शहरं
Join us  
Trending Stories
1
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
2
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
3
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
4
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
5
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
6
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
7
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
8
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
9
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
10
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
11
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
12
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
13
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
14
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
15
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
16
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
17
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
18
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
19
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
20
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
Daily Top 2Weekly Top 5

विरोध डावलून नवाब मलिकांना उमेदवारी दिली, आता प्रचारही करणार का? अजित पवारांचे सूचक विधान

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 7, 2024 13:33 IST

Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024: आरोप सिद्ध झाल्याशिवाय दोषी कसे ठरवता? अशी विचारणा अजित पवार यांनी केली.

Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024: जागावाटप आणि उमेदवारीवरून महायुती तसेच महाविकास आघाडीत सारेकाही आलबेल नसल्याचे चित्र पाहायला मिळाले. महाविकास आघाडीपेक्षा महायुतीत कुरबुरी कमी असल्याचे दाखवले गेले असले, तरी खटके उडत असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात होती. महायुती आणि महाविकास आघाडीकडून बंडखोरीही मोठ्या प्रमाणात झाली. यातच नवाब मलिक यांचा प्रचार करण्यावरून अजित पवार यांनी सूचक विधान केले आहे. 

महायुती सरकारमध्ये अजित पवार यांचा राष्ट्रवादी काँग्रेस गट सहभागी झाल्यापासून नवाब मलिकांवरून महायुतीत खटके उडत असल्याचे पाहायला मिळाले. सुरुवातीला अगदी नवाब मलिक विधानसभेत अजित पवार गटाच्या बाकांवर येऊन बसल्यापासून ते नवाब मलिकांना उमेदवारी जाहीर करेपर्यंत भाजपाने वेळोवेळी नाराजी व्यक्त केली. तर विरोधी महाविकास आघाडीने हाच धागा पकडत भाजपावर हल्लाबोल केला. तसेच अजित पवार गट आणि भाजपाची कोंडी करण्याचा प्रयत्नही केला. भाजपाचा विरोध आणि राजकीय वर्तुळातील दबाव झुगारत अजित पवार गटाने नवाब मलिक यांना उमेदवारी जाहीर केली. यावर आम्ही मलिकांचा प्रचार करणार नाही, असे भाजपाने स्पष्टपणे सांगून टाकले. यावर आता अजित पवारांनी भाष्य केले आहे. 

विरोध डावलून नवाब मलिकांना उमेदवारी दिली, आता प्रचारही करणार का? 

नवाब मलिकांना दिलेली उमेदवारी आणि होणारा प्रचार, याबाबत अजित पवार यांना पत्रकारांनी प्रश्न विचारला. यावर अजित पवार यांनी आपल्या नेहमीच्या शैलीत रोखठोकपणे उत्तर दिले.  आम्ही त्यांना उमेदवारी दिली आहे. त्यांना आम्ही घड्याळ हे चिन्हही दिलेले आहे. आम्ही त्यांच्या रॅलीमध्ये जाणारच ना. नवाब मलिक यांच्यावर आतापर्यंत फक्त आरोप झाले आहेत. तसेच आरोप सिद्ध झाल्याशिवाय त्यांना दोषी कसे ठरवता? अशी विचारणा अजित पवार यांनी केली. 

दरम्यान, नवाब मलिक यांची कन्या सना मलिक या अणुशक्तीनगर या मतदारसंघातून यावेळची विधानसभा निवडणूक लढवत आहेत. तर नवाब मलिक हे शिवाजीनगर मानखुर्द या जागेवरून अजित पवार यांच्या पक्षाकडून निवडणूक लढवत आहेत.  

टॅग्स :maharashtra assembly election 2024महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४Ajit Pawarअजित पवारnawab malikनवाब मलिकNCPराष्ट्रवादी काँग्रेस