शहरं
Join us  
Trending Stories
1
मौनी खासदाराचं कौतुक करणं मनसे प्रमुखांची मजबुरी, संजय राऊतांचा राज ठाकरेंवर निशाणा
2
४ जूननंतर अजित पवार मिशी काढून फिरतील; आव्हानावर श्रीनिवास पवारांचे जोरदार प्रत्त्यूत्तर
3
'राणेंचा प्रचार करायला लागतोय यातच राज ठाकरेंचा विजय'; काँग्रेस नेत्याची बोचरी टीका
4
बजरंग पूनियावर NADAची मोठी कारवाई, पॅरिस ऑलिम्पिकमध्ये खेळण्याचं स्वप्न भंगणार?
5
“छत्रपती शिवरायांचा अनादर करणारा नेता नको”; पीयूष गोयल यांची राहुल गांधींवर टीका
6
ऑस्ट्रेलियातील महिला खासदाराचा लैंगिक छळ; पोस्ट करत मांडली व्यथा, म्हणाल्या...
7
राहुल गांधी, सिद्धरामय्या यांच्या ॲनिमेटेड व्हिडिओवरून वाद; जेपी नड्डा, अमित मालवीय यांच्याविरोधात काँग्रेसची तक्रार
8
“सांगलीत विशाल पाटलांवर अन्याय झाला, काँग्रेसच्या...”; विजय वडेट्टीवार स्पष्टच बोलले
9
'राजकारणातील कुठलीही ताकद...'; अमेठीतून तिकीट न मिळाल्याने रॉबर्ट वाड्रांची भावनिक पोस्ट
10
निज्जर हत्येप्रकरणी ३ भारतीयांना झालेल्या अटकेबाबत भारताची पहिली प्रतिक्रिया, जयशंकर म्हणाले...
11
"मुलांशी बोलू नकोस", भावाचा सल्ला अन् बहीण संतापली; १४ वर्षीय तरूणीने केली हत्या
12
अभिनेते क्षितीज झारापकर यांचे निधन, ५४व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
13
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना लाभ, व्यापाऱ्यांवर लक्ष्मीकृपा; बचत वाढेल, इच्छा पूर्ण होतील
14
करिअरच्या उच्च शिखरावर असताना सोडलं बॉलिवूड; लारा दत्ता म्हणाली, 'वाढत्या वयासोबत...'
15
नुपूर शर्मा, टी राजा यांच्यासह हिंदू नेत्यांच्या हत्येचा कट रचणाऱ्या मौलवीला अटक; १ कोटींची सुपारी अन् पाककडून शस्त्रे 
16
'तेजस्वी सूर्या गुंडगिरी करतात, मासे खातात'; काँग्रेसवर टीका करताना कंगनाने भाजप नेत्याला केलं लक्ष!
17
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज अयोध्येला जाणार, रामललाचे दर्शन घेणार, रोड शो करणार!
18
भाजपा उमेदवाराच्या विरोधात आंदोलनादरम्यान शेतकऱ्याचा मृत्यू, पोलिसांनी धक्का दिल्याचा आरोप
19
मोबाईलवर मुलांशी बोलते म्हणून ओरडला, १४ वर्षांच्या मुलीने कुऱ्हाडीने मोठ्या भावाचा गळा कापला  
20
निवडणूक ‘यांची’, प्रतिष्ठा पणाला ‘त्यांची’; मुलगी, मुलगा, बहीण, सुनेसाठी करावी लागतेय अपार मेहनत

Maharashtra Budget 2021: कठीण परिस्थितीत आशेचा किरण दाखवणारा सर्वसमावेशक अर्थसंकल्प- सत्यजीत तांबे

By ऑनलाइन लोकमत | Published: March 08, 2021 8:11 PM

'कोरोना संकट काळात राज्याचे नुकसान झाले असताना आणि केंद्राकडून राज्याच्या GSTचा वाटा पूर्णतः मिळत नसतानादेखील राज्यातील प्रत्येक स्तरातील प्रत्येकाला योग्य न्याय देणारा सर्वसमावेशक अर्थसंकल्प. (Maharashtra Budget 2021)

मुंबई - आज महाविकास आघाडी सरकारतर्फे राज्याचा अर्थसंकल्प (Maharashtra Budget) सादर करण्यात आला. कोरोनासारखा कठीण काळ सोसून उभारी घेत असलेला महाराष्ट्र आजच्या अर्थसंकल्पाकडे आशा लावून होता. उपमुख्यमंत्री व अर्थमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी सादर केलेल्या या अर्थसंकल्पात महिला विकास, उद्योग, रस्ते, रेल्वे, दळणवळण आदी सर्वच क्षेत्राच्या विकासावर भर देण्यात आला आहे.

पुणे-संगमनेर-नाशिकदरम्यान जलद रेल्वे मार्ग - पुणे-संगमनेर-नाशिकदरम्यान जलद रेल्वे मार्ग सुरु करण्याची आमची बऱ्याच आधीपासूनची मागणी होती. यानुसार यादरम्यान २३५ किमी अंतराचा जलद रेल्वे मार्ग करण्याची घोषणा केल्याने, यादरम्यान प्रवास करणाऱ्या नागरिकांसाठी हा मोठा दिलासा असल्याचे महाराष्ट्र युवक काँग्रेसचे अध्यक्ष श्री. सत्यजित तांबे यांनी म्हटले आहे.

Maharashtra Budget 2021: “महाराष्ट्र थांबणार नाही”; अर्थमंत्री अजित पवारांनी सादर केलेल्या अर्थसंकल्पाचं मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंकडून भरभरून कौतुक

कुटुंबातील स्त्रीच्या नावे घर खरेदी केल्यास मुद्रांक शुल्कात सवलत -कुटुंबातील स्त्रीच्या नावे घर खरेदी केल्यास मुद्रांक शुल्कात सवलत मिळणार आहे. हा महिला सबलीकरणासाठी ऐतिहासिक निर्णय ठरेल. घरकाम करणाऱ्या महिलांसाठी जनाबाई योजनेचाही उपयोग होणार आहे. प्रत्येक जिल्ह्यात राजीव गांधी सायन्स पार्क उभारण्याची घोषणा केल्याने युवकांना यातून नक्कीच मदत होईल, अशी आशा तांबे यांनी व्यक्त केली. 

Maharashtra Budget 2021: मद्यावरील व्हॅटमध्ये ५ टक्क्यांनी वाढ, जाणून घ्या काय महागलं अन् काय केल्या घोषणा?

'कोरोना संकट काळात राज्याचे नुकसान झाले असताना आणि केंद्राकडून राज्याच्या GSTचा वाटा पूर्णतः मिळत नसतानादेखील राज्यातील प्रत्येक स्तरातील प्रत्येकाला योग्य न्याय देणारा सर्वसमावेशक अर्थसंकल्प सादर केल्याबद्दल मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे, उपमुख्यमंत्री व अर्थमंत्री अजित पवार, महसूल मंत्री बाळासाहेब थोरात आणि महाविकास आघाडी सरकार यांचे अभिनंदन.' अशा शब्दांत महाराष्ट्र प्रदेश  युवक काँग्रेसचे अध्यक्ष सत्यजीत तांबे यांनी अर्थसंकल्पाबाबत समाधान व्यक्त केले.

टॅग्स :Satyajit Tambeसत्यजित तांबेcongressकाँग्रेसbudget 2021बजेट 2021Maharashtra Budgetमहाराष्ट्र बजेट