शहरं
Join us  
Trending Stories
1
एकनाथ शिंदेंनी हेरले ठाकरेंचे मोहरे, मुंबईतील मराठीबहुल पट्ट्यात 'बंडखोरां'ना तिकीट; गेम फिरणार?
2
"९९ टक्के युती झाली होती, पण अर्जून खोतकरांचे म्हणणं होतं की..."; युती तुटल्याची लोणीकरांकडून घोषणा, भाजपा स्वबळावर लढणार
3
बांगलादेशमध्ये आणखी एका हिंदूची हत्या,  बजेंद्र बिस्वास याचा गोळ्या झाडून घेतला जीव
4
मुंबई: शिवडीमध्ये भीषण आग! एकापाठोपाठ एक ४ सिलेंडरचा स्फोट झाल्याने खळबळ, जिवीतहानी नाही
5
"लोकांनीच त्यांना स्वीकारलं त्यामुळे..."; एकाच घरात तिघांना उमेदवारी मिळाल्यानंतर राहुल नार्वेकरांचे स्पष्टीकरण
6
वर्षाअखेरीस बाजारात 'सुस्ती'! गुंतवणूकदारांचे २२,००० कोटी पाण्यात; टाटा स्टीलची मात्र बाजी
7
Viral Video: सूर्या दादानं शेरवानी घातली तर, वहिनींनी नेसली रेशमी साडी; दोघेही बालाजीच्या चरणी नतमस्तक!
8
'रोहित आणि विराटला निवृत्त होण्यास भाग पाडले...', माजी क्रिकेटपटूचा धक्कादायक दावा
9
MS Dhoni च्या तालमीत तयार झालेल्या CSK क्रिकेटरने दिली गुड न्यूज, लवकरच होणार 'बाबा'
10
"कोणत्याही महापालिकेत युती तुटलेली नाही, पुढच्या दोन दिवसात...", उदय सामंतांचे विधान, पुणे-संभाजीनगरचं काय?
11
BMC Election 2026: महायुतीत मोठी फूट! अजित पवारांच्या राष्ट्रवादीनंतर बड्या पक्षाची 'एकला चलो रे'ची हाक
12
"मुलगी मित्रांसोबत गेली...", रक्ताच्या थारोळ्यात सापडली नववीची विद्यार्थिनी; ICU मध्ये मृत्यूशी झुंज
13
जागा शिंदेसेनेला सुटली, धनुष्यबाणावर लढण्याची ऑफरही आली, पण..., भाजपाच्या निष्ठावंत कार्यकर्तीने घेतला मोठा निर्णय  
14
डिजिटल गोल्डमध्ये गुंतवणूक करताय? सावधान! सेबीने दिला इशारा; तुमचे पैसे अडकण्याची भीती
15
Mamata Banerjee : "I Don't Care", अमित शाह यांच्या टीकेला ममता बॅनर्जींचं प्रत्युत्तर; केंद्र सरकारवर गंभीर आरोप
16
सोलापुरात अभूतपूर्व गोंधळ! भाजपाचे एबी फॉर्म वेळेत न पोहचल्याने संताप, विरोधकांचा दारातच ठिय्या
17
Anjel Chakma : खळबळजनक! बर्थडे पार्टी, शिवीगाळ अन्... एंजेल चकमा हत्या प्रकरणात धक्कादायक खुलासा
18
सौदी अरेबियानं UAE च्या जहाजांना का केले उद्ध्वस्त?; २४ तासांचा अल्टिमेटम, २ मित्र बनले शत्रू
19
सावधान! 'हॅप्पी न्यू इयर' म्हणण्यापूर्वी १० वेळा विचार करा; एका क्लिकमुळे बँक खातं होईल रिकामं
20
निष्ठवंतांनंतर संभाजीनगर भाजप कार्यालयात रिपाइंचा 'रुद्रावतार'! कार्यकर्त्यांचा आत्मदहनाचा प्रयत्न
Daily Top 2Weekly Top 5

बाप डोक्यावर आणि मुले खांद्यावर घेऊन जगायची वेळ येईल...; उद्धव ठाकरेंची राणे पिता-पुत्रांवर टीका 

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 13, 2024 19:26 IST

Uddhav Thackeray Kankavli Speech: ठाकरेंनी सावंतवाडीत प्रचारसभा घेत दीपक केसरकर यांच्यावर टीका केली. यानंतर सायंकाळी कणकवलीत कुडाळ, कणकवली मतदारसंघासाठी प्रचार सभा घेतली. यावेळी ठाकरेंनी नारायण राणे पिता पुत्रांवर टीका करताना मोदींवरही टीका केली. 

माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज सावंतवाडी, कुडाळ, कणकवली मतदारसंघासाठी प्रचारसभा घेतली. सिंधुदूर्गमध्ये प्रवेश करतानाच ठाकरेंची गाडी तपासण्यात आली. यानंतर ठाकरेंनी सावंतवाडीत प्रचारसभा घेत दीपक केसरकर यांच्यावर टीका केली. यानंतर सायंकाळी कणकवलीतकुडाळ, कणकवली मतदारसंघासाठी प्रचार सभा घेतली. यावेळी ठाकरेंनी नारायण राणे पिता पुत्रांवर टीका करताना मोदींवरही टीका केली. 

इकडे येऊन काश्मीरचे ३७० कलम काढले म्हणून सांगायची गरज काय असा सवाल ठाकरे यांनी उपस्थित केला. शेतकऱ्यांच्या सोयाबीनला, कापसाला कधी भाव देताय ते बोला, असेही ठाकरेंनी मोदी शाहांना सुनावले. याचबरोबर मोदींनी आज आमच्या व्यासपीठावर येऊन घराणेशाहीवर बोलावे असे आवाहन करत असल्याचे ठाकरे म्हणाले. 

मोदी घराणेशाहीवर बोलतात, उद्धव ठाकरे यांना नको आणि बाप डोक्यावर व त्याची दोन मुले खांद्यावर घेऊन मिरवत आहेत, अशी टीका ठाकरेंनी केली. बाळासाहेब ठाकरेंनी, शिवसैनिकांनी शिवसेनेची जबाबदारी माझ्यावर दिली तर तुम्ही कसली ढवळाढवळ करत आहात, असा सवालही ठाकरेंनी केला. 

सिंधुदुर्गात होत असलेली गुंडगिरी काही वर्षांपूर्वी तुम्हीच संपविली आणि चुकून खासदार म्हणून निवडून दिले. आता पुन्हा बाप आणि मुलांची दादागिरी सुरु होणार. आताच चूक सुधारली नाही तर बाप डोक्यावर आणि मुले खांद्यावर घेऊन जगायची वेळ येईल, असा इशाराही ठाकरेंनी कणकवली, कुडाळ मतदारसंघातील मतदारांना दिला.  

टॅग्स :Uddhav Thackerayउद्धव ठाकरेNarayan Raneनारायण राणे kankavli-acकणकवलीkudal-acकुडाळShiv SenaशिवसेनाBJPभाजपाmaharashtra assembly election 2024महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४