शहरं
Join us  
Trending Stories
1
अटारी जोधपूरपासून ९०० किमी दूर, ४८ तासांत कसे जाणार? पाकिस्तानात दिलेल्या महिला भारतात माहेरी आलेल्या
2
स्वामी पुण्यतिथी शिवरात्रि एकाच दिवशी: शिवकृपा, गुरुबळ लाभण्याची सुवर्ण संधी; ‘असे’ करा व्रत
3
पाकिस्तानविरोधात भारताची मोठी कारवाई! गृहमंत्री अमित शाहांचे सर्व मुख्यमंत्र्यांना 'हे' निर्देश...
4
मारुती सुझुकीला मोठा धक्का! सर्वाधिक गाड्या विकूनही तोटा, नेमकं काय आहे कारण?
5
ऐतिहासिक कामगिरीच्या उंबरठ्यावर सीएसकेचा कर्णधार महेंद्रसिंह धोनी, एलिट लिस्टमध्ये सामील होणार
6
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य
7
अमेरिका, ब्रिटनसाठी गेली ३० वर्षे पाकिस्तान दहशतवाद पोसतोय; पाकिस्तानी संरक्षण मंत्र्यांचा गौप्यस्फोट
8
पहलगाम हल्ल्याचा बाजारावरही परिणाम; ९ लाख कोटींचे नुकसान, अदानी पोर्टसह 'हे' शेअर्स आपटले
9
पीएसएलमध्ये काम करणाऱ्या सर्व भारतीयांना ४८ तासांत पाकिस्तान सोडण्याचे आदेश!
10
स्मरण दिन: स्वामींचे स्वप्नात दर्शन झाले? काय असू शकतात संकेत? जाणून घ्या नेमका अर्थ...
11
१ वर्ष एटीएम कार्ड वापरण्यासाठी बँक किती चार्ज घेते? 'या' कार्डवर द्यावे लागत नाही पैसे
12
अमित शाहांची सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांसोबत बैठक, पाकिस्तानी नागरिकांबद्दल दिला महत्त्वाचा आदेश
13
"निर्लज्ज पाकिस्तान", दहशतवाद्यांना 'स्वातंत्र्य सैनिक' म्हटल्यावर पाक क्रिकेटर प्रचंड संतापला
14
गुंतवणुकीत 'ही' काळजी घेतली, तर होऊ शकता मालामाल! कोणत्या गोष्टी लक्षात ठेवायच्या?
15
पंचग्रही ३ राजयोगात स्वामींची पुण्यतिथी: १० राशींना वरदान, लाभच लाभ; बक्कळ पैसा, असीम कृपा!
16
१९७१ च्या युद्धात भारताने पश्चिम पाकिस्तानमधील या भागांवर केला होता कब्जा, नंतर दिले होते परत, कारण काय?
17
धक्कादायक! लग्नातील जेवणामुळे उलट्या; ३७ मुलांसह ५१ जणांना अन्नातून विषबाधा
18
'बाभळीचं झाड सोडून आंब्याच्या झाडाखाली या'; ठाकरेंच्या आमदाराला भाजपच्या मंत्र्याकडून ऑफर
19
घटस्फोटानंतर फळफळलं धनश्री वर्माचं नशीब, या चित्रपटामधून करणार सिनेसृष्टीत पदार्पण
20
सोन्याच्या किमतीत पाकिस्तान भारताच्या ३ पाऊल पुढे; किंमत ऐकून ग्राहक जातायेत पळून

अजित पवारांची मोठी खेळी! नवाब मलिकांना एबी फॉर्म दिला; भाजपचा विरोध तरीही...

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 29, 2024 12:31 IST

Nawab Malik got AB Form: महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचा उमेदवारी अर्ज भरण्याचा आजचा शेवटचा दिवस आहे. यामुळे दुपारपर्यंत सर्वच पक्षांचे उमेदवार जाहीर होणार आहेत. मलिक हे शिवाजीनगर-मानखुर्द मतदारसंघातून अपक्ष निवडणूक लढविण्याच्या तयारीत आहेत.

दाऊदशी संबंध असल्यावरून, मनी लाँड्रिंगप्रकरणात महाविकास आघाडीच्या सरकारवेळी भाजपानेनवाब मलिक यांच्याविरोधात टीकेची झोड उठविली होती. आता तेच नवाब मलिक तुरुंगातून जामिनावर बाहेर आल्यानंतर भाजपासोबत मांडीला मांडी लावून सत्तेत बसलेल्या अजित पवारांच्या गोटात बसले होते. यंदाच्या निवडणुकीत मलिक यांना तिकीट देण्यास भाजपाचा विरोध होता. यामुळे अजित पवारांनी मलिक यांच्या मुलीला अणुशक्तीनगरमधून उमेदवारी दिली होती. परंतू, तिने उमेदवारी अर्ज भरताच आज शेवटच्या दिवशी अजित पवारांनी मलिकांना एबीफॉर्म दिल्याने महायुतीत खळबळ उडाली आहे. 

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचा उमेदवारी अर्ज भरण्याचा आजचा शेवटचा दिवस आहे. यामुळे दुपारपर्यंत सर्वच पक्षांचे उमेदवार जाहीर होणार आहेत. मलिक हे शिवाजीनगर-मानखुर्द मतदारसंघातून अपक्ष निवडणूक लढविण्याच्या तयारीत आहेत. अजित पवारांनी एबी फॉर्म दिल्याचे सूत्रांकडून समजते आहे. काही वृत्तवाहिन्यांनी याचे वृत्त दिले आहे. 

यामुळे मलिक आता राष्ट्रवादीचे अधिकृत उमेदवार होतात की अजित पवार या जागेवर अन्य कोणाला उमेदवारी देतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. एबी फॉर्म देऊन अजित पवारांनी मलिक यांना उमेदवारी अर्ज भरण्यासाठी तयार राहण्याचे संकेत दिले आहेत. आता अजित पवार भाजपसोबत काय चर्चा करतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. 

फॉर्म A आणि B म्हणजे काय?निवडणूक लढवू इच्छिणारा उमेदवार नामांकन दाखल करताना 'फॉर्म A' आणि 'फॉर्म B' वापरतो. हे दोन्ही फॉर्म उमेदवाराला निवडणूक प्रक्रियेतील आवश्यक माहिती पुरवतात. फॉर्म A हा राजकीय पक्ष वापरतात जे त्यांच्या उमेदवारांना नामनिर्देशित करण्यासाठी निवडणूक आयोगाला माहिती देतात. या फॉर्ममध्ये राजकीय पक्षाचे नाव, पक्षाचे चिन्ह आणि उमेदवाराचे नाव समाविष्ट आहे. 

टॅग्स :nawab malikनवाब मलिकAjit Pawarअजित पवारBJPभाजपाMahayutiमहायुतीmaharashtra assembly election 2024महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४mankhurd-shivaji-nagar-acमानखुर्द शिवाजी नगर