शहरं
Join us  
Trending Stories
1
काश्मिरात अतिरेकी हल्ला, २८ ठार; 'टार्गेट किलिंग'मध्ये महाराष्ट्रातील पर्यटकांचाही समावेश
2
Todays Horoscope : आज आर्थिक गुंतवणूक विचारपूर्वक करा; जाणून घ्या तुमचे राशीभविष्य
3
वाह रे पठ्ठया...! २२ व्या वर्षीच झाला आयएएस; पुण्याच्या शिवांशचं पहिल्याच प्रयत्नात यश
4
रुपचंदानी कुटुंबीय पहलगाममध्ये सुखरूप; काळजीनं नातेवाईकांचा जीव लागला होता टांगणीला
5
'यूपीएससी'त पुण्याचा अर्चित डोंगरे तिसरा; राज्यातील ९५ विद्यार्थ्यांनी घातली यशाला गवसणी
6
पोप फ्रान्सिस यांच्या निधनामुळे कर्मयोगी जवाहरलाल दर्डा यांच्या पुतळ्याचे अनावरण स्थगित
7
KL राहुलचं एकदम कूल सेलिब्रेशन! मग संजीव गोयंका यांच्या हातात हात दिला; पण... (VIDEO)
8
मत्स्य व्यवसायाला कृषी समकक्ष दर्जा, मंत्रिमंडळाचा निर्णय; मच्छीमारांना ६ हजाराचा लाभ मिळणार
9
भिसेंवर उपचार करणाऱ्या डॉक्टरांची होणार चौकशी; महाराष्ट्र मेडिकल कौन्सिलचा निर्णय
10
एक मंदिर, एक विहीर, एक स्मशान...डॉ. भागवतांच्या संप्रदायाला ही एकता समजली तरी खूप बरे होईल
11
गुलफिशा फातिमाने तुरुंगात खितपत का पडावे?; २ वर्ष उलटली तरी जामीन नाही  
12
महानगरांमध्ये अघोषित पाणीबाणी लागू; तहान भागत नाही?, निमूट पैसे मोजा, टँकर मागवा!
13
अवघ्या ७७ चौरस फुटाच्या घरात राहते युवती; इवल्याशा खोलीनं संपवला जीवनातील संघर्ष
14
महाराष्ट्रातल्या दोन पर्यटकांचा पहलगाम हल्ल्यात मृत्यू; पर्यटक जखमी असल्याची CM फडणवीसांची माहिती
15
"तुला मारणार नाही, जा आणि मोदींना सांग"; पतीची डोळ्यांसमोर हत्या केल्यानंतर दहशतवाद्यांनी पत्नीला धमकावलं
16
दररोज फक्त ₹7 ची बचत करा अन् दरमहा ₹5000 मिळवा; जाणून घ्या सरकारी योजनेचे फायदे...
17
जम्मू-काश्मीरमध्ये मोठा दहशतवादी हल्ला; नाव विचारुन झाडल्या गोळ्या, 27 जणांच्या मृत्यूची भीती
18
मराठी मुलीच्या वडिलांना, काकांना दहशतवाद्यांनी नाव विचारून डोळ्यांदेखत गोळ्या घातल्या- एकनाथ शिंदे
19
"सरकारला धन्यवाद, पण पुन्हा एकदा सांगतो..."; हिंदी सक्तीच्या माघारीनंतर राज ठाकरेंचे ट्विट
20
पहलगाममध्ये टीआरएफने घडवला नरसंहार; दहशतवादी संघटनेने पत्र जारी करुन सांगितले कारण

ठाकरे की शिंदे कोण वरचढ ठरणार? २६ मतदारसंघात थेट लढत; उमेदवारांमध्ये काँटे की टक्कर!

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 24, 2024 10:55 IST

Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024: शिवसेनेत मोठी फूट पडल्यानंतरची ही पहिलीच विधानसभा निवडणूक असून, उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांचा चांगलाच कस लागणार असल्याचे सांगितले जात आहे.

Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024: अनेक बैठका, चर्चा, दावे-प्रतिदावे, अनेक तास चाललेली खलबते यातून मार्ग काढत अखेर यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान इथे ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीनंतर मविआ नेत्यांनी फॉर्म्युला जाहीर केला. मविआबद्दल चुकीचा संदेश जात असल्याचे शरद पवार यांनी या नेत्यांच्या लक्षात आणून दिले. त्यानंतर समान जागावाटपाचे ८५-८५-८५ असे फॉर्म्युल्याचे 'चित्र' रंगवण्यात आले. महायुतीचा भाग असलेल्या शिवसेना शिंदे गटाने ४५ उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली. यानंतर शिवसेना ठाकरे गटाने आपली ६५ उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली.

जून २०२२ मध्ये एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली आमदार आणि खासदारांनी मोठ्या प्रमाणावर बंडखोरी केली आणि शिवसेनेला मोठेच भगदाड पडले. यानंतर भाजपासह शिवसेना शिंदे गटाने सत्ता स्थापन केली. इतकेच नव्हे तर शिवसेना पक्ष आणि पक्षचिन्हही एकनाथ शिंदे यांना मिळाले. शिवसेनेला खिंडार पडल्यानंतर आता ही पहिलीच विधानसभा निवडणूक आहे. त्यामुळे उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांचा चांगलाच कस लागणार असल्याचे बोलले जात आहे. 

राज्यातील अनेक ठिकाणी दोन्ही गटाचे उमेदवार आमनेसामने 

आतापर्यंत जाहीर झालेल्या उमेदवारांपैकी २६ मतदारसंघ असे आहेत, ज्यात शिवसेना ठाकरे गट आणि शिवसेना शिंदे गटातील उमेदवारांमध्ये थेट टक्कर असणार आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मतदारसंघापासून ठाणे, मुंबई, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, संभाजीनगर यांसह राज्यातील अनेक ठिकाणी दोन्ही गटाचे उमेदवार आमनेसामने असणार आहेत. विशेष म्हणजे धर्मवीर आनंद दिघे यांचे पुतणे केदार दिघे यांना ठाकरे गटाने निवडणुकीच्या रिंगणात उतरवले असून, ते थेट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना आव्हान देणार आहेत. महायुतीच्या जागावाटपात कुडाळची जागा शिवसेनेच्या शिंदे गटाला मिळाल्यानंतर भाजपा नेते निलेश राणे यांनी शिवसेना शिंदे गटात प्रवेश केला आहे. निलेश राणे कुडाळमधून निवडणूक लढवणार असून, वैभव नाईक यांच्यावर पुन्हा एकदा ठाकरे गटाने विश्वास दाखवत उमेदवारी जाहीर केली आहे.

पहिल्या यादीनंतर शिवसेना शिंदे गट आणि ठाकरे गटात थेट लढत असलेले २६ मतदारसंघ कोणते?

क्र.मतदारसंघाची नावेशिवसेना ठाकरे गटाचे उमेदवारशिवसेना शिंदे गटाचे उमेदवार
१.कोपरी-पाचपाखाडीकेदार दिघेएकनाथ शिंदे
२.ओवळा माजिवडानरेश मणेराप्रताप सरनाईक
३.मागाठणेअनंत (बाळा) नरमनिषा वायकर
४.कुर्लाप्रविणा मोरजकरमंगेश कुडाळकर
५.माहीममहेश सावंतसदा सरवणकर
६.महाडस्नेहल जगतापभरत गोगावले
राधानगरीके. पी. पाटीलप्रकाश आबिटकर
८.राजापूरराजन साळवीकिरण सामंत
सावंतवाडीराजन तेलीदीपक केसरकर
१०.कुडाळवैभव नाईकनिलेश राणे
११.रत्नागिरीसुरेंद्रनाथ (बाळ) मानेउदय सामंत
१२.दापोलीसंजय कदमयोगेश कदम
१३.पाटणहर्षद कदमशंभूराज देसाई
१४.सांगोलादीपक आबा साळुंखेशहाजी बापू पाटील
१५.परांडाराहुल ज्ञानेश्वर पाटीलतानाजी सावंत
१६.कर्जतनितीन सावंतमहेंद्र थोरवे
१७.मलेगाव बाह्यअद्वय हिरेदादा भुसे
१८.नांदगावगणेश धात्रकसुहास कांदे
१९.वैजापूरदिनेश परदेशीरणेश बोरणारे
२०.संभाजीनगर पश्चिमराजू शिंदेसंजय शिरसाठ
२१.संभाजीनगर मध्यकिशनचंद तनवाणीप्रदीप जयस्वाल
२२.सिल्लोडसुरेश बनकरअब्दुल सत्तार
२३.कळमनुरीडॉ. संतोष टाळफेसंतोष बांगर
२४.रामटेकविशाल बरबटेआशिष जयस्वाल
२५.मेहकरसिद्धार्थ खरातसंजय पायमुलकर
२६.पाचोरावैशाली सूर्यवंशीकिशोर धनसिंग पाटील

 

टॅग्स :maharashtra assembly election 2024महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४Shiv SenaशिवसेनाUddhav Thackerayउद्धव ठाकरेEknath Shindeएकनाथ शिंदे