शहरं
Join us  
Trending Stories
1
सरकारने पहिल्याच दिवशी डाव टाकला; मनोज जरांगे बच्चू कडूंच्या शेतकरी लढ्याच्या आंदोलनात सहभागी
2
पोलिसांचे पोस्टमार्टेम कारनामे फलटणमध्येच नाहीत, शामलीमध्ये तर...; घरात चोरी झाली अन् डॉक्टर आंदोलनालाच बसले
3
बॉलिंग मशीनने घेतला युवा क्रिकेटपटूचा बळी, सराव करताना चेंडू डोक्याला लागला आणि...
4
डिजिटल इनव्हेस्टमेंट प्लॅटफॉर्म Groww चा आयपीओ येणार; कधीपासून आणि किती करावी लागणार गुंतवणूक?
5
आधी भर रस्त्यात कोयता नाचवला, गाडी चालकांना धमकावलं, आता पोलिसांनी त्याच ठिकाणी गुडघ्यावर बसवलं; व्हिडीओ व्हायरल
6
देवळात गेल्यावर तुम्ही योग्य पद्धतीने देवाचे दर्शन घेता का? १० महत्त्वाच्या गोष्टी पाळाच!
7
बिहारच्या राजकारणात Gen Z उमेदवारांची चर्चा; मैथिली ठाकूरसह कोण-कोण मैदानात? पाहा...
8
'बारामतीला जायचंय; एक रात्र राहू द्या..', पीडितेची हॉटेलमधील 'ती' रात्र; पीडितेचा हॉटेलमधील घटनाक्रम..
9
Video - चमत्कार! ३ वर्षीय मुलीच्या अंगावरून गेली कार, पुढे जे झालं ते पाहून सर्वच हैराण
10
२३ वर्षांच्या मुलाला संपवलं अन् हायवेवर फेकला मृतदेह; तपासात आईच निघाली आरोपी! नेमकं काय झालं?
11
श्रेयस अय्यरची दुखापत ठरली टीम इंडियासाठी मोठा धक्का, इतके महिने तो राहणार क्रिकेटपासून दूर
12
शायनी आहुजा कुठे गायब झाला? व्हायरल होतोय अभिनेत्याचा फोटो; ओळखणंही झालं कठीण
13
रॉबर्ट कियोसाकी यांनी सांगितला श्रीमंत बनण्याचा मार्ग; म्हणाले, "आपल्या भावनांवर नियंत्रण...."
14
"दाऊद इब्राहिम दहशतवादी नाही...", ममता कुलकर्णीचं अंडरवर्ल्ड डॉनवर वादग्रस्त विधान
15
सोन्याच्या वाढलेल्या दरांवर ग्रामपंचायतीने तोडगा काढला! महिलांना केवळ तीनच दागिन्यांची परवानगी, अन्यथा...
16
लाडकी बहीण योजना: २६ लाख अपात्र महिला, ४ हजार कोटींची खैरात; सरकारी तिजोरीवर मोठा आर्थिक भार
17
ऑनर किंलिंग प्रकरणात २० वर्षांची शिक्षा, तुरुंगातून सुटला, आता दोषी आरोपीचा अपघाती मृत्यू
18
स्वप्न साकार! नोकरी नाकारली अन् शेती केली; आता कमावते १ कोटी, ३० जणांना दिला रोजगार
19
तुमच्या पगारात किती महागडे घर खरेदी करावे? तज्ज्ञांनी सांगितले 'हे' ४ महत्त्वाचे नियम; EMI किती असावा?
20
२५ नोव्हेंबरला राम मंदिरात दर्शन बंद राहणार, PM मोदी अयोध्येला जाणार; ८ हजार निमंत्रणे गेली

निवडणूक अधिकाऱ्यांचा धडाका! ठाकरेंची सलग तीन दिवस, तर शिंदे-फडणवीस-पवार यांची एकाच दिवसात बॅग तपासणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 13, 2024 20:13 IST

Maharashtra Assembly Election 2024: पहिल्या दोन तपासणीवेळी ठाकरेंनी निवडणूक अधिकाऱ्यांची शाळा घेत मोदी, शाह यांच्या बॅगा तपासा आणि त्याचे व्हिडीओ पाठवा असे सांगितले होते. यावरून सत्ताधाऱ्यांवर टीका होऊ लागताच आज एकाच दिवसात महायुतीच्या तिन्ही नेत्यांच्या बॅगांची तपासणी करण्यात आली आहे. 

माजी मुख्यमंत्री व मविआचे नेते उद्धव ठाकरेंची सलग तीन दिवस तपासणी करण्यात आली आहे. दोनवेळा हेलिकॉप्टरमधून उतरताना आणि एकदा गोवा-महाराष्ट्र सीमेवर ठाकरेंची तपासणी करण्यात आली. पहिल्या दोन तपासणीवेळी ठाकरेंनी निवडणूक अधिकाऱ्यांची शाळा घेत मोदी, शाह यांच्या बॅगा तपासा आणि त्याचे व्हिडीओ पाठवा असे सांगितले होते. यावरून सत्ताधाऱ्यांवर टीका होऊ लागताच आज एकाच दिवसात महायुतीच्या तिन्ही नेत्यांच्या बॅगांची तपासणी करण्यात आली आहे. 

आज सकाळी अजित पवारांच्या बॅगेची तपासणी करण्यात आली. या बॅगेत चकल्या सापडल्यावर अजित पवारांनी निवडणूक अधिकाऱ्यांना त्या खाण्यास सांगितले. तर दुपारी पालघरला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बॅगची तपासणी करण्यात आली. सायंकाळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या बॅगांची तपासणी करण्यात आली. 

पालघर विधानसभेचे उमेदवार राजेंद्र गावित यांच्या प्रचारासाठी आलेल्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे पालघर नंडोरे येथील हेलिपॅडवर आले. यावेळी त्यांच्या बॅगची तपासणी निवडणूक विभागाच्या अधिकाऱ्यांनी केली. यावेळी शिंदे यांनी आपल्या बॅगेत कपडे आहेत, युरिन पॉड वगैरे काही नाही असे म्हणत उद्धव ठाकरेंची खिल्ली उडविली. तर काटोल येथे हेलिपॅडवर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या बॅगची तपासणी करण्यात आली. 

टॅग्स :Uddhav Thackerayउद्धव ठाकरेEknath Shindeएकनाथ शिंदेAjit Pawarअजित पवारDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसElection Commission of Indiaभारतीय निवडणूक आयोगmaharashtra assembly election 2024महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४