शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
4
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
5
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
6
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
7
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
8
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
9
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
10
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
11
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
12
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
13
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
14
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
15
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
16
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
17
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
18
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
19
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
20
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
Daily Top 2Weekly Top 5

एवढा पैसा आला कुठून? विनोद तावडेंच्या आरोपावरून सुप्रिया सुळेंचा सवाल

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 19, 2024 16:23 IST

Maharashtra Assembly Election 2024 : एवढा पैसा आला कुठून, भाजपनेच नोटबंदी केली होती ना? असा सवाल सुळे यांनी केला आहे.

Maharashtra Assembly Election 2024 :  मुंबई : भाजप नेते विनोद तावडे (Vinod Tawde) यांच्यावर पैसे वाटल्याचा आरोप 'बविआ'कडून करण्यात आला आहे. याप्रकरणी विरार येथील एका हॉटेलमध्ये बविआ कार्यकर्त्यांनी राडा घातला. यावरून आता मतदानाच्या एक दिवस आधीच राजकीय वातावरण तापले आहे. याबाबत राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांनी प्रतिक्रिया दिली आहे. एवढा पैसा आला कुठून, भाजपनेच नोटबंदी केली होती ना? असा सवाल सुळे यांनी केला आहे.

विनोद तावडे यांच्यावर आरोप होत आहे. यावर माझा विश्वास बसत नाही. मात्र, हे धक्कादायक आहे. मला कधीच असं वाटलं नव्हतं की, भाजपच्या ओरीजनल लोकांकडून अशी कृती घडेल. तसेच, ५ कोटींचं वाटप होतेय. श्रीनिवास पवार यांच्या ऑफिसमध्ये पोलीस येतात, अनिल देशमुखांवर हल्ला होतो, या देशात चाललंय तरी काय? असा सवाल सुप्रिया सुळे यांनी केला आहे. 

याचबरोबर, ब्लॅक मनीमुळे नोटबंदी भाजपनेच केली होती. मग भाजपकडे हे पाच कोटी रुपये आले कोठून? असा सवाल सुप्रिया सुळे यांनी केला आहे. तसेच, या गलिच्छ कृतीचा मी निषेध करत भाजपचे सरकार येणार नाही, हे त्यांच्या नेत्यांना समजले असेल असा टोलाही सुप्रिया सुळे यांनी लगावला. याशिवाय, विनोद तावडेंकडून ही अपेक्षा नव्हती. ते महाराष्ट्रात मंत्री राहिलेत, ते शिक्षणमंत्री होते असे सुप्रिया सुळे म्हणाल्या. 

नेमकं काय आहे प्रकरण?मतदानाच्या आदल्या दिवशीच विरारमध्ये भाजप नेते विनोद तावडे यांनी पैसे वाटल्याचा आरोप 'बविआ'ने केला आहे. 'बविआ'चे नेते हितेंद्र ठाकूर यांनी आरोप केला की, मला भाजपावाल्यांचा फोन आला, तावडे ५ कोटी घेऊन येतायेत, इतका मोठा नेता पैसे का घेऊन येतील, असं मला वाटलं. पण जेव्हा इथं आलो तेव्हा पैसे वाटप सुरू असल्याचं दिसलं. तावडे आल्यापासून इथं सीसीटीव्ही बंद होते, त्यामुळे हॉटेलवरही कारवाई व्हायला हवी. मला डायरी मिळाली, निवडणूक आयोग आणि पोलिसांनी या प्रकरणाची सखोल चौकशी करावी अशी मागणी त्यांनी केली. 

भाजपा नेत्यांनी काय सांगितले?विनोद तावडे हे भाजपाचे राष्ट्रीय सरचिटणीस असून अशाप्रकारे ते पैसे वाटप करत असल्याचा आरोप करतायेत हे मुळात हास्यास्पद आहे. कालपासून महाविकास आघाडीने निवडणूक आपल्या हातातून गेली हे त्यांच्या वर्तनातून आणि वागण्यातून दिसून येते. उद्याच्या निवडणुकीत पराभव स्पष्ट दिसतोय. लोकसभेच्या निवडणुकीत खोटं नरेटिव्ह सेट करून महाराष्ट्रात यश मिळाले. प्रचार सभा संपेपर्यंत महाविकास आघाडीने सभा, माध्यमे आणि सोशल मीडियाच्या माध्यमातून काही नॅरेटिव्ह सेट करण्याचा प्रयत्न केला परंतु ते अपयशी ठरले. सत्ताधारी पक्षाने विरोधकांचे सगळे दावे चुकीचे आहेत हे सांगण्यात यशस्वी ठरलो, असे भाजपा नेते प्रवीण दरेकर यांनी म्हटले आहे.

टॅग्स :maharashtra assembly election 2024महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४Supriya Suleसुप्रिया सुळेVinod Tawdeविनोद तावडेBJPभाजपाHitendra Thakurहितेंद्र ठाकूर