शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल कोण? सीपी राधाकृष्णन राजीनामा देणार; १२ सप्टेंबरला उपराष्ट्रपतीपदाची शपथ घेण्याची शक्यता
2
पुण्यात भलामोठा आयकर रिटर्न घोटाळा; आयटी, मल्टीनॅशनल कंपन्यांचे कर्मचारी अडकले... 
3
बालेंद्र शाहांचा नकार; सुशीला कार्की होणार नेपाळच्या पंतप्रधान? तरुणांचा सर्वाधिक पाठिंबा...
4
नेपाळमधील सत्तापालटावर चीनची पहिली प्रतिक्रिया; माजी पंतप्रधान ओलींचं नाव घेणं टाळलं!
5
मुंबई महापालिका निवडणुकीसाठी शिंदेसेनेची 'जम्बो टीम'; २१ नेत्यांची मुख्य कार्यकारी समिती जाहीर
6
आर्टिफिशियल फ्लेवर्स, प्रिझर्व्हेटिव्ह्जशिवाय घरीच करा 'अ‍ॅपल जॅम'; मुलं म्हणतील, यम्मी...
7
ठाकरेंचा आवाज छत्रपती शिवाजी महाराज पार्कवर घुमणार; दसरा मेळाव्याला महापालिकेची परवानगी
8
Samruddhi Mahamarg : ‘समृद्धी महामार्गावर’वर दिसणारे ते खिळे नाहीत, मग काय?; समजून घ्या 'इपॉक्सी ग्राउटिंग' तंत्रज्ञान
9
वायफाय राउटरच्या बाजूला ठेवल्यात 'या' गोष्टी? आताच बाजूला करा अन्यथा...
10
आयटी सेक्टरमध्ये तेजी! गुंतवणूकदारांनी कमावले २.६४ लाख कोटी रुपये; 'हे' स्टॉक्स ठरले टॉप गेनर
11
वॉशिंग्टन सुरक्षित केले म्हणून डोनाल्ड ट्रम्प हॉटेलमध्ये जेवायला गेले...; लोकांनी जे केले...
12
अमरावतीची 'हवा'च न्यारी! देशात डंका, राष्ट्रीय स्तरावर पटकावला पहिला क्रमांक
13
उपराष्ट्रपती निवडणुकीत 'क्रॉस व्होटिंग'च्या संशयाची सुई; कोणत्या खासदारांनी ऐनवेळी पलटी मारली?
14
भरणी श्राद्ध २०२५: गुरुवारी भरणी श्राद्ध, एकदा करावे की दरवर्षी? अधिकार कोणाला आणि नियम काय?
15
भारतीय अर्थव्यवस्था सुसाट! टॅरिफचा धाक दाखवणाऱ्या अमेरिकेला 'फिच' रिपोर्टने धक्का! इतका वाढणार जीडीपी
16
भयंकर! नेपाळनंतर फ्रान्समध्ये सरकारविरुद्ध मोठं आंदोलन; रस्त्यावर जाळपोळ अन् तोडफोड
17
जिच्यासाठी माजी उपसरपंच गोविंद बर्गे यांनी आयुष्य संपवलं, ती पूजा गायकवाड कोण?
18
मस्तच! नवरात्रात कन्या पूजनानंतर मुलींना द्या 'ही' यूजफुल गिफ्ट्स; आनंदाने उजळतील चिमुकल्यांचे चेहरे
19
फुलांचा गजरा माळून गेली आणि फसली, ऑस्ट्रेलियात भारतीय अभिनेत्रीवर कारवाई, नेमकं कारण काय?  
20
कतारनंतर आता तुर्कीवर हल्ला करणार इस्रायल? हमासशी आहे थेट कनेक्शन!

“अजितदादांना टार्गेट करुन महायुतीत वितुष्ट आणू नये”; मिटकरींचे गुलाबराव पाटलांना प्रत्युत्तर

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 1, 2024 19:41 IST

Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024 Result: मोठ्या मेहनतीने या निवडणुकीत यश मिळाले आहे. चांगल्या पद्धतीने सत्ता आणल्यावर अशा प्रकारे महायुतीत कोणी मिठाचा खडा टाकू नये, असे मिटकरी यांनी म्हटले आहे.

Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024 Result: विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर आठवडाभरानंतर महायुती सरकारचा शपथविधी कधी होणार, याबाबत स्पष्टता आली आहे. राज्यातील महायुती सरकारचा शपथविधी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत गुरुवार, ५ डिसेंबर २०२४ रोजी सायंकाळी ५ वाजता आझाद मैदान, मुंबई येथे संपन्न होणार आहे. यानंतर आता घडामोडींना वेग आला असून, जय्यत तयारीला सुरुवात झाली आहे. महाविकास आघाडीतील नेते ईव्हीएमवर पराभवाचे खापर फोडत असून, अनेक उमेदवारांनी फेरमतमोजणीची मागणी लावून धरली आहे. यातच शिवसेना शिंदे गटातील नेत्यांनी एक मोठे विधान केले आहे. याला आता अजित पवार गटातील नेत्याने प्रत्युत्तर दिले आहे. 

