Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024 Exit Polls: यंदा महाराष्ट्र विधानसभा निवडणूक अनेक कारणांमुळे चांगलीच गाजल्याचे पाहायला मिळाले. मतदानाची प्रक्रिया पार पडली असून, आता संपूर्ण राजकीय वर्तुळाचे लक्ष २३ नोव्हेंबर रोजी लागणाऱ्या निकालांकडे लागले आहे. तत्पूर्वी मतदारांनी उत्स्फूर्तपणे मतदानाचा हक्क बजावला. सायंकाळी ५ वाजेपर्यंत महाराष्ट्रात सरासरी ५८.२२ टक्के मतदान झाले होते. यानंतर आता अनेक एक्झिट पोल यायला सुरुवात झाली आहे. या एक्झिट पोल्सवर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया देताना सूचक विधान केले आहे.
सर्व प्रमुख एक्झिट पोल एका क्लिकवर
विधानसभा निवडणूकीचे मतदान आटोपल्यानंतर सायंकाळच्या सुमारास उपमुख्यमंत्री व दक्षिण-पश्चिम नागपूरचे भाजपा उमेदवार देवेंद्र फडणवीस यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या मुख्यालयाला भेट दिली. यावेळी त्यांनी केवळ मतदानासाठी नागपुरात आलेले सरसंघचालक डॉ.मोहन भागवत व माजी सरकार्यवाह भैय्याजी जोशी यांच्याशी सुमारे २० मिनिटे चर्चा केली. निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर ही भेट झाल्याने विविध कयास लावण्यात येत आहेत. या भेटीत नेमकी काय चर्चा झाली याची कुठलीही अधिकृत माहिती संघाकडून देण्यात आलेली नाही. दिवसभर फडणवीस नागपुरातील विविध मतदान केंद्रांजवळील भाजपाच्या बुथवर पोहोचले होते. त्यांनी कार्यकर्त्यांशी संवाद साधला. अचानक सायंकाळी ही भेट झाल्याने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे. याचदरम्यान आलेल्या एक्झिट पोलवर देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट शब्दांत भाष्य केले.
राज ठाकरे किंगमेकर ठरणार का? मनसेला किती जागा मिळणार? Exit Poll ची धक्कादायक आकडेवारी
Exit Pollवर देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया
देवेंद्र फडणवीस म्हणाले की, मतदानाचा टक्का वाढतो तेव्हा त्याचा फायदा भारतीय जनता पक्षाला होतो. या विधानसभा निवडणुकीतही आतापर्यंत समोर आलेल्या आकडेवारीनुसार मतदानाची आकडेवारी चांगल्या प्रकारे वाढली आहे. त्यामुळे मला असे वाटते की, भारतीय जनता पक्ष आणि महायुतीला त्याचा नक्कीच फायदा होईल, असे देवेंद्र फडणवीस यांनी नमूद केले.
Exit Poll: पुन्हा जरांगे फॅक्टर चालणार! महायुतीला फटका बसणार? मराठवाड्यात मविआच सरस ठरणार?
दरम्यान, मतदान संपताच एकामागोमाग एक असे जवळपास १० एक्झिट पोलचे अंदाज आले. यात बहुतांश एक्झिट पोलमध्ये भाजपाच्या नेतृत्वातील महायुतीचे सरकार येत असल्याचा अंदाज व्यक्त केला आहे. तर तीन एक्झिट पोलनी मविआला सत्तेत बसताना दाखविले आहे. एकच एक्झिट पोल असा आहे की, ज्याने दोघांपैकी कोणालाच बहुमत दिलेले नाही.