Maharashtra Budget 2021: Comprehensive budget showing a ray of hope in difficult times says Satyajit Tambe | Maharashtra Budget 2021: कठीण परिस्थितीत आशेचा किरण दाखवणारा सर्वसमावेशक अर्थसंकल्प- सत्यजीत तांबे

Maharashtra Budget 2021: कठीण परिस्थितीत आशेचा किरण दाखवणारा सर्वसमावेशक अर्थसंकल्प- सत्यजीत तांबे

मुंबई - आज महाविकास आघाडी सरकारतर्फे राज्याचा अर्थसंकल्प (Maharashtra Budget) सादर करण्यात आला. कोरोनासारखा कठीण काळ सोसून उभारी घेत असलेला महाराष्ट्र आजच्या अर्थसंकल्पाकडे आशा लावून होता. उपमुख्यमंत्री व अर्थमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी सादर केलेल्या या अर्थसंकल्पात महिला विकास, उद्योग, रस्ते, रेल्वे, दळणवळण आदी सर्वच क्षेत्राच्या विकासावर भर देण्यात आला आहे.

पुणे-संगमनेर-नाशिकदरम्यान जलद रेल्वे मार्ग - 
पुणे-संगमनेर-नाशिकदरम्यान जलद रेल्वे मार्ग सुरु करण्याची आमची बऱ्याच आधीपासूनची मागणी होती. यानुसार यादरम्यान २३५ किमी अंतराचा जलद रेल्वे मार्ग करण्याची घोषणा केल्याने, यादरम्यान प्रवास करणाऱ्या नागरिकांसाठी हा मोठा दिलासा असल्याचे महाराष्ट्र युवक काँग्रेसचे अध्यक्ष श्री. सत्यजित तांबे यांनी म्हटले आहे.

Maharashtra Budget 2021: “महाराष्ट्र थांबणार नाही”; अर्थमंत्री अजित पवारांनी सादर केलेल्या अर्थसंकल्पाचं मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंकडून भरभरून कौतुक

कुटुंबातील स्त्रीच्या नावे घर खरेदी केल्यास मुद्रांक शुल्कात सवलत -
कुटुंबातील स्त्रीच्या नावे घर खरेदी केल्यास मुद्रांक शुल्कात सवलत मिळणार आहे. हा महिला सबलीकरणासाठी ऐतिहासिक निर्णय ठरेल. घरकाम करणाऱ्या महिलांसाठी जनाबाई योजनेचाही उपयोग होणार आहे. प्रत्येक जिल्ह्यात राजीव गांधी सायन्स पार्क उभारण्याची घोषणा केल्याने युवकांना यातून नक्कीच मदत होईल, अशी आशा तांबे यांनी व्यक्त केली. 

Maharashtra Budget 2021: मद्यावरील व्हॅटमध्ये ५ टक्क्यांनी वाढ, जाणून घ्या काय महागलं अन् काय केल्या घोषणा?

'कोरोना संकट काळात राज्याचे नुकसान झाले असताना आणि केंद्राकडून राज्याच्या GSTचा वाटा पूर्णतः मिळत नसतानादेखील राज्यातील प्रत्येक स्तरातील प्रत्येकाला योग्य न्याय देणारा सर्वसमावेशक अर्थसंकल्प सादर केल्याबद्दल मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे, उपमुख्यमंत्री व अर्थमंत्री अजित पवार, महसूल मंत्री बाळासाहेब थोरात आणि महाविकास आघाडी सरकार यांचे अभिनंदन.' अशा शब्दांत महाराष्ट्र प्रदेश  युवक काँग्रेसचे अध्यक्ष सत्यजीत तांबे यांनी अर्थसंकल्पाबाबत समाधान व्यक्त केले.

वाचकहो, 'लोकमत'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatNews ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: Maharashtra Budget 2021: Comprehensive budget showing a ray of hope in difficult times says Satyajit Tambe

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.