शहरं
Join us  
Trending Stories
1
उमेदवारी अर्ज दाखल करताच त्याच क्षणी २१ वर्ष जुन्या प्रकरणात RJD उमेदवाराला झाली अटक, कारण...
2
Asrani Death: 'अंग्रेजों के जमाने का जेलर' काळाच्या पडद्याआड; ज्येष्ठ अभिनेते असरानी यांचे निधन
3
अभिनेते असरानींची शेवटची पोस्ट, ७ दिवसांपूर्वी या अभिनेत्यासाठी इंस्टाग्रामवर लिहिले होते - "मिस यू..."
4
"आमदाराला कापा बोललो तर राग येतो, रोज शेतकरी मरतोय त्याचा राग का येत नाही?"; बच्चू कडू आक्रमक
5
चीनवर लावलेले १०० टक्के टॅरिफ अमेरिका कमी करणार?; ट्रम्प यांनी शी जिनपिंग यांच्यासमोर ठेवली अट
6
असरानी यांंचं महाराष्ट्राशी होतं विशेष नातं, वेळ मिळेल तेव्हा पुण्यात जाऊन करायचे 'ही' खास गोष्ट
7
'शोले'तील जेलरची भूमिका साकारण्यासाठी असरानींना हिटलरकडून कशी मिळालेली प्रेरणा? वाचा हा किस्सा
8
जवळच्या लोकांच्या उपस्थितीत असरानी यांच्यावर अंत्यसंस्कार, कुटुंबाने पूर्ण केली अभिनेत्याची 'ही' इच्छा
9
भारताचा 'छोटा पॅकेट' पुन्हा करणार 'बडा धमाका'! वैभव सूर्यवंशी आता 'या' स्पर्धेत खेळणार...
10
पुतिन-ट्रम्प यांच्या मोठी बैठक होणार; युक्रेनचे झेलेन्स्की म्हणतात- "मीही यायला तयार पण..."
11
ODI Cricket Record: चामारी अटापट्टूचा मोठा विक्रम; देशासाठी 'अशी' कामगिरी करणारी पहिलीच!
12
बिहारमध्ये महाआघाडीला आणखी एक धक्का, मित्रपक्षाची निवडणुकीतून माघार, आरजेडी- काँग्रेसवर केले गंभीर आरोप 
13
उपोषणकर्त्याला घरी का बोलवलं? संजय शिरसाट म्हणाले, "माझा आणि त्याचा प्रवासाचा वेळ सारखा होता"
14
"विरोधकांच्या ‘लवंग्या-सुरसुरी’चा धुरळा, महायुतीचा ‘ॲटम बॉम्ब’ फुटला की..."; एकनाथ शिंदेंचा इशारा
15
LPG घेऊन जाणाऱ्या जहाजावर भीषण स्फोट; 23 भारतीयांना वाचवले, 2 बेपत्ता
16
Kawasaki: कावासाकीनं लॉन्च केली खतरनाक बाइक; किंमत महिंद्रा थारपेक्षाही जास्त!
17
21 वर्षे जुन्या दरोडा प्रकरणात RJD उमेदवाराला अटक; अर्ज दाखल करताच पोलिसांनी घेतले ताब्यात
18
कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धारामय्या यांच्या कार्यक्रमात १० जण पडले आजारी, समोर आलं असं कारण
19
पुतण्याच्या प्रेमात आंधळी झाली दोन मुलांची आई; पोलीस ठाण्यातच कापली हाताची नस!
20
दिवाळीनिमित्त राहुल गांधी पोहोचले मिठाईच्या दुकानात, स्वत: बनवली इमरती आणि बेसनाचे लाडू

महाराष्ट्राचा मुख्यमंत्री ठरला! भाजपा विधिमंडळ नेतेपदी देवेंद्र फडणवीस यांची एकमताने निवड

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 4, 2024 12:06 IST

विधानभवनाच्या सेंट्रल हॉलमध्ये भाजपाच्या नवनिर्वाचित आमदारांची बैठक पार पडली, त्यात पक्षाच्या विधिमंडळ नेतेपदाची निवड करण्यात आली.

मुंबई - भाजपाच्या विधिमंडळ पक्षनेतेपदी देवेंद्र फडणवीस यांची निवड करण्यात आली आहे. पक्ष निरीक्षक म्हणून राज्यात आलेले गुजरातचे माजी मुख्यमंत्री विजय रुपाणी आणि केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्या उपस्थितीत भाजपा विधिमंडळ आमदारांची बैठक पार पडली. या बैठकीत देवेंद्र फडणवीस यांच्या नावावर शिक्कामोर्तब झालं असून महाराष्ट्राचे पुढील मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसच असतील हे अखेर ठरलं आहे. भाजपा विधिमंडळाच्या बैठकीनंतर महायुतीचे नेते आज दुपारी राज्यपालांकडे जाऊन सत्तास्थापनेचा दावा करणार आहेत. 

सकाळी ११ वाजता विधान भवनाच्या सेंट्रल हॉलमध्ये भाजपा विधिमंडळ आमदारांची बैठक होती. या बैठकीत भाजपाचे १३२ आमदार त्याशिवाय भाजपाला पाठिंबा दिलेले ५ इतर आमदारही उपस्थित होते. बैठकीपूर्वी भाजपा नेते, आमदारांमध्ये मोठा उत्साह पाहायला मिळाला. या बैठकीसाठी विधानभवन फुलांनी सजवलं होते. त्याशिवाय भाजपा आमदारांनी भगवे फेटे घातले होते. या बैठकीला सुरुवात होण्याआधी नेत्यांनी पक्षाचे निरीक्षक निर्मला सीतारामन आणि विजय रुपाणी यांचे स्वागत केले. बैठकीआधी भाजपा कोअर कमिटीची बैठक पार पडली. यात प्रस्ताव कोण मांडणार, सूचक, अनुमोदक कोण असणार हे ठरवण्यात आलं. तोपर्यंत भाजपा आमदार सेंट्रल हॉलमध्ये जमले होते. कोअर कमिटीच्या बैठकीनंतर सगळे नेते सेंट्रल हॉलमध्ये पोहचले.

या बैठकीत भाजपाचे ज्येष्ठ नेते चंद्रकांत पाटील आणि सुधीर मुनगंटीवार यांनी देवेंद्र फडणवीस यांच्या नावाचा प्रस्ताव ठेवला. त्याला पंकजा मुंडे, प्रविण दरेकर, रवींद्र चव्हाण, संजय कुटे, संजय सावकारे, अशोक उइके, आशिष शेलार, योगेश सागर, गोपीचंद पडळकर यांनी अनुमोदन दिले.  त्यानंतर या प्रस्तावाला भाजपाच्या सर्व आमदारांनी एकमताने मंजुरी दिली.  

आजचा दिवस ऐतिहासिक - बावनकुळे

आजचा दिवस आपल्यासाठी ऐतिहासिक आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मार्गदर्शनात देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात हा विजय मिळवला. राज्यात डबल इंजिन सरकार महाराष्ट्राला पुढे नेऊ शकतं. जनतेने आपल्याला भरभरून यश दिले. प्रचंड विश्वास आपल्यावर टाकला. महायुतीचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, राष्ट्रवादीचे अजित पवारांसह महायुती नेत्यांनी एकत्रित निवडणूक लढवली. राज्यातील १४ कोटी जनतेचे आभार मानले पाहिजे. जनतेने भाजपा आणि महायुतीवर विश्वास टाकला. आपण १४९ जागा भाजपा म्हणून लढवल्या. त्यात आतापर्यंतच्या भाजपाच्या इतिहासात १३२ जागा विजयी झाल्या. आपल्याला इतर अपक्ष आमदारांनी पाठिंबा दिला. महायुतीचं संख्याबळ २३७ आहे तर भाजपाचं संख्याबळ १३२ आणि ५ इतर धरून १३७ इतके संख्याबळ आहे. राज्याचे यशस्वी नेतृत्व देवेंद्र फडणवीस यांनी केले. हे यश फार मोठे आहे अशी प्रतिक्रिया भाजपा प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रशेखर बावनकुळे यांनी बैठकीत दिली. 

भाजपा कार्यकर्त्यांचा जल्लोष

गेल्या अनेक दिवसांपासून देवेंद्र फडणवीसांच्या नावाची चर्चा सुरू होती. मात्र अखेर भाजपा विधिमंडळ पक्षाच्या बैठकीत फडणवीस यांच्या नावाची घोषणा होताच भाजपा कार्यकर्त्यांनी जल्लोष केला. मुंबई, नागपूर येथील भाजपा कार्यालयाबाहेर कार्यकर्त्यांनी पेढे वाटून, ढोलताशे वाजवून आनंदोत्सव साजरा करण्यात आला.

टॅग्स :maharashtra assembly election 2024महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४Devendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसBJPभाजपाMahayutiमहायुतीNirmala Sitaramanनिर्मला सीतारामन