शहरं
Join us  
Trending Stories
1
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
2
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
3
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
4
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय
5
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
6
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
7
मुलगी आयएएस अधिकारी झाली, आनंदोत्सवात वडिलांना ह्रदयविकाराचा झटका
8
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प
9
पहलगाम हल्यानंतर जम्मू-काश्मीरमध्ये ट्रेकिंगवर बंदी; पर्यटकांसाठी सूचना जारी...
10
मुंबईकरांचे जगणेच कठीण व्हावे, असाच सत्ताधाऱ्यांचा विचार; बेस्ट दरवाढीवरून आदित्य ठाकरे संतापले
11
आयपॅडमुळे विमानात उडाला गोंधळ, आणीबाणीची परिस्थिती, करावं लागलं एमर्जन्सी लँडिंग, कारण काय? 
12
कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धारामैय्या भर सभेत पोलीस अधिकाऱ्यावर भडकले, मारण्यासाठी उगारला हात, त्यानंतर...  
13
दिल्ली बिहारपासून लांब आहे का? सर्वपक्षीय बैठकीला उपस्थित न राहिल्याने खरगेंचा PM मोदींवर निशाणा
14
यशस्वी जैस्वालकडे सर्वांचं लक्ष, गुजरातविरुद्ध मोलाचा पल्ला गाठणार
15
भाजपने अध्यक्षपदाची निवडणूक पुढे ढकलली; पहलगाम हल्ल्यामुळे घेतला निर्णय
16
ही खिंड आहे पाकिस्तानचं ‘चिकन नेक’, PoKमधील या एंट्री पॉईंटवर भारताने कब्जा केल्यास होईल जबर कोंडी, कारवायांना लागेल लगाम
17
स्टायलिश लूकसह रॉयल एनफील्ड हंटर ३५० बाजारात; बघताच प्रेमात पडाल!
18
'आता चर्चा नाही, पाकिस्तानशी अखेरची लढाई...', पहलगाम हल्ल्यावरुन फारुख अब्दुल्ला संतापले
19
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार
20
मुकेश अंबानी यांच्या एका शेअरने मार्केट फिरवलं; बाजाराची जोरदार उसळी; कुठे सर्वाधिक वाढ?

उद्धव ठाकरेंचा दिल्ली दौरा यशस्वी?; काँग्रेस-शरद पवारांसोबत जागावाटप ते रणनीती यावर चर्चा

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 8, 2024 23:29 IST

उद्धव ठाकरे हे पत्नी रश्मी ठाकरे, आमदार आदित्य ठाकरे यांच्यासह मागील ३ दिवसांपासून दिल्ली दौऱ्यावर होते. या दौऱ्यात उद्धव ठाकरेंनी इंडिया आघाडीतील प्रमुख नेत्यांची भेट घेतली. 

नवी दिल्ली - महाराष्ट्रात होणाऱ्या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्वच राजकीय पक्षांनी कंबर कसली आहे. प्रत्येक पक्ष आपापली रणनीती आखत आहे. त्यात मुंबईचा मातोश्री बंगला जे कधीकाळी महाराष्ट्राच्या राजकारणाचं केंद्रबिंदू राहिले आहे. जिथे आज उद्धव ठाकरे राहतात. बाळासाहेब ठाकरे असताना या बंगल्यावर मोठमोठ्या नेत्यांची रिघ असायची. मात्र आता परिस्थिती बदलली आहे. उद्धव ठाकरेंनी मातोश्रीहून बाहेर पडत थेट दिल्ली गाठली आहे. 

३ दिवसीय दिल्ली दौऱ्यात उद्धव ठाकरे यांनी सोनिया गांधी, राहुल गांधी, मल्लिकार्जुन खरगे यांची भेट घेतली. लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर पहिल्यांदाच ठाकरे-गांधी अशी ही भेट होती. भाजपासोबत युती तुटल्यापासून ठाकरे आणि गांधी कुटुंब एकमेकांच्या जवळ आले आहे. उद्धव ठाकरे यांनी सोनिया गांधी यांच्या घरी जाऊन भेट घेतली तर मल्लिकार्जुन खरगे यांच्या घरी राहुल गांधी, केसी वेणुगोपाल यांच्यासोबत चर्चा केली. 

त्यातच धारावीच्या प्रकल्पावरून शरद पवारांना उद्धव ठाकरेंनी टोला लगावला होता. पवार आणि मुख्यमंत्री शिंदे यांच्या भेटीत अदानींच्या धारावी प्रकल्पावर चर्चा झाल्याचं बोलले गेले. मात्र दिल्लीत शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांची भेट झाली. त्याचसोबत दिल्ली दौऱ्यात उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या पत्नी सुनीता केजरीवाल यांचीही भेट घेतली. केजरीवालांच्या आई वडिलांची विचारपूस केली. जवळपास ३० मिनिटे उद्धव ठाकरे केजरीवालांच्या घरी होते. 

उद्धव ठाकरेंच्या दिल्ली दौऱ्यात काय काय झालं?

  • महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या रणनीतीबाबत दिल्लीत राहुल गांधी, मल्लिकार्जुन खरगे यांच्यासोबत महत्त्वाची बैठक पार पडली. 
  • पुढील महिन्याच्या आत जागावाटप केलं जावं, त्यावरही चर्चा झाली
  • कोण किती जागा लढणार यावर सर्वांची सहमती झाली पाहिजे, जर काही जागांवर तिन्ही पक्षांनी दावा केला तर एकत्र बसून तोडगा काढला जाईल
  • जागावाटपानंतर सर्वांनी मजबुतीने एकसाथ प्रचारासाठी पुढे यायला हवं.
  • लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर विभागवार आकड्यांच्या आधारे सर्वाधिक मतांची टक्केवारीला प्राधान्य दिलं जावं. 
  • प्रत्येक पक्षाने सर्व्हे केलेत, परंतु सर्व्हेसोबतच प्रत्येक पक्षाच्या ताकदीचा हवाला घेत जागावाटप व्हावं
  • निवडणुकीनंतरच महाविकास आघाडीचा मुख्यमंत्रिपदाचा चेहरा अंतिम होईल
  • महाराष्ट्रात ठाकरे, पवार आणि काँग्रेससोबतच सपा आणि आपसारख्या पक्षांची मदत घेतली जाईल.
  • भाजपाला हरवणं हे एकमेव उद्दिष्ट महाविकास आघाडीचे असेल यावर सर्वांचे एकमत झाले.
  • शरद पवार - उद्धव ठाकरे यांच्या भेटीत अदानी आणि धारावी प्रकल्पाबाबत असलेले गैरसमज, मतभेद दूर झाल्याचं बोललं जाते. 

 

दरम्यान, विधानसभा निवडणुकीत १०० ते ११० जागांवर उद्धव ठाकरे उमेदवार उतरवण्याच्या तयारीत आहेत. त्यासाठी पुढील महिनाभरात जागावाटपावर एकमत व्हावं असं टार्गेट निश्चित करण्यात आल्याचं सांगण्यात येत आहे. मुख्यमंत्रिपदाचा चेहरा निवडणुकीपूर्वी ठरण्याची शक्यता कमी असल्याचंही बोललं जाते. 

टॅग्स :Uddhav Thackerayउद्धव ठाकरेcongressकाँग्रेसRahul Gandhiराहुल गांधीSharad Pawarशरद पवारmaharashtra assembly election 2024महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४