शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
2
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
3
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
4
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
5
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
6
धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
7
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
8
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
9
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
10
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
11
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
12
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
13
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
14
VIDEO: सूर्याचा 'रहमान डकैत' स्टाईल FA9LA डान्स; Dhurandhar ची क्रेझ क्रिकेटच्या मैदानातही
15
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
16
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
17
IPL 2026: मराठमोळ्या आयुष म्हात्रेबद्दल अंपायरने केली मोठ्ठी चूक! सारेच हैराण; काय घडलं?
18
Video - निसर्गाच्या देणगीला भेसळीचा विळखा; तुम्ही पिताय ते नारळपाणी खरंच 'नॅचरल' आहे का?
19
हजारो भारतीयांसह ३० हजार जणांना कामावरून काढणाऱ्या कंपनीच्या ऑफिसवर इराणने केला हल्ला 
20
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
Daily Top 2Weekly Top 5

“बंडखोरी केलेले लोक आमचेच, समजूत काढण्यात यश येईल”; देवेंद्र फडणवीसांना विश्वास

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 1, 2024 14:18 IST

Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024: भाजपा संघटना, कार्यकर्त्यांच्या आधारावर चालणारा पक्ष आहे. तेच आम्हाला विजयाकडे घेऊन जातील, असे देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे.

Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024: विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे. महायुती आणि महाविकास आघाडीतील नेत्यांकडून त्या त्या पक्षातील बंडखोरांची समजूत काढण्याचे प्रयत्न सुरू आहे. ही मनधरणी यशस्वी होणार का, याचे उत्तर अर्ज मागे घेण्याच्या अंतिम मुदतीनंतर मिळणार आहे. यातच राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बंडखोरांची समजूत काढण्यात यश मिळेल, असा विश्वास व्यक्त केला आहे. 

विधानसभा निवडणुकीसाठी महायुती आणि महाविकास आघाडी दोन्हीकडे बंडोबांनी डोके वर काढल्याने दोन्ही बाजूंकडील दिग्गज नेते मंडळी ऐन दिवाळीत त्यांना थंड करण्याच्या मोहिमेवर आहेत. अर्ज माघार घेण्याची शेवटची तारीख ४ नोव्हेंबर आहे. त्यामुळे सुरू असलेले हे घमासान आता पुढील चार दिवस कायम राहणार असून, नाट्यमय घडामोडी पाहायला मिळतील, अशी चर्चा राजकीय वर्तुळात आहे. 

बंडखोरी केलेले लोक आमचेच, समजूत काढण्यात यश येईल

आम्ही कामाला लागलो असून, महायुतीमध्ये बंडखोरी राहणार नाही, असा विश्वास उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बोलून दाखविला. तसेच महायुतीत एकमेकांविरोधात काही ठिकाणी क्रॉस उमेदवारी अर्ज दाखल झाले आहेत. त्यासंदर्भात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि माझी संयुक्त बैठक झाली. एकमेकांविरोधातील अर्ज हे मागे घेण्यात येणार आहेत. काही ठिकाणी बंडखोरी आहे. महायुतीमध्ये बंडखोरी राहणार नाही, असा दावा देवेंद्र फडणवीस यांनी केला. तसेच बंडखोरी केलेले लोक आमचेचे आहेत. त्यांची समजूत काढण्यात आम्हाला नक्की यश येईल. रोष मोठा असतो पण पक्षाचे व्यापक हित ठेऊन अनेकांनी माघार घेण्याची मानसिकता झाली आहे. भाजपा हा पक्ष संघटनेच्या आधारावर, कार्यकर्त्यांच्या आधारावर चालणारा पक्ष आहे. संघटना आणि कार्यकर्ता महत्वाचा घटक आहे. तेच आम्हाला विजयाकडे घेऊन जातील, असे देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.

दरम्यान, बोरिवली मतदारसंघातून बंडखोरी केलेले गोपाळ शेट्टी यांची विनोद तावडे यांनी घरी जाऊन भेट घेतल्याचे समजते. तसेच शेट्टी हे अतिशय प्रामाणिक कार्यकर्ते आहेत. त्यांची समजूत काढू. माहीममधील शिंदेसेनेचे उमेदवार सदा सरवणकर यांच्या उमेदवारीबाबत मुख्यमंत्री शिंदे, मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि मी अशी एकत्र बोलणी सुरू असून, नक्की मार्ग काढू, असेही फडणवीस यांनी म्हटले आहे.  

टॅग्स :maharashtra assembly election 2024महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४Devendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसBJPभाजपाMahayutiमहायुती