शहरं
Join us  
Trending Stories
1
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
2
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
3
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
4
Mithun Chakraborty : "मी पश्चिम बंगालचा बांगलादेश होऊ देणार नाही, ओवैसी रिअल लीडर"; मिथुन चक्रवर्ती यांचं मोठं विधान
5
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
6
संकष्ट चतुर्थी २०२६: संकष्टीला करा राशीनुसार दिलेले उपाय; 'ही' गणेशसेवा पालटून टाकेल तुमचं आयुष्य!
7
IPL 2026: मराठमोळ्या आयुष म्हात्रेबद्दल अंपायरने केली मोठ्ठी चूक! सारेच हैराण; काय घडलं?
8
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
9
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
10
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
11
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
12
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
13
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
14
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
15
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
16
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
17
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
18
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
19
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
20
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
Daily Top 2Weekly Top 5

राज्यातील मंदिरं उघडण्यासाठी भाजप आक्रमक; पुण्यात कसबा तर पंढरपुरात विठ्ठल मंदिरात कार्यकर्ते घुसले

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 30, 2021 11:02 IST

Maharashtra Temple Reopen: राज्यातील धार्मिक स्थळं खुली करण्यासाठी भाजपनं आक्रमक पवित्रा घेतला असून आज सकाळपासूनच राज्यात विविध ठिकाणी सरकारविरोधी आंदोलनं सुरू आहेत.

Maharashtra Temple Reopen: राज्यातील धार्मिक स्थळं खुली करण्यासाठी भाजपनं आक्रमक पवित्रा घेतला असून आज सकाळपासूनच राज्यात विविध ठिकाणी सरकारविरोधी आंदोलनं सुरू आहेत. पुणे, पंढरपुर, नाशिक, औरंगाबाद, नागपूरमध्ये भाजपकडून निदर्शनं सुरू आहेत. तर काही ठिकाणी भाजप कार्यकर्त्यांनी पोलिसांचा विरोधाला झुगारून थेट मंदिरात शिरण्याचाही प्रयत्न केला आहे. 

भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या नेतृत्त्वात पुण्यात कसबा गणेश मंदिराबाहेर घंटानाद आंदोलन सुरू आहे. यात चंद्रकांत पाटील यांनी नियम मोडून आजच मंदिरात शिरण्याचा आक्रमक पवित्रा घेतला. भाजपचे काही कार्यकर्ते कसबा गणेश मंदिरात शिरल्याची माहिती समोर आली आहे. राज्य सरकारनं लादलेल्या नियमांचं भंग केला म्हणून आवश्यक त्या कारवाईला सामोरं जाण्यास आम्ही तयार आहोत. पण हिंदूंच्या भावना आता सरकारला दुखावू देणार नाही, असं चंद्रकांत पाटील म्हणाले. 

राज्यात दारुविक्रीला मुभा मग देवाच्या दर्शनासाठी येणाऱ्या भक्तांकडूनच फक्त कोरोनाचा प्रसार होतो का? आज काहीही झालं तरी मंदिरात प्रवेश करणार आणि सरकारला मंदिरं खुली करण्यासाठी भाग पाडणार असा रोखठोक पवित्रा चंद्रकांत पाटील यांनी घेतला आहे. 

पंढरपुरात नामदेव पायरीजवळ आंदोलनपंढरपुरात देखील भाजपकडून जोरदार आंदोलन सुरू असून कार्यकर्त्यांनी नामदेव पायरीजवळील भिंत ओलांडून मंदिरात प्रवेश करण्याचा प्रयत्न केला. यात भाजपच्या काही कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. 

मुख्यमंत्र्यांनी धर्मयुद्धासाठी तयार रहावंनाशिकमध्ये भाजपा तीर्थक्षेत्र आघाडीचे प्रमुख आचार्य तुषार भोसले यांचे नेतृत्वाखाली आज गोदावरी नदीच्या काठी रामकुंड येथे संत महतांच्या  उपस्थितीत शंखध्वनी आणि घंटानाद करून आंदोलन करण्यात आले. राज्य सरकार हे कंसाप्रमाणे असून धर्माला दडपण्याचा प्रयत्न करत आहेत आता मंदिर उघडले नाही तर राज्यभर तांडव होईल, असा इशारा भोसले यांनी दिला आहे. 

नागपूर आणि औरंगाबादमध्येही भाजपकडून जोरदार आंदोलन सुरू असून मंदिरं खुली करण्याच्या मागणीवर कार्यकर्ते ठाम आहेत. ठिकठिकाणी ठाकरे सरकारविरोधात घोषणाबाजी आणि निदर्शनं केली जात आहेत. 

टॅग्स :TempleमंदिरBJPभाजपाcorona virusकोरोना वायरस बातम्याCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस