शहरं
Join us  
Trending Stories
1
दुसऱ्या महायुद्धानंतर प्रथमच युरोपावर युद्धाचे ढग; पोलंडने सीमेवर तैनात केले ४० हजार सैनिक
2
नेपाळची संसद भंग, निवडणुकीच्या तारखांची घोषणा; शुक्रवारी रात्री शेजारील देशात काय काय घडलं?
3
देशभरातील घरे होणार स्वस्त; ग्राहकांना थेट लाभ देण्याची क्रेडाईची मोठी घोषणा
4
UN परिषदेत १४२ देशांसह भारतानं उचललं मोठं पाऊल; अमेरिका अन् इस्रायलला बसला झटका, काय घडलं?
5
फवाद-वाणी कपूरचा 'अबीर गुलाल' भारतातही रिलीज होणार, पहलगाम हल्ल्यानंतर झाला होता बॅन
6
पोस्टाची जबरदस्त स्कीम; महिन्याला करा 'इतकी' गुंतवणूक देईल ₹४० लाखांचा रिटर्न, जाणून घ्या संपूर्ण गणित
7
आजचे राशीभविष्य- १३ सप्टेंबर २०२५: आर्थिक लाभाचा दिवस, पण वाणीवर संयम ठेवा
8
मराठा समाजाला अगोदर मिळालेले आरक्षण नकोय का? रद्द करायचे का?; ओबीसी नेते छगन भुजबळांचा सवाल
9
महाराष्ट्राविना देशाचा गाडा न चाले! देशात सर्वाधिक रोजगार, कंपन्या अन् पेन्शनधारक राज्यात
10
स्पाईसजेट विमानाचे चाक टेकऑफ घेताना निखळले; एकाच चाकावर मुंबईत लँडिंग, मोठी दुर्घटना टळली 
11
'महादेवी'चा निर्णय उच्चस्तरीय समितीने घ्यावा, सर्वोच्च न्यायालय; हत्तीण मठाकडे पाठविण्यास ‘पेटा’चा विरोध
12
विशेष लेख: ‘जेन झी’च्या डोक्यात ही खदखद कुणी भरली आहे? 
13
पतीचे भाकीत ठरले खरे ; डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्यावरून ठेवले नाव
14
जेन झीने महिलेच्या हाती सोपविली नेपाळची धुरा, एकमताने सुशीला कार्की नव्या पंतप्रधान
15
अग्रलेख: मान्सून तिबेटात, धस्स भारतात! मानवी उपद्व्यापच कारणीभूत
16
कुर्डूतील मुरुम उत्खनन बेकायदेशीरच आहे; पालकमंत्री जयकुमार गोरेंचा खुलासा
17
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज मणिपुरला भेट देणार; पाच राज्यांचा दौरा 
18
चॅटजीपीटीनं त्याला पाठवलं मृत्यूच्या दारात; घशातील त्रास, AI ने काय दिला सल्ला?
19
‘भारत मोठा झाल्याची भीती वाटते म्हणून टॅरिफ लावला’; सरसंघचालक मोहन भागवतांचे मोठे विधान
20
केवळ शब्दांनी नव्हे, तर आपल्या मुलांना महात्मा गांधीजींप्रमाणे वर्तनातून शिकवा -मोरारीबापू

“कुणी मूर्खासारखे काही बोलले तर त्याची नोंद का घ्यायची?”; शरद पवारांचा राज ठाकरेंवर पलटवार

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 14, 2024 17:48 IST

Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024: आमची भूमिका कायम व्यापकच होती. एखादी गोष्ट १० वेळा बोलली तर लोकांना वाटते की, काहीतरी असावे बाबा. त्यामुळे आरोप करत असावेत, असे शरद पवार यांनी म्हटले आहे.

Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024: विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे. प्रचारसभा, बैठका यांना वेग येत आहे. विधानसभा निवडणूक २० नोव्हेंबरला होणार आहे तर २३ नोव्हेंबरला महाराष्ट्र विधानसभेचा निवडणुकीचा निकाल लागणार आहे. महायुती आणि महाविकास आघाडीचे नेते आमचेच सरकार येणार असल्याचा दावा करताना पाहायला मिळत आहेत. यातच मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि शरद पवार यांच्या आरोप-प्रत्यारोप होताना पाहायला मिळत आहेत. राज ठाकरे यांनी केलेल्या टीकेवर शरद पवार यांनी खोचक शब्दांत पलटवार केला आहे. 

राज ठाकरे हे सातत्याने शरद पवारांनी जातीयवाद पसरवला, पक्ष फोडले असा आरोप करत आहेत.  शरद पवारांच्या जातीयवादाचे अनेक उदाहरणे आहेत. त्यापैकी एक सांगतो. पुण्यात एका कार्यक्रमात शरद पवारांना लोकमान्य टिळकांची पुणेरी पगडी घालण्यात आली. मात्र, त्यांनी ती काढली आणि ज्योतिबा फुले यांची पगडी घातली. खरे तर ती पगडी घालण्याला माझा विरोध नाही. पुणेरी पगडी न वापरता फुलेंची पगडी घालत जा,असे म्हणणे याला माझा विरोध आहे. हा एकप्रकारे जातीयवाद आहे, असे राज ठाकरे म्हणाले होते. याला आता शरद पवार यांनी उत्तर दिले आहे. 

कुणी मूर्खासारखे काही बोलले तर त्याची नोंद का घ्यायची?

कुणीतरी मूर्खासारखं काहीही बोलत असेल तर त्याची नोंद कशासाठी घ्यायची? माझ्या नेतृत्वात जो पक्ष चालत होता, कधी काळी शासनही चालत होते. त्यावेळचे निर्णय बघा. आम्ही कुणाला प्रोत्साहन दिले. आमच्या पक्षामध्ये विधिमंडळात नेतृत्व करायची निवड करायची आली होती तेव्हा आम्ही कुणाला निवडले ते बघा. मधुकर पिचड यांना नेता बनवले. छगन भुजबळ यांना नेता बनवले. २५ लोकांची यादी देऊ शकतो की, जे विविध जाती-जमातीचे होते. आदिवासी, दलित, ओबीसी सगळ्यांची नेमणूक आम्ही केली होती. आमची भूमिका कायम व्यापकच होती. राज ठाकरे नावाचे गृहस्थ जे काही बोलत आहेत त्याला आधार काय आहे मला माहिती नाही. काहीही ठोकून द्यायचे. दहावेळा एखादी गोष्ट बोलली तर लोकांना वाटते की काहीतरी असावे बाबा. त्यामुळेच आरोप करत असावेत, असा पलटवार शरद पवार यांनी केला. 

दरम्यान, पुणेरी पगडीबाबत जे काही राज ठाकरे बोलले तो कार्यक्रम महात्मा फुलेंचा कार्यक्रम होता. त्या कार्यक्रमात महात्मा फुलेंची पगडी मला घालण्यात आली. तर मी जातीयवादी कसा? महात्मा फुलेंनी कधीही जातीयवाद केला नाही. महात्मा फुले, त्यांचा विचार आम्ही अंगीकारतो. लगेच आम्हाला जातीयवादी कसे काय म्हणायचे? याला काही फारसा अर्थ नाही, असे प्रत्युत्तर शरद पवार यांनी दिले. ते सामला दिलेल्या मुलाखतीत बोलत होते. 

टॅग्स :maharashtra assembly election 2024महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४Sharad Pawarशरद पवारRaj Thackerayराज ठाकरेNCPराष्ट्रवादी काँग्रेसMaharashtra Navnirman Senaमहाराष्ट्र नवनिर्माण सेनाMNSमनसेPoliticsराजकारण