शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

“आम्ही छोटे पक्ष किंगमेकर ठरु, पाठिंबा हवा असेल तर...”; महादेव जानकरांनी ठेवल्या अटी

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 22, 2024 20:44 IST

Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024 Result: महायुती किंवा महाविकास आघाडीला पाठिंबा हवा असेल, तर काय अपेक्षा आहेत, याची यादीच महादेव जानकर यांनी वाचून दाखवली.

Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024 Result: महाराष्ट्र विधानसभा निवडणूक अनेक कारणांमुळे चांगलीच गाजल्याचे पाहायला मिळाले. मतदानाची प्रक्रिया पार पडली असून, आता संपूर्ण राजकीय वर्तुळाचे लक्ष २३ नोव्हेंबर रोजी लागणाऱ्या निकालांकडे लागले आहे. मतमोजणीसाठी अवघे काही तास राहिले असताना राजकीय वर्तुळात घडामोडींना वेग आला आहे. महाविकास आघाडी आणि महायुतीतील नेते अनेक दावे-प्रतिदावे केले जात आहेत. राष्ट्रीय समाज पक्षाचे नेते महादेव जानकर यांनी महायुती आणि महाविकास आघाडी समोर पाठिंबा हवा असल्यास काही मोठ्या अटी ठेवल्या आहेत. 

महाराष्ट्रातील तमाम मतदार बंधू-भगिनींचे आभार मानतो. लोकशाहीचा उत्सवामध्ये मतदारांचा टक्का वाढल्यामुळे अभिनंदन करतो. जो टक्का वाढलेला आहे तो परिवर्तनाची शक्यता असू शकते. मागच्या विधानसभेत माझा एक आमदार होता आणि वरच्या सभागृहात एक असे दोन आमदार होते. पण आता आमचे दोनाचे चार, चाराचे सहा वाढतील. जनतेचा कौल शेवटी, त्यांच्या हातात आहे. राष्ट्रीय समाज पक्षाला चांगले यश मिळेल, असा विश्वास आहे, असे महादेव जानकर यांनी म्हटले आहे. 

आम्ही छोटे पक्ष किंगमेकर ठरु

मेजॉरिटी महाविकास आघाडी किंवा महायुतीला असेल तर आमचा कोणाला विरोध असेल असे नाही. सध्या महाविकास आघाडी बरोबर जायला तयार आहोत, महायुती बरोबर पण जायला तयार आहोत. सध्यातरी ५०-५० टक्के दोघांची शक्यता आहे. आम्ही महायुती बरोबर पण नाही आणि महायुती बरोबर पण नाही. आम्ही छोटे पक्ष असल्यामुळे किंगमेकरची भूमिका बजावणार आहोत, असे जानकर यांनी म्हटले आहे. महाविकास आघाडी किंवा महायुतीकडून आम्हाला कोणाचे निमंत्रण किंवा फोन आलेला नाही. आम्हाला मंत्रिमंडळात भागीदारी पाहिजे, आमची इच्छा आहे. जर आमचे १२ आमदार आले तर १२ चे १२ कॅबिनेट मिनिस्टर झाले पाहिजे. जर दोघांना वाटले तर मुख्यमंत्री आमचा पक्षाचा झाला पाहिजे. त्यांनी हे मान्य केले तर आम्ही त्यांना वेलकम करू. तुम्ही आम्हाला सपोर्ट करावा, अशा अटी जानकर यांनी ठेवल्या.

दरम्यान, ज्याचा पक्षाच्या आमदारांवर ज्यांना विश्वास नसेल त्या पक्षांनी हॉटेल बुक केले आहे. पण माझ्या पक्षाचे जे आमदार निवडून येतील, त्यांच्यावर मला विश्वास आहे. माझ्या पक्षाचे आमदार बाहेर जाणार नाहीत. जर वेळ आली तर ताज हॉटेल बुक करायला आम्ही पण सक्षम आहोत, असे जानकर यांनी स्पष्ट केले. ते टीव्ही९शी बोलत होते. 

टॅग्स :maharashtra assembly election 2024महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४Mahadev Jankarमहादेव जानकरPoliticsराजकारण