5 राज्यांतील निवडणुकीचे कल येताच भाजपचा आनंद गगनात; शिवसेना, राष्ट्रवादीला लगावला खोचक टोला

By ऑनलाइन लोकमत | Published: March 10, 2022 02:47 PM2022-03-10T14:47:57+5:302022-03-10T14:49:32+5:30

देशातील पाच राज्यांत झालेल्या निवडणुकांचे चित्र स्पष्ट होताच, महाराष्ट्र भाजपने युपी आणि गोव्यात निवडणुका लढविणाऱ्या शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसला खोचक आणि जोरदार टोला लगावला आहे....

Maharashtra BJP comment on Shivsena and NCP over trends of 5 States election results | 5 राज्यांतील निवडणुकीचे कल येताच भाजपचा आनंद गगनात; शिवसेना, राष्ट्रवादीला लगावला खोचक टोला

5 राज्यांतील निवडणुकीचे कल येताच भाजपचा आनंद गगनात; शिवसेना, राष्ट्रवादीला लगावला खोचक टोला

Next

देशातील उत्तर प्रदेशसह, पंजाब, उत्तराखंड, मणिपूर आणि गोवा या पाच राज्यांतील विधानसभा निवडणुकांचे निकाल आज जाहीर होत आहेत. एढेच नाही, तर कोणत्या राज्यात कुणाचे सरकार स्थापन होऊ शकते? हेही जवळपास स्पष्ट झाले आहे. आतापर्यंत आलेल्या कलांनुसार, पंजाबमध्ये आप तर इतर चारही राज्यांत भाजपचे सरकार स्थापन होतांना दिसत आहे. यामुळे, केवळ या चारच राज्यांत नाही, तर महाराष्ट्रातही भजप नेते आणि कार्यकर्त्यांमध्ये उत्साह दिसत आहे. यानंतर आता, निवडणुकांचे चित्र स्पष्ट होताच, महाराष्ट्र भाजपने युपी आणि गोव्यात निवडणुका लढविणाऱ्या शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसला जोरदार टोला लगावला आहे.

भाजपनं लगावला असा टोला -
या पाचही राज्यांच्या निवडणुकीचे चित्र बऱ्यापैकी स्पष्ट होताच, महाराष्ट्र भाजपने महाविकास आघाडी सरकारमधील शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेला खोचक टोला लगावला आहे. महाराष्ट्र भाजपने एक ट्विट करत, "शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसची स्पर्धा 'नोटा'सोबत असेल, असे देवेंद्र फडणवीस यांनी आधीच सांगितले होते," असे म्हटले आहे. याच वेळी या ट्विटमध्ये भाजपने, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसला मिळालेल्या मतांची तुलना नोटासोबत केली आहे.

"नोटाला 1.1 टक्का लोकांनी मतदान केले, म्हणजेच नोटाला एकूण 6439 मते मिळाली आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसला 5058 मते मिळाली आहेत. शिवसेनेला 0.2 टक्के म्हणजेच 1099 मते मिळाली आहेत. तसेच, या दोन्ही पक्षांची मिळून 6157 मते आहेत," असे म्हणत, या निवडणुकांमध्ये शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांची स्पर्धा नोटासोबत होती, असे भाजपने दाखविले आहे. 


 
याशिवाय, "या दोन्ही पक्षांचे नेते (शिवसेना-राष्ट्रवादी काँग्रेस) 2024 मध्ये पंतप्रधान होतील, असा खोचक टोलाही भाजपने लगावला आहे."

Web Title: Maharashtra BJP comment on Shivsena and NCP over trends of 5 States election results

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.