Maharashtra Budget 2022: वैद्यकीय शिक्षणासाठी पदव्युत्तर शिक्षण संस्थांमध्ये जागा वाढवण्याचा निर्णय
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 11, 2022 14:48 IST2022-03-11T14:48:11+5:302022-03-11T14:48:16+5:30
Maharashtra Budget 2022:राज्यातल्या महापुरुषांच्या मूळ गावातील शाळांना 1 कोटीचा निधी

Maharashtra Budget 2022: वैद्यकीय शिक्षणासाठी पदव्युत्तर शिक्षण संस्थांमध्ये जागा वाढवण्याचा निर्णय
मुंबई: आज विधीमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात राज्याचा अर्थसंकल्प सादर होत आहे. उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार वर्ष 2022-23 वर्षाचा राज्याचा अर्थसंकल्प विधीमंडळात सादर करत आहे. यावेळी सरकारने विविध क्षेत्रांबाबत मोठ्या घोषणा केल्या आहेत. यात शिक्षण विभागासाठी महत्वाच्या घोषणा करण्यात आल्या आहेत.
वैद्यकीय शिक्षण संस्थांमध्ये जागा वाढवणार
देशातल्या तरुणांना इथेच वैद्यकीय शिक्षणाची संधी मिळावी म्हणून पदव्युत्तर शिक्षण संस्थांमध्ये जागा वाढवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. मुंबईतील सेंट जॉर्ज, नाशिकमधील आरोग्य विज्ञान विद्यापीठ, नागपूरमधील बाबासाहेब आंबेडकर शिक्षण संस्था स्थापन करण्यात येणार आहे. पदव्युत्तर अभ्यासक्रमात आधुनिक तंत्रात फिजिओथेरपी तंत्राचा समावेश करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे, अशी माहिती अजित पवारांनी दिली.
लता मंगेशकर संगीत विद्यालयासाठी 100 कोटी
याशिवाय, भारतरत्न लता दीनानाथ मंगेशकर संगीत विद्यालयासाठी 100 कोटींचा निधी देण्यात येणार असल्याची माहितीही अजित पवार यांनी दिली आहे. तसंच राज्यातल्या महापुरुषांच्या मूळ गावातील शाळांना 1 कोटीचा निधी उपलब्ध करून दिला जाईल. याशिवाय, कोकण आणि परभणी कृषी विद्यापीठांना पन्नास वर्षे झाल्यामुळे दोन्ही विद्यापीठांना प्रत्येकी 50 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. तर, तिकडे हिंगोलीमध्ये बाळासाहेब ठाकरे कृषी संशोधन केंद्र उभारण्याची घोषणाही पवारांनी केली.
शालेय शिक्षण विभागासाठी 2354 कोटींची तरतूद
शालेय शिक्षण विभागासाठी 2 हजार 354 कोटी रुपयांची तरूतूद करण्यात आली आहे. शाळांच्या सोयी सुविधांसाठी जिल्हा स्तरावर 5 टक्के निधी. शिष्यवृत्ती, फेलोशिप याद्वारे सर्व विभागांच्या योजना लाभार्थ्यांच्या आधार कार्डशी जोडणार आहेत. याशिवाय, संदेशवहन उपग्रहण, ड्रोन टेक्नॉलॉजी जागतिक तंत्रज्ञानाच्या युगात युवकांना संधी मिळावी म्हणून इनोव्हेशन हब सुरु करण्यात येणार प्रत्येक विभागात स्थापना होणार. शिवाजी विद्यापीठातील केंद्रासाठी 10 कोटी आणि मुंबईच्या रत्नागिरीतील उपकेंद्रासाठी 2 कोटी रुपये देण्यात येणार असल्याचे अजित पवार म्हणाले.