शहरं
Join us  
Trending Stories
1
आधीच प्लॅन ठरला होता, आंतरवालीतील दगडफेकीमागे पवारांचे आमदार; छगन भुजबळांचा मोठा गौप्यस्फोट
2
“राहुल गांधी हे सीरियल लायर, हायड्रोजनचं सोडा, लवंगी फटाकाही फोडू शकले नाहीत”: CM फडणवीस
3
Asia Cup 2025 : 'जानी दुश्मन' असलेल्या बांगलादेशच्या मदतीला धावला श्रीलंका; अफगाणिस्तानचा खेळ खल्लास!
4
Hindenberg प्रकरणात ‘सेबी’ची Adani समूहाला क्लीन चिट; गौतम अदानी म्हणाले, “सत्यमेव जयते...”
5
“देशातील Gen Z, विद्यार्थी, युवक संविधान-लोकशाही वाचवतील, मी सदैव पाठीशी राहीन”: राहुल गांधी
6
७५ वर्षांचे झाले, PM मोदींनी निवृत्ती घ्यावी का? शरद पवार म्हणाले, “त्यांनी थांबावे हे...”
7
"युक्रेन युद्ध थांबवणे सर्वात सोपे वाटत होते, पण पुतिन..."; ट्रम्प यांची रशियन राष्ट्राध्यक्षांवर थेट टीका, स्पष्टच बोलले
8
Best Catch In T20I : परेरानं घेतलेला झेल भारीच! पण सूर्या दादाला तोड नाय! कारण....(VIDEO)
9
जबरदस्त...! तब्बल 18.60 लाख रुपयांनी स्वस्त झाली अ‍ॅक्टर्स अन् नेत्यांच्या आवडीची ही ढासू SUV; आता किती रुपयांना मिळणार? जाणून घ्या
10
Mohammad Nabi Fastest Fifty : एका षटकात ५ षटकार! युवीचा विक्रम आला होता धोक्यात, पण...
11
पालघर-डहाणूत ठाकरे गटाला खिंडार; सरपंच-उपसरपंच-पदाधिकारी शिवसेनेत, एकनाथ शिंदे म्हणाले...
12
Nuwan Thushara Unplayable Delivery : 'बेबी मलिंगा'ची कमाल! लेगला चेंडू टाकत उडवली ऑफ स्टंप (VIDEO)
13
'हैदराबाद गॅझेटिअरच्या नावाखाली सरकारने फसवणूक केली'; मराठा गोलमेज परिषदेत आरोप
14
स्कॉर्पिओ, सेल्टोस अन् हॅरियरचीही ‘बोलती बंद’; लोकांनी या ढासू SUV वर लाखो रुपये केले खर्च! 
15
अमेरिकन राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे विमान न्यू यॉर्कमध्ये अपघातातून थोडक्यात बचावले...
16
“तुम्ही बोलत नाही, आम्ही ओबीसी आरक्षणासाठी लढायचे नाही का?”; छगन भुजबळांचा शरद पवारांना सवाल
17
मतचोरीचा राहुल गांधींचा आरोप, एकनाथ शिंदेंचे खुले आव्हान; म्हणाले, “ठोस पुरावे द्या अन्...”
18
मर्सिडीज-हुरुनचा अहवाल आला! भारतात करोडपतींच्या संख्येत ९० टक्क्यांनी वाढ..., महाराष्ट्र टॉपर, प्रचंडच...
19
मारुती अल्टोपेक्षा ही कार स्वस्त झाली; जीएसटीने कमालच केली, मारुतीचे जगच इकडचे तिकडे केले...
20
हैदराबाद गॅझेटवर हायकोर्टाचा मोठा निर्णय; याचिकाकर्त्यांना सुनावले, आता मराठा आरक्षणाचे काय?

Maharashtra Bandh Live Updates: आयटीच्या छाप्यांवरून लक्ष वळविण्यासाठी महाविकास आघाडीने बंद पुकारला: चंद्रकांत पाटील

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 11, 2021 18:11 IST

Maharashtra Bandh Updates in Marathi, Lakhimpur kheri case: उत्तर प्रदेशातील लखीमपूर खेरी इथं शेतकरी मोर्चात वेगवान गाडीने शेतकऱ्यांना चिरडल्यामुळे काही जणांचा मृत्यू झाला. या घटनेनंतर संपूर्ण देशभरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.

11 Oct, 21 05:19 PM

रिक्षा चालकांना मारहाण झाली नाही; व्यापारी स्वच्छेने बंदमध्ये सहभागी; एकनाथ शिंदेंचा दावा

रिक्षा चालकांना मारहाण झाली नाही; व्यापारी स्वच्छेने बंदमध्ये सहभागी; एकनाथ शिंदेंचा दावा

11 Oct, 21 04:46 PM

डोंबिवलीत आंदोलनकर्ते आणि पोलिसांमध्ये शाब्दिक चकमक

लखीमपूर हत्याकांडाच्या निषेधार्थ कल्याण  डोंबिवली शहरात सोमवारी सकाळपासूनच राष्ट्रवादी  काँग्रेस आणि काँग्रेस पक्षाकडून ठिकठिकाणी  निदर्शन करण्यात आली. पोलीस आणि आंदोलनकर्त्यांमध्ये शाब्दिक चकमक देखील झाली. 

11 Oct, 21 04:19 PM

आज वसुली चालू आहे की बंद?, अमृता फडणवीसांचा खोचक टोमणा

आज वसुली चालू आहे की बंद?, अमृता फडणवीसांचा खोचक टोमणा



 

11 Oct, 21 04:18 PM

आयटीच्या छाप्यांवरून लक्ष वळविण्यासाठी महाविकास आघाडीने बंद पुकारला: चंद्रकांत पाटील

आयटीच्या छाप्यांवरून लक्ष वळविण्यासाठी महाविकास आघाडीने बंद पुकारला: चंद्रकांत पाटील

11 Oct, 21 03:41 PM

ठाणे बंद करणाऱ्या शिवसैनिकांना पोलिसांनी ताब्यात घेतलं; एकाला गाडीत दिला चोप

11 Oct, 21 02:54 PM

देवेंद्र फडणवीसांची शरद पवारांवर टीका; मावळ गोळीबार आठवत नाही का?

पुण्यातील मावळमध्ये पाणी मागणाऱ्या शेतकऱ्यांना गोळ्यांनी मारलं. ते जालियानवाला हत्याकांड आहे. याचा विसर आत्ताच्या लोकांना पडला आहे. ठाकरे सरकार ढोंगी सरकार आहे – देवेंद्र फडणवीस, विरोधी पक्षनेते

11 Oct, 21 02:42 PM

कुर्ला पश्चिमेकडे व्यापारी बंदमध्ये सहभागी; बहुतांश दुकानांचे शटर बंद

11 Oct, 21 02:38 PM

दुकानं बळजबरीनं बंद करण्याला भाजपाचा विरोध; पोलिसांनी एकाला घेतलं ताब्यात

11 Oct, 21 02:32 PM

मुंबई उपनगरात कडकडीत महाराष्ट्र बंद; मविआ कार्यकर्त्यांचं लोकांना आवाहन

मुंबईत उपनगरात दिंडोशी, ,गोरेगाव, जोगेश्वरीमध्ये आज कडकडीत महाराष्ट्र बंद पाळण्यात आला. आमदार सुनील प्रभू यांच्या नेतृत्वाखाली महाविकास आघाडीच्या सर्व कार्यकर्त्यानी नागरिकांना बंदमध्ये सहभागी होण्याचं आवाहन केले. तर मालाड पूर्व कुरार मध्ये महाआघाडीतर्फे मोदी सरकारच्या विरोधात जोरदार निदर्शने करण्यात आली. यावेळी काँग्रेस-राष्ट्रवादीचेही कार्यकर्ते सहभागी होते. 

11 Oct, 21 02:11 PM

'महाराष्ट्र बंद' आंदोलन करणारे वरळीतील शिवसैनिक पोलिसांच्या ताब्यात

'महाराष्ट्र बंद' आंदोलनात सहभागी असणाऱ्या शिवसैनिकांची वरळीत पोलिसांची धरपकड

11 Oct, 21 02:00 PM

घाटकोपरमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी केंद्र सरकारविरोधात घोषणाबाजी

मोदी सरकार हाय हाय...योगी सरकारचा धिक्कार असो..अशा जोरदार घोषणाबाजी देत राष्ट्रवादी काँग्रेसनं घाटकोपर श्रेयस सिग्नल व सर्वोदय सिग्नल समोरचा परिसर दणाणून सोडला होता. लखीमपूर हिंसाचाराचा निषेध आणि शेतकऱ्यांच्या समर्थनार्थ राष्ट्रवादीच्या नेत्यांनी व कार्यकर्त्यांनी मोदी-योगी सरकारचा जोरदार निषेध केला

11 Oct, 21 01:48 PM

अंधेरी पूर्व येथे महाविकास आघाडीचे कार्यकर्ते रस्त्यावर; दुकानं बंद करण्याचं आवाहन

'महाराष्ट्र बंद' यशस्वी करण्यासाठी महाविकास आघाडीचे कार्यकर्ते रस्त्यावर उतरले आहेत. अंधेरी पूर्व येथील रेल्वे स्टेशनबाहेर परिसरात कार्यकर्त्यांनी व्यापाऱ्यांना दुकानं बंद ठेवण्याचं आवाहन केले. 

11 Oct, 21 01:35 PM

यवतमाळमध्ये 'महाराष्ट्र बंद'ला संमिश्र प्रतिसाद; ग्रामीण भागात उत्स्फुर्त बंद

महाविकास आघाडीच्या वतीने पुकारण्यात आलेल्या महाराष्ट्र बंदमध्ये काॅंग्रेस, सेना, राष्ट्रवादीसह प्रहार जनशक्ती पार्टीही सहभागी झाली आहे. सकाळपासूनच लाऊड स्पीकरवर बंदचे आवाहन करण्यात येत होते. याला बहुतांश व्यापाऱ्यांनीही प्रतिसाद दिला. शहराच्या तुलनेत ग्रामीण भागात मात्र बंदला मोठा प्रतिसाद मिळत आहे.  

11 Oct, 21 01:33 PM

कल्याणमध्ये शिवसैनिकांनी पोलिसांसोबत घातला वाद; कामकाज बंद पाडण्याचा प्रयत्न

कल्याण डोंबिवली महापालिका मुख्यालयातील कामकाज बंद पाडण्याचा प्रयत्न करण्यात आला. यावेळी बाजारपेठ पोलिसांनी मुख्यालयात धाव घेतली. पोलिस आणि कामगार संघटनेच्या पदाधिकाऱ्यांमध्ये वादंग झाला

11 Oct, 21 01:26 PM

"मावळमध्ये पाणी मागणाऱ्या शेतकऱ्यांवर गोळीबार करणारे बंद करत आहेत"

मावळमध्ये पाणी मागणाऱ्या शेतकऱ्यांवर गोळीबार करणारेच आज बंद पुकारत आहेत. महाविकास आघाडी सरकार ढोंगी सरकार आहे. माध्यमांपुढे फक्त बोलणारे लोकं आहेत. मराठवाड्यातील शेतकऱ्यांचे अश्रू पुसण्यासाठी कुणी गेले? मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री सोडा तर पालकमंत्रीही फिरकले नाहीत. शेतकरी सन्मान योजनेचे पैसे थेट शेतकऱ्यांच्या खात्यात जात आहेत. परंतु राज्य सरकार काहीच द्यायला तयार नाहीत - देवेंद्र फडणवीस 

11 Oct, 21 01:11 PM

मंत्रिमंडळ बैठकीत 'महाराष्ट्र बंद'चा निर्णय; देशाच्या इतिहासात पहिल्यांदाच घडलं

बेस्टच्या बसेस फोडण्यात आल्या हे सगळं ठरवून झालं आहे. उच्च न्यायालयाने याची दखल घेतली पाहिजे. अशाप्रकारे बंद करण्यास सुप्रीम कोर्टाने बंदी घातली आहे. परंतु न्यायालयाचा अवमान वारंवार केला जात आहे. त्यामुळे न्यायालयाने याची दखल घेतली पाहिजे. ठाकरे सरकार वसुली सरकार आहे. संपत्तीचं नुकसान झालं त्याची वसुली सरकारकडूनच केली पाहिजे. कायदा सुव्यवस्था राखण्याची जबाबदारी ज्यांच्यावर आहे तेच बंद पुकारतात. मंत्रिमंडळ बैठकीत महाराष्ट्र बंदचा निर्णय होतो हे देशाच्या इतिहासात पहिल्यांदाच घडलंय असा आरोप विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे. 

11 Oct, 21 01:24 PM

शिवडी येथे व्यापारांनी उत्स्फुर्तपणे घेतला 'महाराष्ट्र बंद'मध्ये सहभाग

शिवडी येथे व्यापारांचा कडकडीत बंद, महाविकास आघाडीने पुकारलेल्या 'महाराष्ट्र बंद' दुकानदारांचा पाठींबा 

11 Oct, 21 01:21 PM

कोल्हापूरात काँग्रेस-राष्ट्रवादी कार्यकर्त्यांची केंद्राविरोधात घोषणाबाजी

कोल्हापूर शहरात काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस कार्यकर्त्यांनी शिवाजी चौकात केंद्र सरकार विरोधात घोषणाबाजी केली

11 Oct, 21 01:11 PM

विक्रोळी इथं शिवसेनेचा रास्ता रोको; टायर जाळून वाहतूक केली ठप्प

11 Oct, 21 12:46 PM

ठाण्यात रिक्षा बंद करण्यासाठी शिवसेना आक्रमक

11 Oct, 21 12:07 PM

रत्नागिरीत शिवसेनेची दडपशाही; दुकान बंद करण्यासाठी दबाव

11 Oct, 21 11:35 AM

दादर शिवसेना भवनासमोर शिवसैनिक जमले; 'महाराष्ट्र बंद'साठी दुकानदारांना आवाहन

11 Oct, 21 11:05 AM

चेंबूर इथं वाहतूक रोखली; शिवसेना-काँग्रेस कार्यकर्त्यांचा रस्त्यावर ठिय्या आंदोलन

11 Oct, 21 10:43 AM

'महाराष्ट्र बंद'साठी दुकानं बंद ठेवण्याचं आवाहन; शिवसेना-राष्ट्रवादी रस्त्यावर उतरली

 महापौर नरेश म्हस्के तसेच राष्ट्रवादी काँग्रेसचे ठाणे अध्यक्ष आनंद परांजपे यांच्यासमवेत मोठ्या संख्येने कार्यकतें रस्त्यावर उतरले . यावेळी दोन्ही पक्षाच्या नेत्यांनी व्यापाऱ्यांना दुकाने बंद करण्याचे आवाहन केले . दरम्यान कोणत्याही प्रकारचा अनुचित प्रकार घडू नये यासाठी ठाण्यात महत्वाच्या मोठा पोलीस बंदोबस्त लावण्यात आला आहे.

11 Oct, 21 10:11 AM

'बेस्ट'च्या ८ बसेसची तोडफोड; 'महाराष्ट्र बंद'ला हिंसक वळण

तोडफोडीच्या घटना पाहता बेस्टच्या व्यवस्थापनाने पोलीस संरक्षणाची मागणी केली आहे. बंदच्या परिस्थितीचा आढावा घेऊन सर्व आगारातून बसगाड्या चालवण्यात येणार आहेत.

11 Oct, 21 09:57 AM

ज्यांचं राज्यात सरकार तेच बंदसाठी लोकांवर दबाव टाकतायेत; आमदार राम कदमांची टीका

स्वातंत्र्यानंतर इतिहासात पहिल्यांदाच असं घडलंय की, एखाद्या राज्याच्या सरकारनं लोकांनाच बंद करायचं आवाहन केले आहे. राज्यातील तीन पक्ष जबरदस्तीनं लोकांना बंदमध्ये सहभागी होण्यासाठी दबाव टाकत असतील तर भाजपा त्यांना उत्तर देईल. शेतकऱ्यांच्या आडून महाविकास आघाडीने राजकारण करू नये. भाजपा आमदार राम कदम यांची सरकारवर टीका

11 Oct, 21 09:42 AM

'महाराष्ट्र बंद'ला मनसेचा विरोध; निषेध करायचा असेल तर १ दिवसाचं अधिवेशन बोलवा

लोकसभेत शेतकरी विरोधातील विधेयक पास होतं तेव्हा महाविकास आघाडीचे खासदार शेपूट घालून गप्प का बसले होते? राज्यसभेत शरद पवार अनुपस्थित का होते? या सगळ्यांची उत्तरं द्यावी लागतील. उत्तर प्रदेशातील घटना निषेधार्थ आहेत. लॉकडाऊनमुळे राज्यातील जनता त्रस्त आहे. निषेध करायचा असेल तर एक दिवसाचं अधिवेशन बोलवा. घटनेच्याविरोधात ठराव करा. चर्चा करा. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे दिल्लीत जाणार. पंतप्रधान मोदींशी बोलणार. तुमचे संबंध चांगले आहेत असं बोलणार मग तुमच्या राजकारणासाठी महाराष्ट्रातील जनतेला वेठीस धरणार हे कसलं राजकारण? असा सवाल मनसेचे सरचिटणीस संदीप देशपांडे यांनी सरकारला केला आहे. 

11 Oct, 21 09:35 AM

'महाराष्ट्र बंद'चा सार्वजनिक वाहतुकीवर परिणाम; खासगी वाहतूक सुरू

11 Oct, 21 09:01 AM

सर्वसामान्य प्रवाशांची टॅक्सीवाल्यांकडून लूट; 'महाराष्ट्र बंद' मुंबईकरांना फटका

11 Oct, 21 08:44 AM

सोलापूरात 'महाराष्ट्र बंद'ला प्रतिसाद नाही; बाजार समितीत मोठी गर्दी

सोलापूर येथे महाराष्ट्र बंदला प्रतिसाद नाही. शहर व जिल्ह्यातील सार्वजनिक वाहतूक व्यवस्था सुद्धा सुरळीतपणे सुरू आहे. त्याचसोबत सर्व व्यवहार नेहमीप्रमाणे सुरु ठेवण्यात आले आहेत. बाजार समितीत मोठी गर्दी झाल्याचं पाहायला मिळत आहे. 

11 Oct, 21 08:33 AM

'महाराष्ट्र बंद'चा कांदा लिलावावर परिणाम; लासलगावमध्ये व्यापाऱ्यांनी मार्केट बंद ठेवलं

11 Oct, 21 08:29 AM

ST सुरु पण प्रवाशांचा अल्प प्रतिसाद; एसटी सेवा बंद होण्याची शक्यता

सकाळी आठ वाजेपर्यंत सर्व एसटी गाड्या परळ, मुंबई व कुर्ला नेहरूनगर येथून बाहेर पडल्या. एकही गाडी रद्द नाही. एसटी सुरू पण प्रवाशांचा अल्प प्रतिसाद मिळत आहे. एका फेरीचे उत्पन्न ३५०० वरून १७०० वर आले आहे. प्रवासी कमीच असतील काही वेळाने एसटीची सेवा बंद करण्यात येईल अशी माहिती देण्यात आली आहे. 

11 Oct, 21 08:02 AM

'महाराष्ट्र बंद'ला भाजपाचा विरोध; महाविकास आघाडी राजकारण करत असल्याचा आरोप

१०५० कोटींच्या दलालीचे पुरावे आयकर खात्याला सापडल्याने लखीमपूर प्रकरणाच्या ढालीआडून महाराष्ट्र बंद पुकारून या गंभीर प्रकरणावरून जनतेचे लक्ष अन्यत्र वळविण्याचे हे तर हीन राजकारण महाविकासआघाडी सरकार खेळत आहे असा आरोप भाजपाचे मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी केला आहे. महाराष्ट्र बंदविरोधात भाजपाने टीकास्त्र सोडलं आहे. 

टॅग्स :Maharashtra BandhMaharashtra BandhMahavikas Aghadiमहाविकास आघाडीLakhimpur Kheri Violenceलखीमपूर खीरी हिंसाचारFarmerशेतकरी