नागपूर - आगामी विधानमंडळ अधिवेशन सुरळीत व सुरक्षिततेत पार पाडण्यासाठी सभापती राम शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली आज महत्त्वपूर्ण आढावा बैठक पार पडली. अधिवेशनादरम्यान होणारी अनावश्यक गर्दी रोखणे आणि संपूर्ण परिसर व्यवस्थीत ठेवणे हे या बैठकीचे प्रमुख उद्दिष्ट होते.
सभापती शिंदे यांनी स्पष्ट केले की यंदा विधानभवनात गर्दी नियंत्रणाला विशेष प्राधान्य देण्यात आले आहे. त्यासाठी रंगीत पास प्रणाली (Colour–Coded Pass System) लागू करण्यात आली आहे. यामध्ये विविध विभाग, मान्यवर, मीडिया, सुरक्षा कर्मचारी यांना वेगवेगळ्या रंगांचे पास देण्यात येणार आहेत. प्रत्येक पाससाठी स्वतंत्र गेट निश्चित करण्यात आले असून, त्यानुसारच प्रवेश दिला जाईल. ही नवी व्यवस्था लागू केल्यानंतर अनावश्यक हालचाल कमी होणार असून, सुरक्षायंत्रणांना गर्दी व्यवस्थापन करणे अधिक सोपे होईल, असा विश्वास सभापतींनी व्यक्त केला.
या बैठकीत पाणीपुरवठा, वीज व्यवस्था, अग्निसुरक्षा, वेंटिलेशन, पॉवरहाऊस, स्वच्छता, वाहतूक व्यवस्थापन आणि आपत्कालीन पथके तैनात ठेवण्याबाबतही सर्व विभागांकडून सविस्तर माहिती घेण्यात आली. तसेच अधिवेशन काळात BSNL उच्चगती इंटरनेट व Wi-Fi अखंडित ठेवण्यासाठीही विशेष निर्देश देण्यात आले. १४ व १५ तारखेला सर्व विभागांनी प्रत्यक्ष पाहणी करून आवश्यक सुधारणा तातडीने करण्याचे आदेश देण्यात आले.
पत्रकार परिषदेत सभापती शिंदे आणि उपसभापती नीलम गोऱ्हे यांनी सांगितले की विरोधी पक्षनेता पदाचा प्रस्ताव अद्याप प्रलंबित असून यावर योग्य वेळी निर्णय घेतला जाईल.
Web Summary : Speaker Ram Shinde reviewed arrangements for a smooth winter session, prioritizing crowd control with color-coded passes. Key concerns included water, power, fire safety, and uninterrupted internet. Opposition leader decision pending.
Web Summary : अध्यक्ष राम शिंदे ने सुचारू शीतकालीन सत्र के लिए व्यवस्थाओं की समीक्षा की, रंग-कोडेड पास के साथ भीड़ नियंत्रण को प्राथमिकता दी। पानी, बिजली, अग्नि सुरक्षा और निर्बाध इंटरनेट प्रमुख चिंताएं थीं। विपक्ष के नेता का फैसला लंबित है।