शहरं
Join us  
Trending Stories
1
आधी बिर्याणी, मग कलिंगड खाल्लं... मुंबईतील एकाच कुटुंबात चौघांचा मृत्यू, घटनेमुळे खळबळ
2
मराठी सक्ती निर्णयाची अंमलबजावणी ६ महिने ते १ वर्ष पुढे ढकलावी; संजय निरुपमांची नवी मागणी
3
Top Marathi News Live: मराठी सक्तीची डेडलाईन एक वर्षाने पुढे ढकलली जावी- संजय निरुपम
4
"आज सासऱ्यांना मिस करतेय, रिंकूची खेळी त्यांच्यासाठी होती"; KKR जिंकल्यावर प्रिया सरोज भावूक
5
बर्थडे पार्टीत रक्ताचा सडा! चेहऱ्याला केक लावल्याच्या रागातून भाजप नेत्याच्या भावांसह तिघांची हत्या
6
तब्बल २५ एकरचा कॅम्पस, २८९ कोटी खर्च, मोदींनी केलं होतं उद्घाटन, पण या संस्थेत अवघे १५ विद्यार्थी 
7
Home Loan घेण्यासाठी किमान किती असावा लागेल Credit Score; अर्ज करण्यापूर्वी लक्षात ठेवा 'या' गोष्टी
8
आपच्या त्या सात फुटीर खासदारांबाबत राज्यसभा सभापतींनी घेतला मोठा निर्णय, विलिनिकरणाबाबत दिले असे आदेश    
9
Samudrik Shastra: सामुद्रिक शास्त्रानुसार हसण्याच्या पद्धतीवरून ओळखता येतात माणसाचे गुण-दोष!
10
रितेश देशमुखच्या 'राजा शिवाजी' चित्रपटाचे ॲडव्हान्स बुकिंग आजपासून सुरू, प्रेक्षकांचा भरघोस प्रतिसाद
11
Video - हृदयद्रावक! जन्मदात्या आईचा क्रूरपणा; १८ महिन्यांच्या लेकीला फेकलं नाल्यात अन्...
12
सरकारी बँक कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! लवकरच पगारवाढ होणार, अर्थ मंत्रालयानं जारी केले निर्देश
13
"मराठी भाषा बोलता आलीच पाहिजे, मी मुस्लिमांना सांगतो की..."; इम्तियाज जलील यांचे रोखठोक मत
14
‘डिजिटल अरेस्ट’चा धक्कादायक प्रकार उघडकीस; घाटकोपरचे कुटुंब १८ दिवस घराबाहेर पडलेच नाही
15
पाकिस्तानात लष्कर-ए-तोयबाच्या युसूफ आफ्रिदीची हत्या; गेल्या काही महिन्यात ३० हून अधिक जण लक्ष्य
16
Rahul Meena : "मी मोठा गुन्हा केलाय, आता मरणार..."; IRS च्या मुलीची हत्या केल्यावर राहुलने कोणाला केला फोन?
17
IPL 2026: 'ग्रीन कॉरिडॉर'मुळे लुंगी एन्गिडी ११ मिनिटांत पोहोचला रुग्णालयात; होतंय कौतुक
18
सोन्या-चांदीच्या दरात घसरण, १,५३,००० रुपयांच्या खाली Gold, खरेदीपूर्वी पाहा तुमच्या शहरातील लेटेस्ट रेट
19
Palmistry: तुमच्या मनगटावर किती रेषा आहेत? जाणून घ्या तुमच्या आरोग्याचं आणि श्रीमंतीचं गुपित!
Daily Top 2Weekly Top 5

'काँग्रेसने फसवणुकीच्या बाबतीत स्वतःचाच विक्रम मोडला', पंतप्रधान मोदींचा हल्लाबोल

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 9, 2024 16:44 IST

maharashtra assembly elections 2024 pm modi attack on rahul gandhi says congress broke all records in fraud

महाराष्ट्राने काँग्रेसचा प्रकोप आणि त्यांची पापे दीर्घकाळ सहन केली आहेत. विशेषतः मराठवाड्याने. आपल्या समस्यांचे मूळ काँग्रेस आहे. काँग्रेसने येथील शेतकऱ्यांच्या सुख-दुःखाची परवा केली नाही. मराठवाड्यात 11 सिंचन योजनांना मंजुरी देण्यात आली आहे. या भागातील सिंचनाचा प्रश्न सोडवण्यासाठी योजना सुरूही करण्यात आल्या होत्या. मात्र महाविकास आघाडी सरकारने त्या थांबवल्या. यानंतर महायुतीच्या सरकारने या योजनांना गती दिली आहे.

मोदी म्हणाले, शेतकऱ्यांचे हीत हे आमच्यासाठी सर्वात महत्वाचे आहे. महाराष्ट्रातील १.२५ कोटींहून अधिक शेतकऱ्यांना पंतप्रधान सन्मान निधीचा लाभ मिळाला आहे. मराठवाड्यात गेल्या अडीच वर्षांत हजारो कोटी रुपयांची गुंतवणूक झाली आहे. समृद्धी महामार्गाने या परिसराच्या प्रगतीला नवा मार्ग मिळाला आहे. नांदेडहून दिल्ली आणि आदमपूरला विमानसेवा सुरू झाली आहे. लवकरच आपल्या शीख बांधवांना येथून अमृतसरला विमानाने प्रवास करण्याची संधी मिळणार आहे.

पंतप्रधान पुढे म्हणाले, स्वयंपाक घरात पहिल्यांदा गॅस सिलिंडरवर भोजन बनत आहे. घरातील महिला सदस्यांना फायदा होत आहे. तीन कोटी महिलांना लखपती दिदी बनवण्याचे आमचे स्वप्न आहे. 

मोदी पुढे म्हणाले, यांनी (काँग्रेस) तर हदच केली. काँग्रेसने फसवणुकीच्या बाबतीत आपलाच रेकॉर्ड मोडला आहे. काँग्रेसचे लोक संविधानाच्या नावाने आपलेच लाल पुस्तक वाटत आहेत. काँग्रेसच्या लाक पुस्तकावर भारताचे संविधान असे लिहिले आहे. मात्र, उघडून बघितल्यावर समोर आले की, ते तर कोरेच आहे. त्यात बाबासाहेबांच्या संविधानाचा एक शब्दही लिहिलेला नाही. हे पाहून संपूर्ण देश चकित आहे. आज संपूर्ण महाराष्ट्रात भाजप आणि महायुतीच्या समर्थनार्थ एक लाट सुरू आहे. आज प्रत्येकाच्या तोंडी अकच घोषणा आहे, भाजपा - महायुती आहे... महाराष्ट्रची प्रगति आहे. 

आज देश विकसित भारताचे लक्ष्य डोळ्यासमोर ठेवून पुढे जात आहे. यासाठी भारप आणि त्यांचे मित्र पक्षच काम करत आहेत, हे जनता ओळखून आहे. यामुळेच ते भाजप आणि एनडीए सरकारांना निवडून देत आहे. देशातील जनतेने तिसऱ्यांदा एनडीएला संधी दिली आहे. मात्र त्यात नांदेडचे फून नव्हते, असेही मोदी म्हणाले.

टॅग्स :maharashtra assembly election 2024महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४Narendra Modiनरेंद्र मोदीMahayutiमहायुती