शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
3
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
4
घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
5
बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
6
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
7
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
8
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
9
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
10
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
11
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
12
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपडेट? पटापट चेक करा
13
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
14
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
15
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
16
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
17
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
18
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
19
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
20
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
Daily Top 2Weekly Top 5

केंद्रीय गृहमंत्री अमित शाहांच्या प्रचार सभांचा धडाका; 'या' दिवशी पहिली सभा कोल्हापुरात

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 6, 2024 09:54 IST

Maharashtra Assembly Election 2024 : लोकसभेलाही त्यांनी संजय मंडलिक यांच्या प्रचारासाठी कोल्हापूरमध्ये जाहीर सभा घेतली होती. यानंतर त्यांनी ऑक्टोबरमध्ये येथील महासैनिक दरबार हॉलवर पश्चिम महाराष्ट्रातील पाच जिल्ह्यातील पदाधिकाऱ्यांचा मेळावा घेतला होता.  

Maharashtra Assembly Election 2024 : कोल्हापूर : आागामी विधानसभा निवडणुकीसाठी सर्व राजकीय पक्ष जोरदार तयारीला लागले आहेत. या पार्श्वभूमीवर भाजप नेते, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह हे शुक्रवार ८ नोव्हेंबरला कोल्हापूर दौऱ्यावर येत असून, त्यांची सकाळी ११ वाजता जाहीर सभा होणार आहे. 

महायुतीची राज्यातील पहिली जाहीर सभा काल (दि.५) कोल्हापूर उत्तर मतदारसंघात झाली. त्यामुळे आता अमित शाह यांची सभा कोल्हापूर दक्षिणमध्ये भाजपचे उमेदवार अमल महाडिक यांच्या मतदारसंघात ही सभा घेण्यात येणार आहे. या सभेची जागा अजून निश्चित झालेली नाही. 

कोल्हापूरचे जावई असलेल्या अमित शहा यांचे कोल्हापूरकडे विशेष लक्ष असते. लोकसभेलाही त्यांनी संजय मंडलिक यांच्या प्रचारासाठी कोल्हापूरमध्ये जाहीर सभा घेतली होती. यानंतर त्यांनी ऑक्टोबरमध्ये येथील महासैनिक दरबार हॉलवर पश्चिम महाराष्ट्रातील पाच जिल्ह्यातील पदाधिकाऱ्यांचा मेळावा घेतला होता.  आता राज्यातील विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अमित शाह यांच्या सभांचा धडाका पाहायला मिळणार आहे.

अमित शाह यांची कोल्हापुरात पहिली सभा होणार आहे. कोल्हापूर दक्षिण मतदारसंघात अमल महाडिक आणि काँग्रेसचे आमदार ऋतुराज पाटील यांच्यात लढत असल्याने भाजपने ही जागा प्रतिष्ठेची केली आहे. कोल्हापूर दक्षिण येथील सभेनंतर अमित शाह यांची सांगली - जत, सातारा -कराड दक्षिण आणि पुणे येथील पर्वती मतदारसंघात सभा होणार असल्याचे म्हटले जात आहे.

टॅग्स :maharashtra assembly election 2024महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४Amit Shahअमित शाहBJPभाजपाkolhapur-south-acकोल्हापूर दक्षिणkolhapurकोल्हापूरPoliticsराजकारण