शहरं
Join us  
Trending Stories
1
भारत द्वेष्टा...! डोनाल्ड ट्रम्प यांचा भारतावर पहिला वार; ६ भारतीय ऑईल कंपन्यांवर निर्बंध लादले...
2
दोस्तीत कुस्ती! भारताला २५% टॅरिफचा धक्का देत डोनाल्ड ट्रम्प यांची पाकिस्तानशी हातमिळवणी; केली मोठी डील 
3
सलवार सूट घातला, त्यावर बुरखा चढवला अन् महिला डॉक्टरच्या घरात घुसून ७ वेळा चाकूने वार केला; नेमकं प्रकरण काय?
4
अरे ही कसली आई! १५ महिन्यांच्या लेकाला बस स्टँडवर सोडलं अन् इन्स्टा बॉयफ्रेंडसोबत पळाली
5
जुनी मैत्रिण ४ वर्षांनी पुन्हा भेटली, एकांतात भेटायला बोलावलं; बंद खोलीत तिला कायमचं संपवलं, मग... 
6
Video - क्रूरतेचा कळस! 'ती' जीव वाचवण्यासाठी हाता-पाया पडली पण 'तो' अमानुषपणे मारत राहिला
7
Video - पावसाचे थैमान! पुरामध्ये ३० तास अडकली शाळेची बस, १०० जणांना वाचवण्यात यश
8
ट्रम्प यांचा भारतावर २५ टक्के टॅरिफ बॉम्ब; १ ऑगस्टपासून लागू होणार आयात शुल्क, दंडही आकारणार
9
धक्कादायक! ४००० देऊन भीक मागणाऱ्यांचे स्पर्म गोळा केले, टेस्ट ट्यूब बेबीसाठी लाखो रुपये आकारून लोकांना फसवले! 
10
आजचे राशीभविष्य ३१ जुलै २०२५ : या राशीला धनलाभाचा दिवस, या राशीला काहीसा प्रतिकूल
11
भारत-पाक युद्ध तिसऱ्या देशाने थांबवले नाहीच; परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी खोडला दावा
12
‘लाडकी बहीण’च्या लाभार्थी महिला कर्मचाऱ्यांवर कारवाई; राज्य सरकारने जारी केले आदेश
13
मालेगाव खटल्याचा निकाल आज; १७ वर्षांनी विशेष NIA कोर्ट निर्णय देणार, संपूर्ण देशाचे लक्ष
14
सर्वांत महाग-शक्तिशाली निसार उपग्रहाचे यशस्वी प्रक्षेपण; पृथ्वीची प्रत्येक इंच जमीन मॅप करणार
15
“मोदी यांच्या आचारसंहिता भंगप्रकरणी कोर्टात जाणार, निवडणूक आयोगाची कारवाईस टाळाटाळ”: चव्हाण
16
कृषी खात्यातील कथित भ्रष्टाचाराची चौकशी करा!; सुरेश धस यांचे मुख्यमंत्र्यांना पुन्हा पत्र
17
डिझेल दर सवलतीमुळे एसटीचे ११.८ कोटी वाचणार; स्पर्धात्मक निविदेमुळे महामंडळाला फायदा
18
देशातील विमानांमध्ये सुरक्षेच्या २६३ त्रुटी! सर्वाधिक एअर इंडिया, तिसऱ्या क्रमांकावर इंडिगो
19
मुंडेंचे नाव आले अन् माझा छळवाद सुरू झाला: अण्णा डांगे; भाजपात फेरप्रवेश, मन केले मोकळे
20
अनिलकुमार पवार हे दादा भुसे यांचे नातेवाईक, शिफारशीने नियुक्ती; संजय राऊत यांचा आरोप

विदर्भात काँग्रेसची कोंडी? 'या' मतदारसंघांत नेत्यांची बंडखोरी; पवार, ठाकरे गटाविरोधात उभे ठाकले, मविआत नाराजीचे वारे

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 3, 2024 21:47 IST

बंडखोरांना उमेदवारी अर्ज मागे घेण्यासाठी ४ नोव्हेंबरची मुदत आहे. ही मुदत उद्यावर येऊन ठेपली तरी बंडखोरांची मनधरणी करण्यासाठी नेत्यांना यश आलेले नाहीय.

