शहरं
Join us  
Trending Stories
1
बालेंद्र शाहांचा नकार; सुशीला कार्की होणार नेपाळच्या पंतप्रधान? तरुणांचा सर्वाधिक पाठिंबा...
2
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल कोण? सीपी राधाकृष्णन राजीनामा देणार; १२ सप्टेंबरला उपराष्ट्रपतीपदाची शपथ घेण्याची शक्यता
3
शोरुममधून बाहेर पडताच नवीन कारचा अपघात झाला तर विमा मिळतो का? जाणून घ्या...
4
IND vs UAE : सूर्यानं टॉस जिंकला! बॉलिंग घेतल्यावर UAE चा कॅप्टन म्हणाला; बॅटिंग करायची ना...
5
पुण्यात भलामोठा आयकर रिटर्न घोटाळा; आयटी, मल्टीनॅशनल कंपन्यांचे कर्मचारी अडकले... 
6
नेपाळमधील सत्तापालटावर चीनची पहिली प्रतिक्रिया; माजी पंतप्रधान ओलींचं नाव घेणं टाळलं!
7
मुंबई महापालिका निवडणुकीसाठी शिंदेसेनेची 'जम्बो टीम'; २१ नेत्यांची मुख्य कार्यकारी समिती जाहीर
8
आर्टिफिशियल फ्लेवर्स, प्रिझर्व्हेटिव्ह्जशिवाय घरीच करा 'अ‍ॅपल जॅम'; मुलं म्हणतील, यम्मी...
9
ठाकरेंचा आवाज छत्रपती शिवाजी महाराज पार्कवर घुमणार; दसरा मेळाव्याला महापालिकेची परवानगी
10
Samruddhi Mahamarg : ‘समृद्धी महामार्गावर’वर दिसणारे ते खिळे नाहीत, मग काय?; समजून घ्या 'इपॉक्सी ग्राउटिंग' तंत्रज्ञान
11
वायफाय राउटरच्या बाजूला ठेवल्यात 'या' गोष्टी? आताच बाजूला करा अन्यथा...
12
आयटी सेक्टरमध्ये तेजी! गुंतवणूकदारांनी कमावले २.६४ लाख कोटी रुपये; 'हे' स्टॉक्स ठरले टॉप गेनर
13
वॉशिंग्टन सुरक्षित केले म्हणून डोनाल्ड ट्रम्प हॉटेलमध्ये जेवायला गेले...; लोकांनी जे केले...
14
अमरावतीची 'हवा'च न्यारी! देशात डंका, राष्ट्रीय स्तरावर पटकावला पहिला क्रमांक
15
उपराष्ट्रपती निवडणुकीत 'क्रॉस व्होटिंग'च्या संशयाची सुई; कोणत्या खासदारांनी ऐनवेळी पलटी मारली?
16
भरणी श्राद्ध २०२५: गुरुवारी भरणी श्राद्ध, एकदा करावे की दरवर्षी? अधिकार कोणाला आणि नियम काय?
17
भारतीय अर्थव्यवस्था सुसाट! टॅरिफचा धाक दाखवणाऱ्या अमेरिकेला 'फिच' रिपोर्टने धक्का! इतका वाढणार जीडीपी
18
भयंकर! नेपाळनंतर फ्रान्समध्ये सरकारविरुद्ध मोठं आंदोलन; रस्त्यावर जाळपोळ अन् तोडफोड
19
जिच्यासाठी माजी उपसरपंच गोविंद बर्गे यांनी आयुष्य संपवलं, ती पूजा गायकवाड कोण?
20
Asia Cup 2025 : पाकविरुद्ध हाच डाव खेळणार का? T20 तील टीम इंडियाच्या नंबर वन गोलंदाजाला बसवलं बाकावर

मुख्यमंत्रिपदावर आज दिल्लीत निर्णय; फडणवीसांना पसंती, मात्र समर्थकांना धक्कातंत्राची भीती

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 28, 2024 08:38 IST

भाजपच्या वरिष्ठांचा निर्णय आमच्यासाठीही अंतिम, एकनाथ शिंदेंनी केलं स्पष्ट,  शिंदेंचा दावा नाही, निर्णय मोदी-शाहांवर सोपविला, अमित शाह यांच्यासोबत दिल्लीत आज तीन पक्षांच्या नेत्यांची बैठक, फडणवीस पुन्हा परतण्याच्या मार्गावर, लवकरच घोषणा

मुंबई - मुख्यमंत्रिपदाबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांचा निर्णय भाजपप्रमाणे आम्हालाही मान्य असेल, असे विधान काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केल्यानंतर आता मुख्यमंत्रिपद भाजपला मिळण्याचा मार्ग मोकळा झाल्याचे चित्र आहे. देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री म्हणून परतण्याच्या मार्गावर असून दिल्लीत गुरुवारी तीन पक्षांच्या नेत्यांची अमित शाह यांच्यासोबत जी बैठक होईल तीत या संदर्भात अधिक स्पष्टता येईल. 

