शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
3
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
4
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
5
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
6
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
7
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
8
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
9
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
10
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
11
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
12
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
13
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
14
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
15
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
16
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
17
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
18
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
19
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
20
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
Daily Top 2Weekly Top 5

Maharashtra Vidhan Sabha Election : बारामतीचं ठरलं! काका विरोधात पुतण्या निवडणूक लढणार? जितेंद्र आव्हाडांनी दिले संकेत

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 23, 2024 18:06 IST

Maharashtra Vidhan Sabha Election : उपमुख्यमंत्री अजित पवार बारामती विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढणार हे निश्चित झाले आहे.

Maharashtra Vidhan Sabha Election ( Marathi News ) : विधानसभा निवडणुकांची रणधुमाळी सुरू झाली असून राष्ट्रवादी काँग्रेसने आज उमेदवारांची यादी जाहीर केली आहे. या यादीत ३८ उमेदवारांच्या नावांचा समावेश आहे. उपमुख्यमंत्री अजित पवारबारामती विधानसभा मतदारसंघातून लढणार असल्याचे निश्चित झाले आहे. यामुळे आता त्यांच्याविरोधात शरद पवार गटाकडून कोण निवडणूक लढणार या चर्चा सुरू असून आता आमदार जितेंद्र आव्हाड यांनी शरद पवार गटाच्या उमेदवाराचे नाव सांगितले आहे. 

जनतेच्या मनातला सामान्य आमदार मिळेल; उमेदवारी घोषित होताच महेश सावंत यांचा टोला

गेल्या काही दिवसापासून उपमुख्यमंत्री अजित पवारबारामती विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढणार नसल्याचे बोलले जात होते. आज उमेदवार यादी जाहीर झाल्यानंतर अजित पवार बारामतीमधूनच लढणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. आता त्यांच्याविरोधात राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाकडून कुणाला उमेदवारी मिळणार या चर्चा सुरू आहेत. दरम्यान, या चर्चांना आमदार जितेंद्र आव्हाड यांनी पूर्णविराम दिला आहे. 

शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी आज पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांना पत्रकारांनी बारामती विधानसभा मतदारसंघातून कोण लढणार असा प्रश्न केला. यावेळी आव्हाड यांनी युगेंद्र पवार यांच्या नावाचा उल्लेख केला. आमदार जितेंद्र आव्हाड म्हणाले, बारामती विधानसभेतून कदाचित मला असं वाटतंय की युगेंद्र पवार हे आमचे उमेदवार असतील. मला अजून याबाबतीत खात्री नाही, असंही आमदार जितेंद्र आव्हाड म्हणाले. 

"महाविकास आघाडीमध्ये एखाद्या, दुसऱ्या जागेवर चर्चा सुरू आहे. काही दिवसात होईल पूर्ण. शरद पवार माझा अर्ज दाखल करण्यासाठी येणार आहेत, असंही आव्हाड म्हणाले. 

अजित पवार यांच्या राष्ट्रवादीने ३८ नावांची केली घोषणा

१. बारामती - अजित पवार २. येवला - छगन भुजबळ ३. आंबेगाव - दिलीप वळसे-पाटील ४  कागल - हसन मुश्रीफ ५. परळी - धनंजय मुंडे ६. दिंडोरी - नरहरी झिरवाळ  ७.अहेरी - धर्मराव बाबा आत्राम८. श्रीवर्धन - आदिती तटकरे ९. अंमळनेर - अनिल भाईदास पाटील १०. उदगीर- संजय बनसोडे ११. अर्जुनी मोरगाव - राजकुमार बडोले १२. माजलगाव- प्रकाश दादा सोळंके १३ वाई - मकरंद पाटील१४.सिन्नर- माणिकराव कोकाटे १५. खेड आळंदी- दिलीप मोहिते १६. अहमदनगर शहर- संग्राम जगताप१७. इंदापूर - दत्तात्रय भरणे १८.अहमदपूर- बाबासाहेब पाटील १९. शहापूर - दौलत दरोडा २०. पिंपरी- अण्णा बनसोडे २१. कळवण- नितीन पवार२२. कोपरगाव- आशुतोष काळे २३.अकोले- डॉ. किरण लहामटे २४. बसमत- चंद्रकांत उर्फ राजू नवघरे २५. चिपळूण- शेखर निकम २६. मावळ- सुनील शेळके २७. जुन्नर- अतुल बेनके २८.मोहोळ- यशवंत विठ्ठल माने २९. हडपसर- चेतन तुपे ३०. देवळाली- सरोज आहिरे ३१. चंदगड- राजेश पाटील ३२. इगतपुरी- हिरामण खोसकर ३३. तुमसर- राजू कारेमोरे ३४. पुसद- इंद्रनील नाईक ३५. अमरावती शहर- सुलभा खोडके ३६. नवापुर-भरत गावित३७. पाथरी- निर्मला उत्तमराव विटेकर३८. मुंब्रा-कळवा- नजीब मुल्ला

टॅग्स :maharashtra assembly election 2024महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४Sharad Pawarशरद पवारAjit Pawarअजित पवारBaramatiबारामतीNCPराष्ट्रवादी काँग्रेसyugendra pawarयुगेंद्र पवार