नागपूर : मविआला बंडखोरीचे ग्रहण लागले आहे. विदर्भात आपल्यालाच सर्व जागा सुटाव्यात म्हणून उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेसोबत जागावाटपात वाद घालणाऱ्या काँग्रेसला त्यांच्या पक्षाचे उमेदवार देऊनही बंडखोरांचा सामना करावा लागत आहे. अनेक ठिकाणी मित्रपक्षांना जागा सुटल्याने काँग्रेसच्या नेत्यांनी बंडखोरी केलेली आहे. याचा फटका काँग्रेसला व मविआला विधानसभा निवडणुकीत बसण्याची शक्यता आहे.  

बंडखोरांना उमेदवारी अर्ज मागे घेण्यासाठी ४ नोव्हेंबरची मुदत आहे. ही मुदत उद्यावर येऊन ठेपली तरी बंडखोरांची मनधरणी करण्यासाठी नेत्यांना यश आलेले नाहीय. काँग्रेसला जागा न मिळाल्याने पदाधिकारी नाराज झाले असून त्यांनी पक्षविरोधी काम करण्यास तयार असल्याचे म्हटले आहे. या बंडखोरांमुळे मविआचे उबाठा आणि शरद पवार गटामध्येही नाराजी व्यक्त केली जात असून काँग्रेसचे उमेदवार असलेल्या इतर जागांवर याचा फटका बसण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. 

काँग्रेसच्या बंडखोरीमुळे आघाडीत संताप मविआच्या नेत्यांनी आपापल्या पक्षांतील इच्छुकांच्या मुलाखती घेतल्या होत्या. जागावाटपासाठी चाचपणी करण्याचा हा मुळ उद्देश होता. परंतू, झाले असे की मुलाखत दिलेल्या सर्वांच्याच मनात तिकीट मिळण्याची आशा निर्माण झाली आणि ते निवडणुकीच्या तयारीला लागले. आता तिकीट न मिळाल्याने माघार कशी घ्यायची, पैसा, ताकद तर खर्ची पडली यामुळे हे इच्छुक आता माघार नाही या आवेशानेच निवडणुकीत उतरले आहेत. 

माजी मंत्री सुनील केदार यांचे समर्थक असलेले जि.प.चे समाज कल्याण सभापती मिलींद सुटे यांनी उमरेड मतदरसंघात तर जि.प. सदस्य उज्वला बोढारे व वृंदा नागपुरे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचा उमेदवार असलेल्या हिंगणा मतदारसंघात बंडखोरी केली आहे. शिवसेनेकडे असलेल्या रामटेकमध्ये अपक्ष म्हणून रिंगणात उतरलेले काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष व माजी मंत्री राजेंद्र मुळक यांनी अर्ज दाखल केला आहे. राष्ट्रवादीकडे असलेल्या काटोल मतदारसंघात युवक काँग्रेसचे याज्ञवल्क्य जिचकार यांनी बंडखोरी केली आहे. काँग्रेसच्या या भूमिकेमुळे महाविकास आघाडीत संताप व्यक्त केला जात आहे. 

विदर्भातील या मतदारसंघात काँग्रेसकडून बंडखोरी नागपूर पूर्व - पुरुषोत्तम हजारे, सावनेर- अमोल देशमुख, काटोल- राजश्री जिचकार, उमरेड- मिलींद सुटे, रामटेक- राजेंद्र मुळक, बल्लारपूर- डॉ. अभिलाषा गावतुरे, भंडारा- प्रेमसागर गणवीर, मनोज बागडे, तुमसर- अनिल बावनकर, साकोली- मनोज बागडे, अर्जुनी मोरगाव- अजय लांजेवार, आमगाव- अनिल कुमरे, गडचिरोली- डॉ. सोनल कोवे, विश्वजीत कोवासे, आरमोरी- शिलू चिमूरकर, अहेरी- हनुमंत मडावी, दर्यापूर- गुणवंत देवपारे, रामेश्वर अभ्यंकर, उमरखेड- संजय खाडे, वर्धा- डॉ. सचिन पावडे, सुधीर पांगुळ, अकोला पश्चिम- मदन भरगड, अकोला पूर्व- डॉ. सुभाष कोपरे, मेहकर- लक्ष्मण घुमरे, मलकापूर - हरिष रावळ, कारंजा- ज्योती गणेशपुरे असे बंडखोर आहेत.

 

टॅग्स :Mahavikas Aghadiमहाविकास आघाडीmaharashtra assembly election 2024महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४congressकाँग्रेसvidarbha regionविदर्भ महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४