शहरं
Join us  
Trending Stories
1
'मतदार याद्यांमध्ये घोळ, आम्हालाही मान्य; आमची मागणी होती की...", CM फडणवीसांचं मोठं विधान
2
सरकारने आयकर विधेयक २०२५ मागे घेतले; टॅक्स स्लॅबमध्ये काय बदल होणार? जाणून घ्या...
3
तेल कंपन्यांना 30,000 कोटींचे अनुदान, उज्ज्वला योजनेसाठी...; केंद्र सरकारने घेतले पाच मोठे निर्णय
4
ज्या आदित्य श्रीवास्तवचं नाव घेऊन राहुल गांधींनी ECI ला घेरले; तोच आता समोर आला, सांगितलं 'सत्य'
5
Eknath Shinde : ज्यांनी स्वाभिमान गुंडाळून ठेवला, त्यांचं....; उद्धव ठाकरेंना मागची जागा दिल्यावरून एकनाथ शिंदेंचा टोला
6
राहुल गांधींच्या आरोपानंतर काँग्रेस आक्रमक; दादरमध्ये रास्ता रोको, भाजपाविरोधात घोषणाबाजी
7
NASA : नासाचा मोठा निर्णय! इंटरनॅशनल स्पेस स्टेशन समुद्रात पाडणार! कारण ऐकून धक्का बसेल
8
अतुल परचुरेंच्या आठवणीत भावुक झाले दिलीप प्रभावळकर; म्हणाले, "डॉक्टरांनी त्याला..."
9
IND vs AUS: टीम इंडियाविरुद्ध ऑस्ट्रेलियाचा संघ जाहीर, भारतीय वंशाच्या दोन खेळाडूंना संधी!
10
हृदयस्पर्शी! "तुम्ही माझ्यासाठी श्रीकृष्णासारखे..."; महिलेने साडी फाडून मुख्यमंत्र्यांना बांधली राखी
11
Donald Trump Tariff News : अमेरिकाच टॅरिफबाबत गंडली! ट्रम्प यांची भारताबद्दल कडक भूमिका, पण परराष्ट्र मंत्रालय करतंय कौतुक
12
२ तासांचा हायव्हॉल्टेज ड्रामा, गर्लफ्रेंडच्या मिठीत सापडला नेता; पत्नीला पाहून पती पळाला, पण...
13
आकाश 'वाणी'! वैभव सूर्यवंशीमुळे स्टार विकेट किपर बॅटर संजूवर आलीये संघ सोडण्याची वेळ!
14
भारतीयांसाठी कॅनडा ठरतोय मृत्युचं घर; गेल्या ५ वर्षातील आकडे चिंताजनक!
15
प्राजक्ता माळीने वाढदिवशी घेतलं भीमाशंकरचं दर्शन; म्हणाली, "१२ ज्योतिर्लिंग यात्रा पूर्ण..."
16
चालत्या बसवर झाड कोसळलं, ५ जणांचा मृत्यू; महिला म्हणते, "आयुष्याचा प्रश्न, तुम्ही Video बनवताय"
17
BCCI: बीसीसीआय नव्या प्रशिक्षकाच्या शोधात, अर्जही मागवले! जाणून घ्या पात्रता
18
धनंजय मुंडेंनी मंत्रिपद स्वप्नातही पाहू नये, पुन्हा घेतले तर अजितदादांचा पक्ष संपेल: जरांगे
19
Video: हृदयस्पर्शी! हत्तीच्या पिंजऱ्यात पडला चिमुकला; गजराजाने जे केले त्यानं सर्वांचीच मने जिंकली
20
काय आहे युनिव्हर्सल बँकिंग? ११ वर्षांत पहिल्यांदाच RBI नं कोणत्या बँकेला दिला असा लायसन्स

Ajit Pawar: भाजपचा विरोध, तरीही नवाब मलिकांना उमेदवारी का दिली? अजित पवारांनी मांडली भूमिका...

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 30, 2024 11:36 IST

Ajit pawar on Nawab Malik: नवाब मलिक यांच्यावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, किरीट सोमय्या यांनी आरोप केले होते. मनी लाँड्रिंग, दाऊदशी संबंध असे गंभीर आरोप केले होते. यामुळे मलिक यांना सोबत घेण्यास भाजपाचा विरोध होता.

भाजपाचा विरोध असूनही अजित पवारांनी अखेरच्या दिवशी पत्ते खोलत नवाब मलिकांना उमेदवारी जाहीर केली. यावरून महायुतीत वाद होण्याची चिन्हे असताना अजित पवारांनीनवाब मलिकांना उमेदवारी देण्यामागची भूमिका स्पष्ट केली आहे. मलिक यांच्यावर आरोप झाले आहेत, त्यात तथ्य नसल्याचे आमचे म्हणणे आहे, असे अजित पवार यांनी स्पष्ट केले. 

नवाब मलिक यांच्यावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, किरीट सोमय्या यांनी आरोप केले होते. मनी लाँड्रिंग, दाऊदशी संबंध असे गंभीर आरोप केले होते. यामुळे मलिक यांना सोबत घेण्यास भाजपाचा विरोध होता. मलिक यांना उमेदवारी देण्यास अजित पवारांना भाजपाने विरोध केला होता. तरीही २९ ऑक्टोबरला अखेरच्या क्षणाला अजित पवारांनी मलिक यांना एबी फॉर्म दिला आणि मलिकांनी उमेदवारी दाखल केली आहे.

एबीपी माझावरील मुलाखतीत अजित पवार यांनी यावर खुलासा केला आहे. नवाब मलिक यांच्यावर वेगवेगळे आरोप झाले, सिद्ध झालेले नाहीत. माझ्यावरही अनेक आरोप झाले. एखादा पुढे जात असेल, शक्तीस्थळावर आघात करण्यासाठी आरोप केले जातात. राजीव गांधी यांची मिस्टर क्लीन अशी इमेज होती. ती डॅमेज केल्याशिवाय त्यांची ताकद कमी करता येणार नाही. बोफोर्सचे आरोप झाले आणि इंदिरा गांधींपेक्षा जास्त जागा निवडून आणलेल्या नेत्याला फटका बसला. यामुळे आरोप असणे वेगळे, एखादा आरोप सिद्ध होणे वेगळे. मलिक यांच्यावर आरोप झालेला आहे, त्यात तथ्य नसल्याचे आमचे म्हणणे आहे, असे अजित पवार म्हणाले.

कमी जागा का घेतल्या...५५ जागा वाटपावर अजित पवार यांनी आपली भुमिका स्पष्ट केली. उमेदवारी अर्ज मागे घेणार तेव्हा तुम्हाला समजेल. अधाशासारख्या जास्त जागा घेऊन शून्य निवडून आणायच्या नाहीत. आवाक्यात जागा घेऊन त्या निवडून आणण्यासाठी प्रयत्न आहेत, असे अजित पवार यांनी स्पष्ट केले.

 

टॅग्स :Ajit Pawarअजित पवारnawab malikनवाब मलिकNCPराष्ट्रवादी काँग्रेसBJPभाजपाmaharashtra assembly election 2024महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४