शिंदे यांनी बुधवारी दुपारी अचानक ठाणे येथे पत्र परिषद घेतली.  त्यांनी स्पष्ट केले की मोदी-शाह यांचा निर्णय अंतिम असेल. आता मोदी-शाह कोणता निर्णय देतात या बाबत कमालीची उत्सुकता आहे. शिंदे, फडणवीस आणि अजित पवार हे महायुतीचे नेते त्यासाठी  गुरुवारी दिल्लीला जाणार आहेत. 

कार्यकर्त्यांच्या भावनांचा आदर 

सध्याच्या एकूणच हालचाली बघता मुख्यमंत्रिपद भाजपकडे जाणार हे जवळपास स्पष्ट झाले आहे. भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाची पसंती देवेंद्र फडणवीस यांनाच असेल, असे मानले जाते. मात्र, ऐन वेळी दुसरेच नाव समोर येणार नाही ना, अशी शंका फडणवीस यांच्या चाहत्यांमध्ये आहे. महाराष्ट्रातील भाजप कार्यकर्त्यांच्या भावनांचा आदर झालेला तुम्हाला दिसेल, असे भाजपच्या दिल्लीतील एका ज्येष्ठ नेत्याने लोकमतला सांगितले. 

महायुतीत मतभेद नाहीत : फडणवीस

महायुतीत कुठलेही मतभेद नसून कुणाच्याही मनात कुठलाही संभ्रम नाही, असे फडणवीस यांनी नागपुरात स्पष्ट केले. युतीमध्ये आम्ही सर्व एकत्रित आहोत. एकनाथ शिंदे, अजित पवार व आमच्यात कुठलेही मतभेद नाहीत. सर्व निर्णय सोबत बसून होतील, असे आम्ही निवडणुकीच्या अगोदरच सांगितले होते. आमचे पक्षश्रेष्ठी सोबत बसून निर्णय घेतील. कुणाच्याही मनात किंतु परंतु नाही व एकनाथ शिंदे यांनी उघड भूमिका मांडून राजकीय क्षेत्रातील काही लोकांच्या मनातील सर्व संभ्रम दूर केले आहेत, असे फडणवीस म्हणाले. कार्यकर्त्यांची इच्छा आहे की देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री व्हावे याबाबत विचारणा केली असता फडणवीस यांनी काहीही न बोलता केवळ हात जोडले. 

सोबत बसून सगळे निर्णय होणार आहेत. कोणाच्या मनात काही किंतु परंतु असेल तर एकनाथ शिंदे यांनी तो दूर केला आहे. पक्षश्रेष्ठींसोबत आमची बैठक होईल आणि तिथे पुढचे निर्णय होतील. महायुतीमध्ये आम्ही एकत्रित बसूनच निर्णय केले आहेत, तसेच पुढचे निर्णय होतील. - देवेंद्र फडणवीस, माजी मुख्यमंत्री.

भाजप मुख्यमंत्रिपदासाठी जो उमेदवार देईल, त्या उमेदवाराला माझा किंबहुना शिवसेना म्हणून आमचा पूर्णपणे पाठिंबा असेल. पंतप्रधान मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्याशीही फोनवरून संवाद साधून त्यांना हे कळवले आहे. सत्ता स्थापनेत कोणतीही अडचण किंवा नाराजीही नाही. - एकनाथ शिंदे,  काळजीवाहू मुख्यमंत्री

आज मी, देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे दिल्लीला जाणार आहोत. दिल्लीला गेल्यानंतर आमची पुढची चर्चा होणार आहे. त्यानंतर दोन उपमुख्यमंत्री व एक मुख्यमंत्री असे सरकार स्थापन होईल.  - अजित पवार, माजी उपमुख्यमंत्री 

शिंदे नाराज असल्याच्या वावड्या विरोधक उठवत होते, पण शिंदे यांनी त्यावर आज सडेतोड प्रत्युत्तर दिले आहे. ते एक कणखर नेते असून त्यांच्यामुळे महायुती मजबूत आहे. शिंदे यांनी मांडलेली भूमिका कौतुकास्पद आहे. - चंद्रशेखर बावनकुळे, प्रदेशाध्यक्ष भाजप

टॅग्स :maharashtra assembly election 2024 resultमहाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2024Devendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसBJPभाजपाEknath Shindeएकनाथ शिंदेAmit Shahअमित शाहAjit Pawarअजित पवार