शहरं
Join us  
Trending Stories
1
विद्यार्थ्यांना शारीरिक अन् मानसिक शिक्षा देण्यावर बंदी; शिक्षण विभागाने जारी केली नवी नियमावली
2
"वेदनेतून घेतलेला निर्णय, तुमच्या विश्वासाला..."; तेजस्वी घोसाळकरांचं शिवसैनिकांना भावनिक पत्र
3
आज एक चमकणारी एसयुव्ही लाँच होणार; इंटरनेट कनेक्टेड, मोठी टचस्क्रीन सह बरेच काही मिळणार...
4
Crime: आधी पाच मुलांना गळफास लावला, नंतर बापानेही संपवले आयुष्य; दोन मुले वाचली
5
Viral Video: लग्नाआधी तरुणी एक्स बॉयफ्रेंडला जाऊन भेटली, व्हिडीओ सोशल मीडिया तुफान व्हायरल; पण गोष्ट खरी आहे का?
6
'धुरंधर'मधील व्हायरल गाण्यावर शाहरुखनेही केला डान्स? Video व्हायरल; किंग खानचे 'जबरा फॅन' म्हणाले...
7
BMC निवडणुकीच्या तोंडावर मुंबईत उद्धव ठाकरेंना धक्का; बड्या महिला नेत्याचा भाजपात प्रवेश होणार
8
'शक्तिपीठ'च्या मार्गात बदल; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अनेक घोषणा म्हणाले, अब आगे बढ़ चुका हूँ मैं... 
9
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य,१५ डिसेंबर २०२५: नशिबाची मिळणार साथ, आज सर्वत्र लाभच लाभ 
10
२ गोळ्या झेलूनही दहशतवाद्याकडून हिसकावली बंदूक; अखेर कोण आहे सिडनीतील हा 'Brave Man'?
11
फुटबॉलचा किंग अन् क्रिकेटचा देव एकाच व्यासपीठावर! वानखेडेवर '१०'ची जादू
12
विरार-अलिबाग कॉरिडॉर सहा जोडण्यांद्वारे महानगरांना कनेक्ट करणार; ७५ हेक्टरवरील ५०४३ खारफुटी बाधित होणार
13
बापरे! प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्याला सोसायटीतील व्यक्तीकडून मारहाण, डोक्याला गंभीर दुखापत
14
दोन वर्षीय मुलीवर बलात्कार करणाऱ्या महाराष्ट्रातील आरोपीला फाशीच, राष्ट्रपतींनी फेटाळली याचिका
15
लोकलच्या फुटबोर्डावर उभे राहणे निष्काळजीपणा नव्हे, तर..; कोर्टानेच कान टोचले... आतातरी शहाणे व्हा!
16
ऑस्ट्रेलियात दहशतवादी हल्ला, १२ पर्यटक ठार, २९ जखमी; सिडनीतील बाँडी बीचवर बेछूट गोळीबार 
17
कोट्यवधी रुपयांची अफरातफर; भ्रष्टाचार केला म्हणून चीनच्या बँकरला मृत्युदंड
18
नितीन नबीन भाजपचे नवे राष्ट्रीय कार्यकारी अध्यक्ष; सरकार आणि संघटनात्मक अनुभवाची दखल
19
बाइक टॅक्सीचालकाचा तरुणीवर अतिप्रसंग; धैर्याने प्रतिकार करीत गाठले पोलिस ठाणे
20
संपादकीय : महायुतीचा नवा बूस्टर..! नागपूर अधिवेशनात चर्चा, मुनगंटीवारांची सभागृहात तुफान टोलेबाजी
Daily Top 2Weekly Top 5

भाजपाचा अमित ठाकरेंना पाठिंबा, महायुतीचे समर्थन का नाही? फडणवीसांनी काय घडले, ते सांगितले

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 15, 2024 14:08 IST

Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024: भाजपाने अमित ठाकरेंना दिलेला पाठिंबा आणि महायुतीचे उमेदवार म्हणून सदा सरवणकर यांना मिळत असलेले समर्थन यामुळे माहीम लढतीकडे राज्याचे लक्ष लागले आहे.

Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024: विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे. प्रचारसभा, बैठका यांना वेग येत आहे. विधानसभा निवडणूक २० नोव्हेंबरला होणार आहे तर २३ नोव्हेंबरला महाराष्ट्र विधानसभेचा निवडणुकीचा निकाल लागणार आहे. मनसे पूर्ण ताकदीने निवडणुका लढत आहे. राज ठाकरे राज्यभरात दौरे करून प्रचारसभा घेत आहेत. माहीम मतदारसंघातील लढतीकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे.

माहीम मतदारसंघात मनसेकडून अमित ठाकरे यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. तर शिवसेना शिंदे गटाकडून सदा सरवणकर आणि ठाकरे गटाकडून महेश सावंत मैदानात आहेत. यातच महायुतीचे उमेदवार सदा सरवणकर यांनी माघार न घेतल्यामुळे मनसेचे टेन्शन वाढल्याची चर्चा आहे. एकीकडे भाजपाने अमित ठाकरेंना पाठिंबा दिला असला, तरी दुसरीकडे महायुतीचे उमेदवार म्हणून सदा सरवणकर यांना प्रोत्साहन मिळत असल्याचे बोलले जात आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना याबाबत प्रश्न विचारण्यात आला. यावर देवेंद्र फडणवीस यांनी त्यावेळी नेमके काय घडले ते सांगितले.

महायुतीने अमित ठाकरे यांना पाठिंबा का दिला नाही?

सदा सरवणकरांनी उमेदवारी मागे घ्यावी, यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रयत्न केले. मात्र सदा सरवणकरांची समजूत काढण्यास दोघांनाही अपयश आले. यानंतर महायुतीने अमित ठाकरे यांना पाठिंबा का दिला नाही? असा प्रश्न देवेंद्र फडणवीस यांना विचारण्यात आला. यावर, भाजपा आणि अगदी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना माहीम येथे अमित ठाकरे यांना पाठिंबा द्यायचा होता, परंतु तेव्हा शिवसेनेच्या नेत्यांनी सांगितले की,  त्यांचा उमेदवार उभा न केल्यास ठाकरे गटाला याचा फायदा होईल. त्यामुळे आम्हाला काहीही करता आले नाही, असे देवेंद्र फडणवीसांनी स्पष्ट केले. एका मुलाखतीत ते बोलत होते.

दरम्यान, माहीम मतदारसंघात सदा सरवणकर यांनी माघार घ्यावी, यासाठी शेवटपर्यंत प्रयत्न करण्यात आले. अगदी शेवटच्या घटकेला सदा सरवणकर यांनी शिवतीर्थावर जाऊन राज ठाकरे यांची भेट घेण्याचा प्रयत्न केला. परंतु, राज ठाकरे यांनी भेट नाकारली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही यात हस्तक्षेप करत सदा सरवणकर यांना माघार घेण्याबाबत सल्ला दिला होता. परंतु, निवडणूक अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या क्षणापर्यंत नाराजीनाट्य, मानापमान आणि अनेक घडामोडी घडत राहिल्या. शेवटी सदा सरवणकर यांची उमेदवारी कायम राहिली. या मतदारसंघातील तीनही उमेदवार जोरदार प्रचार करताना पाहायला मिळत आहेत.

 

टॅग्स :maharashtra assembly election 2024महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४Devendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसBJPभाजपाAmit Thackerayअमित ठाकरेMNSमनसेmahim-acमाहीमMahayutiमहायुती