शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

वरळीत वरचष्मा कोणाचा? आदित्य ठाकरे विरुद्ध देवरा आणि देशपांडेंच्या उमेदवारीमुळे रंगत

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 7, 2024 06:54 IST

Maharashtra Assembly Election 2024: माजी मंत्री आदित्य ठाकरे, शिंदेसेनेचे राज्यसभा खा.मिलिंद देवरा आणि मनसेचे संदीप देशपांडे यांच्यातील तिरंगी लढतीमुळे वेगळे चित्र निवडणुकीत पाहायला मिळणार आहे.

- महेश पवारमुंबई - मुंबईतील ३६ विधानसभा जागांसाठी सात प्रमुख राजकीय पक्ष मैदानात उतरले आहेत. मात्र, यात वरळी महत्त्वाचे रणांगण बनले आहे. माजी मंत्री आदित्य ठाकरे, शिंदेसेनेचे राज्यसभा खा.मिलिंद देवरा आणि मनसेचे संदीप देशपांडे यांच्यातील तिरंगी लढतीमुळे वेगळे चित्र निवडणुकीत पाहायला मिळणार आहे.

वरळी मतदारसंघात बीडीडी चाळ, डिलाईल रोड, कोळीवाडा, वरळी सी फेस असे विभाग येतात. उच्चभ्रू मतदारांची संख्याही येथे अधिक आहे. २०१९ मध्ये आदित्य यांनी पहिल्यांदा निवडणूक लढविली, त्यावेळी शिवसेनेने सेफ गेम खेळला होता. मनसेने उमेदवार न दिल्याने त्यांनी राष्ट्रवादीच्या सुरेश माने यांचा सुमारे ६० हजार मतांनी पराभव करून एकहाती विजय मिळविला होता. आदित्य यांच्या वरळी प्लस संकल्पनेला मनसेचे देशपांडे यांची वरळी व्हिजनने प्रत्युत्तर दिले. दुसरीकडे शिंदेसेनेचे देवरा राजकारणातील सुसंस्कृत चेहरा मानले जात असल्यामुळे या दोन्ही नेत्यांचे आव्हान आदित्य यांच्यासमोर असेल.वरळीत उच्चभ्रू व परप्रांतीय मध्यमवर्गीयांत भाजपला मानणारा मोठा वर्ग वरळीत आहे, तर मनसेमुळे मराठी मतदारांतील विभाजन कोणाच्या फायद्याचे ठरणार हे निकाल ठरवेल. 

मतदारसंघातील कळीचे मुद्दे येथील गिरण्या आणि गिरणी कामगारांच्या चाळीच्या जागेवर टोलेजंग इमारती, मल्टिप्लेक्स उभे राहिले. मात्र, चाळकऱ्यांच्या पुनर्वसनाचा प्रश्न कायम आहे.बीडीडी चाळीच्या पुनर्विकासाचा प्रश्न अनेक वर्ष रेंगाळला आहे.कामगार आणि पोद्दार या दोन प्रमुख रुग्णालयांकडे सरकार आणि लोकप्रतिनिधींचे झालेले दुर्लक्ष.रेसकोर्स, मुंबईतील सर्वात मोठा धोबीघाट येथील समस्या सोडविण्यात आलेले अपयश.कोस्टल रोडमुळे ट्रॅफिक जॅमची नवी समस्या उद्भवली आहे. त्यावर काही ठोस उपाययोजना करण्यात आलेली नाही.कोळीवाडा गांव येथील सीमांकनचा विषय सोडविण्यात आलेला नाही. जुन्या मालमत्तेचे कागदपत्रांचे विषयही प्रलंबित आहेत. 

 

टॅग्स :maharashtra assembly election 2024महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४worli-acवरळीAditya Thackreyआदित्य ठाकरेSandeep Deshpandeसंदीप देशपांडेMahayutiमहायुती