एकनाथ शिंदे यांनी गेल्या अडीच वर्षांत जनतेत मोठे नावलौकिक मिळवले. लाडक्या बहि‍णींचा लाडका भाऊ झाला, शेतकऱ्यांचा भाऊ झाला, तरुणांचा मित्र झाला. या सर्वांचे आशीर्वाद घेऊन हा माणूस लढत आहे. एकनाथ शिंदे यांच्यावर टीका करणे योग्य नाही. आम्ही फक्त ८१-८५ जागा लढलो. अजित पवार महायुतीत आले नसते, तर त्या जागा आमच्या वाटेला मिळाल्या असत्या, तर आता शिवसेनेच्या ९० ते १०० जागा तुम्हाला दिसल्या असत्या. अजित पवार यांना सत्तेत सहभागी करून घेतले, तेव्हाही एकनाथ शिंदे यांनी त्याबाबत कधी प्रश्न विचारला नाही, असे गुलाबराव पाटील यांनी म्हटले आहे. याला अमोल मिटकरी यांनी प्रत्युत्तर दिले आहे.

अजितदादांना टार्गेट करुन महायुतीत वितुष्ट आणू नये

गुलाबराव पाटील यांनी केलेल्या टीकेवर बोलताना अमोल मिटकरी म्हणाले की, शिवसेना शिंदे गटाचे नेते रामदास कदम असतील किंवा गुलाबराव पाटील असतील यांनी अजित पवारांना टार्गेट करू नये. महायुतीत वितुष्ट निर्माण करू नये. गुलाबराव पाटलांनी एक गोष्ट समजून घ्यावी. त्यांचे नाव गुलाबराव आहे. त्यांनी त्याच्या नावासारखे राहावे. हल्ली त्यांचा सुगंध कमी झालेला दिसत आहे. कॅबिनेटमध्ये म्हणजेच राज्य मंत्रिमंडळात मंत्रीपदी त्यांची वर्णी लागत आहे की, नाही याबद्दल जरा शंका आहे. त्यामुळे ते अशी वक्तव्ये करत असावेत, असा पलटवार अमोल मिटकरी यांनी केला. 

श्रीकांत शिंदे हे उपमुख्यमंत्री होतील, या बातम्यांत तथ्य नाही

शिवसेना शिंदे गटाला मुख्यमंत्रीपद मिळणार नसल्याने एकनाथ शिंदेंकडील अनेक नेते नाराज आहे. तर एकनाथ शिंदे यांना गृहमंत्रीपद मिळणार असेल, तरच उपमुख्यमंत्री पद स्वीकारले जाईल, असा आग्रह धरण्यात आल्याच्या चर्चा राजकीय वर्तुळात आहे. मंत्रिमंडळातील खात्यांवरून शिंदे गटात नाराजी असल्याची चर्चा असल्याचे म्हटले जात आहे. तसेच एकनाथ शिंदे यांचे सुपुत्र खासदार श्रीकांत शिंदे यांना उपमुख्यमंत्रीपद मिळू शकते, असे दावेही केले जात आहेत. यावर बोलताना, डॉ. श्रीकांत शिंदे हे उपमुख्यमंत्री होतील या बातम्यांत तथ्य नाही. या फक्त माध्यमांतील आणि सोशल मीडियातील बातम्या आहेत. गृहमंत्रीपद हे मुख्यमंत्रीपद ज्यांच्याकडे असते त्यांच्याकडेच हे पद असल्याने ते पद त्या पक्षाकडेच राहील, असे अमोल मिटकरी यांनी सांगितले.

दरम्यान, महायुती म्हणून आपण सगळे एकत्र निवडणूक लढलेलो आहोत. आताही आपण एकत्र राहिले पाहिजे. शेवटी अजित पवार यांनी घेतलेली मेहनत दुर्लक्षित करता येणार नाही. तिन्ही पक्षांनी निवडणुकीत खूप मेहनत केली आहे. आम्ही एकनाथ शिंदे यांची मेहनत नाकारत नाही. देवेंद्र फडणवीस यांनी केलेली मेहनत नाकारत नाही. कारण आम्हाला ठाऊक आहे की या तिन्ही नेत्यांनी, तिन्ही पक्षांनी व त्यांच्या कार्यकर्त्यांनी खूप कष्ट घेतले आहेत. मोठ्या मेहनतीने आपल्याला या निवडणुकीत यश मिळाले आहे. चांगल्या पद्धतीने आपण सत्ता आणल्यावर अशा प्रकारे महायुतीत कोणीही मिठाचा खडा टाकू नये, असे मिटकरी यांनी म्हटले आहे.  

टॅग्स :maharashtra assembly election 2024महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४maharashtra assembly election 2024 resultमहाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2024Amol Mitkariअमोल मिटकरीGulabrao Patilगुलाबराव पाटीलMahayutiमहायुतीNCPराष्ट्रवादी काँग्रेसShiv Senaशिवसेना