शहरं
Join us  
Trending Stories
1
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
2
मध्य पूर्वेतील युद्धातच पाकिस्ताननं रचलं कुभांड; भारताला दिली पोकळ धमकी, कोलकाता टार्गेटवर?
3
“पंजाब माझा आत्मा, केवळ राजकीय आखाडा नाही”; राघव चड्ढा यांचा ‘आप’वर पलटवार, पुरावेच दिले
4
१०० कमांडर, १२ हेलिकॉप्टर अन्...; १९७९ सारखी नाचक्की टाळण्यासाठी अमेरिकेने इराणमध्ये काय काय केले?
5
इराणमध्ये 'सत्तापालट' करायला निघालेल्या ट्रम्प यांची स्वतःची खुर्ची धोक्यात? जनता विरोधात, लोकप्रियताही तळाला
6
आधीच २ तास उशीर, त्यात एक कोच न घेताच ट्रेन सुटली; CSMT स्थानकात अजब प्रकार, प्रवाशांचे हाल
7
आता झाडे बोलणार, स्वतःची ओळखही सांगणार! सोलापुरातील शाळेचा अनोखा प्रयोग, नक्की काय आहे हा प्रकार?
8
हातात लाखोंची रोकड, चक्क THAR मधून घरकामाला यायची 'पारो' मोलकरीण; कोट्यवधीचं गौडबंगाल उघड
9
पेट्रोल-डिझेलनंतर गॅस सिलेंडरच्या किमतीही मोठी वाढ! व्यावसायिक आणि घरगुती एलपीजीचे आजचे दर काय?
10
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
11
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
12
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
13
Uber: उबर चालकांच्या उत्पन्नात वाढ; कंपनीकडून कमिशन कपात, भाडं वाढणार का?
14
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
15
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
16
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
17
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
18
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
19
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
20
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

महाराष्ट्रात कोण असेल महायुतीचा मुख्यमंत्रिपदाचा चेहरा? देवेंद्र फडणवीसांचं सूचक विधान

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 16, 2024 16:53 IST

Maharashtra Assembly Election 2024: आज झालेल्या महायुतीच्या संयुक्त पत्रकार परिषदेमधून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महायुतीच्या मुख्यमंत्रिपदाच्या चेहऱ्याबाबत सूचक विधान केले आहे. 

विधानसभा निवडणुकीचं रणशिंग वाजल्यानंतर महाराष्ट्रामध्ये प्रचाराच्या रणधुमाळीला सुवात झाली आहे. राज्यात सत्ताधारी महायुती आणि विरोधी पक्षांतील महाविकास आघाडी यांच्यातच मुख्य लढत रंगण्याची चिन्हे आहेत. मात्र मुख्यमंत्रिपदाचा चेहरा कोण असावा आणि तो घोषित करावा का, यावरून महाविकास आघाडीमध्ये मतभेद आहेत. तर सत्ताधारी महायुतीनेहीमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं नाव पुढील मुख्यमंत्री म्हणून जाहीर केलेलं नाही. मात्र आज झालेल्या महायुतीच्या संयुक्त पत्रकार परिषदेमधून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महायुतीच्या मुख्यमंत्रिपदाच्या चेहऱ्याबाबत सूचक विधान केले आहे.

महायुतीच्या संयुक्त पत्रकार परिषदेमध्ये महायुतीचा मुख्यमंत्रिपदाचा चेहरा कोण असेल, अशी विचारणा करण्यात आली असता देवेंद्र फडणवीस म्हणाले की आम्हाला मुख्यमंत्रिपदाचा चेहरा घोषित करण्याची गरज नाही. आमचे मुख्यमंत्री तर इथे बसलेले आहेत, असे सूचक विधान केले. मात्र फडणवीस यांनी या दरम्यान मुख्यमंत्रिपदाचा चेहरा म्हणून कुणाचंही नाव घेतलं नाही. यावेळी फडणवीस यांनी महाविकास आघाडीने शरद पवार गटाचे प्रमुख शरद पवार यांनी मुख्यमंत्रिपदाचा चेहरा घोषित करावा, असे आव्हानही दिले.

फडणवीस पुढे म्हणाले की, महाविकास आघाडी मुख्यमंत्रिपदाचा चेहरा घोषित करत नाही आहे, कारण निवडणुकीनंतर त्यांच्या मुख्यमंत्री बनेल, असं त्यांना वाटत नाही. मी शरद पवार यांना आव्हान देतो की, त्यांनी आपला मुख्यमंत्रिपदाचा चेहरा जाहीर करावा.

दरम्यान, यावेळी एकनाथ शिंदे यांनीही महायुतीच्या मुख्यमंत्रिपदाच्या चेहऱ्याबाबत स्पष्टपणे काहीही विधान केलं नाही. आमच्या सरकारचं दोन वर्षांपासूनचं काम आणि कामगिरी हाच महायुतीचा चेहरा आहे. आता महाविकास आघाडीने त्यांच्या नेत्याला आपला चेहरा घोषित केलं पाहिजे.  

टॅग्स :maharashtra assembly election 2024महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४MahayutiमहायुतीChief Ministerमुख्यमंत्रीDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसEknath Shindeएकनाथ शिंदे