'या' नेत्यांना मोठी संधी मिळणार; महाराष्ट्र भाजपाची कार्यकारणी लवकरच जाहीर होणार

By ऑनलाइन लोकमत | Published: June 22, 2020 02:16 PM2020-06-22T14:16:28+5:302020-06-22T14:20:26+5:30

विधानपरिषद निवडणुकीत निष्ठावंतांना डावलल्याची टीका झाल्यानं कार्यकारणीकडे लक्ष

maharashtra bjp to announce its new working committee in july | 'या' नेत्यांना मोठी संधी मिळणार; महाराष्ट्र भाजपाची कार्यकारणी लवकरच जाहीर होणार

'या' नेत्यांना मोठी संधी मिळणार; महाराष्ट्र भाजपाची कार्यकारणी लवकरच जाहीर होणार

Next
ठळक मुद्देविधानपरिषदेच्या निवडणुकीत आयारामांना संधी दिल्याचा भाजपावर आरोपनिष्ठावंतांवर अन्याय होत असल्यानं पक्षात नाराजीचा सूरखडसे, पंकजा मुंडेंना काय मिळणार याकडे सगळ्यांचं लक्ष

मुंबई: शंभरहून अधिक आमदार असलेल्या भाजपामध्ये लवकरच मोठे संघटनात्मक बदल होण्याची शक्यता आहे. जुलैमध्ये पक्षाची कार्यकारणी जाहीर होणार आहे. पक्षातील निष्ठावंतांना यामध्ये संधी मिळण्याची दाट शक्यता आहे. विधान परिषदेवर उमेदवारी देताना आयारामांवर पक्ष मेहरबान झाल्याची टीका करण्यात आली होती. विशेष म्हणजे भाजपाच्याच नेत्यांनी अशा पद्धतीची टीका केली होती. त्यामुळे कार्यकारणीत निष्ठावंतांची वर्णी लागण्याची शक्यता आहे.

प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्यासाठी अतिशय सुरक्षित असा कोथरुडची मतदारसंघ सोडणाऱ्या माजी आमदार मेधा कुलकर्णी यांना संघटनेत मोठी जबाबदारी मिळण्याची शक्यता आहे. तसंच आशिष शेलार, चंद्रशेखर बावनकुळे आणि देवयानी फरांदे यांची महामंत्रीपदी नियुक्ती होण्याची दाट शक्यता आहे.

देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्त्वाखालील गेल्या सरकारमध्ये आशिष शेलार यांना अखेरच्या काही महिन्यात मंत्रिमंडळात स्थान देण्यात आलं होतं. त्यातही त्यांना शालेय शिक्षण खात्यावर समाधान मानावं लागलं होतं. मंत्रिपदासाठी देवयानी फरांदे यांच्या नावाची आधीपासून चर्चा होती. मात्र तरीही त्यांना मंत्रिपद मिळालं नाही. चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडे ऊर्जा खातं देण्यात आलं होतं. मात्र विधानसभा निवडणुकीत त्यांना तिकीट दिलं गेलं नाही.

नुकत्याच झालेल्या विधानपरिषद निवडणुकीत इतर पक्षांमधून आलेल्यांना संधी देण्यात आल्यानं कार्यकर्ते, पदाधिकाऱ्यांमध्ये नाराजी आहे. मात्र तरीही अनेकांनी त्यांची नाराजी उघडपणे बोलून दाखवलेली नाही. अशा नेत्यांना कार्यकारणीत स्थान दिलं जाण्याची शक्यता आहे. फेब्रुवारीत चंद्रकांत पाटील यांची प्रदेशाध्यक्षपदी फेरनिवड झाली. त्यानंतर लगेच नव्या कार्यकारणीची निवड होणं अपेक्षित होतं. मात्र कोरोनाचं संकट आणि लॉकडाऊनमुळे नव्या टीमची घोषणा लांबली. जुलैमध्ये उपाध्यक्ष, सचिव, सरचिटणीस, कोषाध्यक्ष तसंच पक्षाच्या विविध आघाड्यांच्या पदाधिकाऱ्यांची घोषणा केली जाण्याची शक्यता आहे.

"काँग्रेसच्या थोरातांची चिंता, पण कडवट शिवसैनिकांना विचारायचंही नाही"

'आता कळलं असेल मराठा आरक्षणासाठी लढा उभारणं का गरजेचं होतं'; संभाजी राजेंकडून विद्यार्थ्यांचं कौतुक

Web Title: maharashtra bjp to announce its new working committee in july

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.