे सिंचनाचा लाभ होणार आहे. या प्रकल्पाची अंदाजित किंमत 2 हजार 300 कोटी रुपये आहे.

तापी महापुनर्भरण
शासनाने महत्वकांशी तापी महापुनर्भरण हा 19 हजार 300 कोटी रुपये किमतीचा सिंचन प्रकल्प हाती घेतला आहे. या प्रकल्पामुळे उत्तर महाराष्ट्र आणि पश्चिम विदर्भातील खारपाण पट्ट्यातील शेतकऱ्यांना लाभ आणि त्यांच्या उत्पन्नात वाढ होईल.

पश्चिमवाहिनी नद्यांचे पाणी गोदावरी खोऱ्यात वळणार
कोकणातील उल्हास आणि वैतरणा नद्यांच्या खेऱ्यातून 54.70 टीएमसी पाणी गोदावरी खोऱ्यात वळविण्याचा प्रकल्प हाती घेण्यात आला आहे. यातून मराठवाड्यातील सुमारे 2 लाख 40 हजार हेक्टर क्षेत्राच्या सिंचनाला पाणी उपलब्ध होणार आहे. या प्रकल्पाचे सर्वेक्षण सुरू आहे.

Web Title: Maharashtra Budget 2025 : Jalyukt Shivar to Nadijod project Ajit Pawar's big announcement

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.