शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
4
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
5
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
6
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
7
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
8
राहुल गांधी एकाकी?, LPG मुद्द्यावर काँग्रेसमध्ये फूट पडल्याचं चित्र; नेते करताहेत PM मोदींचे कौतुक
9
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
10
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
11
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
12
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
13
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
14
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
15
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
16
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
17
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
18
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
19
VIDEO: सूर्याचा 'रहमान डकैत' स्टाईल FA9LA डान्स; Dhurandhar ची क्रेझ क्रिकेटच्या मैदानातही
20
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
Daily Top 2Weekly Top 5

महाराष्ट्र भाजपाच्या ट्विटरवरून चक्क स्वत:चेच सरकार आणि मुख्यमंत्र्यांवर टीका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 3, 2017 13:21 IST

सध्या केंद्र आणि राज्यात सत्तेवर असलेल्या भाजपाची सोशल मीडिया सेल सोशल मीडियावर बऱ्यापैकी अॅक्टिव्ह आहे. विरोधी पक्ष, विरोधी नेते यांच्यावर आरोपांची राळ उडवणे, तिखट भाषेत टीका करणे, विरोधकांना ट्रोल करणे असले प्रकार या सोशल मीडिया सेलकडून करण्यात येत असतात. मात्र रविवारी हे सोशल मीडियास्त्र भाजपावर उलटले.

मुंबई - सध्या केंद्र आणि राज्यात सत्तेवर असलेल्या भाजपाची सोशल मीडिया सेल सोशल मीडियावर बऱ्यापैकी अॅक्टिव्ह आहे. विरोधी पक्ष, विरोधी नेते यांच्यावर आरोपांची राळ उडवणे, तिखट भाषेत टीका करणे, विरोधकांना ट्रोल करणे असले प्रकार या सोशल मीडिया सेलकडून करण्यात येत असतात. मात्र रविवारी हे सोशल मीडियास्त्र भाजपावर उलटले. महाराष्ट्र भाजपाच्या ट्विटर अकाऊंटवर ट्विट करताना झालेल्या घोडचुकीमुळे महाराष्ट्र भाजपाची सोशल मीडिया सेल चेष्टेचा विषय ठरली.त्याचे झाले असे की नेहमी विरोधकांवर टीकास्त्र सोडणाऱ्या भाजपाच्या सोशल मीडिया सेलने खुद्द महाराष्ट्र भाजपाच्या ट्विटर अकाऊंटवरून भाजपा सरकार आणि मुख्यमंत्र्यांवर टीका केली. राज्यातील सरकारी कर्मचाऱ्यांच्या संख्येत कपात करण्यावरून सरकार आणि मुख्यमंत्र्यांना धारेवर धरणारे ट्विट महाराष्ट्र भाजपाच्या ट्विटर अकाऊंटवरून करण्यात आले. एकीकडे राज्यात दोन लाख सरकारी कर्मचाऱ्यांची गरज आहे. मात्र सरकार कर्मचाऱ्यांमध्ये 30 टक्के कपात करण्याच्या विचारात आहे. हा प्रकार मेक इन महाराष्ट्र नव्हे तर फूल इन महाराष्ट्र आहे. अशी टीका ट्विटमधून करण्यात आली होती.खुद्द भाजपाच्याच ट्विटर अकाऊंटवर स्वत:च्या सरकारवर टीका करणारे ट्विट पाहून अनेकांना आश्चर्य वाटले. विशेष बाब म्हणजे या ट्विटमध्ये काही काँग्रेसी नेत्यांनाही टॅग करण्यात आले होते.  अखेर चूक लक्षात येतात. हे ट्विट काढून टाकण्यात आले. मात्र तोपर्यंत हे ट्विट बऱ्यापैकी व्हायरल झाले होते. त्यामुळे भाजपाची सोशल मीडिया सेल नेटीझन्समध्ये चेष्टेचा विषय ठरली.  

 

 

टॅग्स :BJPभाजपाMaharashtraमहाराष्ट्रSocial Mediaसोशल मीडियाTwitterट्विटर