शहरं
Join us  
Trending Stories
1
डोनाल्ड ट्रम्प यांच्या गळ्यात शांततेचं नोबेल, नेतन्याहू यांनी शेअर केला असा फोटो, म्हणाले…
2
"सामाजिक विषमता निर्माण करण्याला शरद पवार जबाबदार', मनोज जरांगेंच्या भेटीनंतर राधाकृष्ण विखेंचा आरोप 
3
'हो, ते प्रवासी विमान आम्ही पाडलं होतं', अनेक महिन्यांनंतर व्लादिमीर पुतीन यांची कबुली
4
CJI गवईंवर बूट फेकणाऱ्या वकिलाला शरद पवारांचे खासदार निलेश लंकेंनी दिल्लीत गाठले; त्यानंतर...
5
महिलेने रडत रडत केला फोन, पोलिसांना सांगितलं पतीचं गुपित, घराची झडती घेताच बसला धक्का 
6
क्रिकेटच्या मैदानात AI ची ‘बोलंदाजी’! मिताली राजनं पिच रिपोर्टसाठी घेतली गुगल ‘जेमिनी’ची मदत, अन्...
7
आता भारतातच मिळणार जागतिक दर्जाचे शिक्षण; ब्रिटनची 9 विद्यापीठे उघडणार कॅम्पस
8
UNSC मध्ये भारताला ब्रिटनचा पाठिंबा! मुक्त व्यापार करारावर शिक्कामोर्तब; खलिस्तानवाद्यांवर कारवाईची मागणी
9
रस्त्यावर बेशुद्ध अवस्थेत सापडली महिला; शुद्धीवर आल्यावर सांगितलं असं; ऐकून सगळेच चक्रावले!
10
शाब्बास रिचा! सेंच्युरी हुकली; पण 'नॉट रिचेबल' वाटणारा टप्पा गाठला अन् मोठा डावही साधला
11
रावळपिंडी चिकन टिक्का, बहावलपूर नान, तर..., हवाई दलाच्या मेन्यू कार्डमधून पाकिस्तानची खिल्ली
12
शुभमन गिलच्या कर्णधारपदावर सौरव गांगुलींचे मोठे विधान, म्हणाला...
13
वारंवार मागणी केल्याने डोनाल्ड ट्रम्प यांना नोबेल शांतता पुरस्कार मिळेल? शर्यतीत कोण? जाणून घ्या...
14
'आम्ही सगळेच स्तब्ध झालो होतो, पण आता...', बूट फेकण्याच्या घटनेवर CJI गवई स्पष्टच बोलले
15
रोहित पवारांच्या मातोश्रींकडून गुंड निलेश घायवळचे कौतुक; सचिन घायवळसोबतचेही फोटो आणले समोर
16
Crime: एकाच कुटुंबातील तिघांवर प्राणघातक हल्ला, ५०० सीसीटीव्हीच्या मदतीने हल्लेखोराला अटक
17
ई-बस प्रवाशांसाठी STकडून मासिक, त्रैमासिक पास योजना सुरू; प्रताप सरनाईकांनी दिली माहिती
18
महिलांसाठी आनंदाची बातमी! 'या' राज्यात आता १२ दिवसांची मासिक पाळी रजा मिळणार, सरकारची घोषणा
19
"सचिन घायवळवर गुन्हे दाखल होते, पण..."; मंत्री योगेश कदमांनी सांगितले शस्त्र परवाना देण्याचे कारण
20
Nobel Prize : साहित्यातील नोबेल पुरस्काराची घोषणा, हंगेरीचे लास्झलो क्रास्नाहोरकाई ठरले मानकरी

‘’फडणवीसांना जागा दाखवणार, भाजपाचे सगळे आमदार पाडणार’’, जरांगे पाटलांचा निर्वाणीचा इशारा

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 29, 2024 16:36 IST

Maharashtra Assembly Election 2024: २९ सप्टेंबरपासूनचं आमरण उपोषण हे आरपारचं होणार आहे. तसेच तसेच बलिदान झालेल्या मराठा कुटुंबांचा बदला मी देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांना जागा दाखवून घेणार आहे, असा इशारा मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांनी दिला आहे. 

मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर देवेंद्र फडणवीस आणि भाजपाला निर्वाणीचा इशारा दिला आहे. २९ सप्टेंबरपासूनचं आमरण उपोषण हे आरपारचं होणार आहे. तसेच तसेच बलिदान झालेल्या मराठा कुटुंबांचा बदला मी देवेंद्र फडणवीस यांना जागा दाखवून घेणार आहे, असा इशारा मनोज जरांगे पाटील यांनी दिला आहे. 

अंतरवाली सराटीमध्ये मराठा समाजाच्या आंदोलकांवर झालेल्या लाठीमाराला आज एक वर्ष पूर्ण झालं आहे. त्या पार्श्वभूमीवर मराठा समाजाला संबोधित करताना मनोज जरांगे पाटील म्हणाले. मागच्या एक वर्षात माझ्या मराठा समाजाचा खूप तोटा झाला आहे. माझ्या समाजातील लोकांची बलिदानं गेली आहेत. मराठा आरक्षणासाठी आई-बहिणींचं कुंकू पुसलं गेलं आहे. त्यांची कुटुंबं उघड्यावर पडली आहेत. लाखो लोकांवर खटले दाखल झाले आहेत. कोट्यवधी मराठा समाज रस्त्यावर आलेला आहे. मला हे सहन होत नाही. त्यामुळे २९ सप्टेंबरपासूनचं आमरण उपोषण हे आरपारचं होणार आहे. तसेच तसेच बलिदान गेलेल्या मराठा कुटुंबांचा बदला मी देवेंद्र फडणवीस यांना जागा दाखवून घेणार आहे. देवेंद्र फडणवीस यांनी हे बलिदान घेतलेलं आहे. त्यासाठी देवेंद्र फडणवीस जबाबदार आहेत, असा आरोप मनोज जरांगे पाटील यांनी केला.

यावेळी आगामी विधानसभा निवडणुकीत भाजपाचे आमदार पाडण्याचा इशाराही जरांगे पाटील यांनी दिला. आता मागे हटायचं नाही. २९ सप्टेंबरपासून उपोषण करायचं. पुन्हा सहा कोटी मराठ्यांना एकत्र आणायचं. इथे जागा पुरली नाही तर त्या हायवेवर बसायचं. पण मागे हटायचं नाही. निवडणुकीतही पाडायचं आणि उपोषणामधून आरक्षणही मिळवायचं. देवेंद्र फडणवीस यांना आता सुट्टी द्यायची नाही. त्यांचे भाजपचे जेवढे आमदार आमच्याविरोधात बोलतात, त्या सगळ्यांना पाडायचं. एकालाही निवडून द्यायचं नाही, असे मनोज जरांगे पाटील म्हणाले. 

टॅग्स :maharashtra assembly election 2024महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४Maratha Reservationमराठा आरक्षणManoj Jarange Patilमनोज जरांगे-पाटीलDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसBJPभाजपा