शहरं
Join us  
Trending Stories
1
होय, मी २००४ सालापासून भाजपशी युती व्हावी असा आग्रह पवारांकडे धरला होता, पण...; पटेलांचा मोठा खुलासा
2
अधीर रंजन यांना खडसावणाऱ्या खर्गेंवर बंगालमधील काँग्रेस कार्यकर्ते नाराज, काँग्रेस अध्यक्षांच्या फोटोवर फासली शाई 
3
'आरक्षणाची मर्यादा वाढवणार की नाही?', काँग्रेसचा पंतप्रधान नरेंद्र मोदींना थेट सवाल
4
राज्यात महाविकास आघाडीच्या ४० पेक्षा जास्त जागा येतील, बाळासाहेब थोरातांना विश्वास
5
इराणच्या राष्ट्रपतींना घेऊन जाणारं हेलिकॉप्टर क्रॅश, बचाव पथक रवाना
6
"प्रभू श्रीराम हृदयात आहेत, पण राम मंदिर..."; मेनका गांधी यांचे निवडणूक प्रचारादरम्यान विधान
7
'...तर मी तेव्हाच मुख्यमंत्री झालो असतो', छगन भुजबळ यांचा मोठा गौप्यस्फोट
8
सनरायझर्स हैदराबादचा दणदणीत विजय, पण क्वालिफायर १ ची जागा RR vs KKR सामन्यावर अवलंबून
9
"एकनाथ शिंदे यांच्या मुख्यमंत्रीपदाला संजय राऊतांचाच विरोध होता", अजित पवार गटाचा पलटवार
10
मुस्लिम कट्टरतावाद्यांच्या मतांसाठी संतांचा अपमान..; PM मोदींचा ममता बॅनर्जींवर हल्लाबोल
11
‘मोदींचं गुणगान गाऊन योगींकडून भगव्या वस्त्राचा अपमान, भगवे कपडे घालून संतांसारखे…’ नाना पटोलेंचा सल्ला
12
"भाजपला डिस्टर्ब करू नका, निवडणूक संपताच...", हिमंता यांचा माजी IPS अधिकाऱ्याला इशारा
13
आमदार पी.एन. पाटील यांची प्रकृती बिघडली; खासगी रुग्णालयात दाखल, तातडीने शस्त्रक्रिया सुरु
14
ऑल दी बेस्ट, रोहित अँड... ! Mumbai Indians च्या अपयशानंतर असं का म्हणाल्या नीता अंबानी?
15
राहुल गांधी आणि अखिलेश यादव यांच्या सभेत गोंधळ; बॅरिकेड्स तोडल्यामुळे चेंगराचेंगरी
16
पंजाब किंग्सची जोरदार फटकेबाजी, सनरायझर्स हैदराबादसमोर दोनशेपार लक्ष्य
17
Video:'भारतीय लहेजाची लाज वाटते?'; Cannes च्या रेड कार्पेटवर इंग्रजी बोलण्याने कियारा ट्रोल
18
Swati Maliwal Case : दिल्ली पोलिसांनी मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानातून सीसीटीव्ही डीव्हीआर जप्त केला
19
श्रेयस अय्यर, इशान किशन यांना BCCI कडून सेकंड चान्स; घेतला गेला मोठा निर्णय 
20
यावेळीही ट्रॉफी जिंकण्याचे RCB चे स्वप्न भंगणार? एक योगायोग अन् चाहत्यांचे टेन्शन वाढले

Maharashtra Bandh: आजचा बंद म्हणजे Mahavikas Aghadi सरकारचा ढोंगीपणा, Devendra Fadnavis यांनी सांगितलं नेमकं कारण 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 11, 2021 1:40 PM

Devendra Fadnavis, Maharashtra Bandh: उत्तर प्रदेशमधील लखीमपूर-खेरी येथे झालेल्या हिंसाचाराविरोधात ( Lakhimpur Kheri Violence) राज्यातील सत्ताधारी Mahavikas Aghadi सरकारमधील घटक पक्षांनी आज राज्यात बंद पुकारला आहे. या बंदला संमिश्र प्रतिसाद मिळत आहे.

मुंबई - उत्तर प्रदेशमधील लखीमपूर-खेरी येथे झालेल्या हिंसाचाराविरोधात राज्यातील सत्ताधारी महाविकास आघाडी सरकारमधील घटक पक्षांनी आज राज्यात बंद पुकारला आहे. या बंदला संमिश्र प्रतिसाद मिळत आहे. दरम्यान, विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी या बंदवरून राज्य सरकारवर जोरदार टीका केली आहे. आजचा बंद म्हणजे महाविकास आघाडी सरकारचा ढोंगीपणा आहे, असा टोला देवेंद्र फडणवीस यांनी लगावला आहे.

देवेंद्र फडणवीस म्हणाले की, आज महाविकास आघाडी सरकारने पुकारलेला बंदमुळे मविआ सरकारचा ढोंगीपणा उघड झाला आहे. कारण लखीमपूरच्या घटनेकरिता महाराष्ट्रामध्ये बंद केला जातो. मात्र महाराष्ट्रातील अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना मात्र एका नव्या पैशाची मदत हे सरकार करत नाही. महाराष्ट्रातील शेतकरी अभूतपूर्व संकटात आहे. हे सरकार आल्यापासून राज्यात दोन हजार शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत. बांधावर जाऊन मदतीची आश्वासने दिली. मात्र ही आश्वासने हवेत विरली.

आजचा बंद हा ढोंगीपणाचा कळस आहे. कारण याच मंडळींनी मावळमध्ये  पाणी मागणाऱ्या शेतकऱ्यांवर गोळीबार केला होता, अशा गोळीबार करणाऱ्या लोकांना अशा प्रकारचं आंदोलन करण्याची नैतिकता तरी आहे का. खरंतर लखीमपूरची घटना गंभीर आहे. तेथील सरकार त्यावर कारवाई करत आहे. हा बंद हा त्या घटनेबाबत सहानुभूती व्यक्त करण्यासाठी नाही आहे तर त्यावर राजकीय पोळी भाजता येईल का या संकुचित विचाराने केलेला बंद आहे. म्हणूनच लोकांचा या बंदला प्रतिसाद नाही आहे. मात्र प्रशासनाची मदत घेऊन, दमदाटी करून, धमक्या देऊन राज्यातील लोकांना बंद पाळण्यासाठी भाग पाडलं जात आहे. तसंही हे बंद सरकार बंद सरकार आहे. योजना, अनुदानं बंद केली, कोरोना काळात देश सुरू असताना महाराष्ट्र बंद केला होता. आता काही सुरू होत असताना सरकारने बंद पुकारला, असा टोला फडणीवस यांनी लगावला.

खरंतर उच्च न्यायालयाने एका निर्णयानुसार बंद पुकारणे बेकायदेशीर ठरवलेले आहे. त्यामुळे न्यायालयाने या बंदची दखल घ्यावी. तसेच बंदमधील नुकसानीची भरपाई सरकारकडून वसूल करण्यात यावी. महाराष्ट्र विकास आघाडी सरकारने मंत्रिमंडळाच्या बैठकीतून बंदचा निर्णय घेतला, ही घटनेची पायमल्ली आहे, असा टोलाही फडणवीस यांनी लगावला.  

टॅग्स :Maharashtra BandhMaharashtra BandhDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसMahavikas Aghadiमहाविकास आघाडीLakhimpur Kheri Violenceलखीमपूर खीरी हिंसाचार